Link copied!
Sign in / Sign up
240
Shares

लहान मुलांना आणि प्रौढांना होणाऱ्या कफावरील घरगुती उपाय


बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो. विशेषतः थंडीत कफाचे आणि खोकल्याचे प्रमाण वाढते. बऱ्याच वेळा हा कफ छातीत जमा होतो आणि त्याचा त्रास होतो. प्रौढासारखा हा त्रास लहान मुलांना देखील होतो. ही समस्या लहान मुलांना जास्त त्रासदायक ठरते. हा त्रास कमी होण्यासाठी आपण मोठयांसाठी आणि लहान मुलांसाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

घरगुती उपाय

१. तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.

२. दररोज सकाळी आंघोळीपूर्वी व रात्री झोपताना छातीला साधे खोबरेल तेल लावून किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. त्याने कफ पातळ होऊन लवकर बाहेर पडतो.

३. झोपल्यावर सतत खोकला येत असेल तर,अशा वेळी एक चमचा मध, अर्धा चमचा आल्याचा रस मिश्रण करून तो सावकाश चाटण करावा आणि वर गरम पाणी प्यावे किंवा खोकल्यामुळे दम लागत असेल तर हे चाटण करून वर आल्याचा गरमागरम कोरा चहा प्यावा

४. अर्धा चमचा भाजून कुटलेली आळशी आणि एक चमचा ज्येष्ठमध पावडर दीड कप पाण्यात उकळवून एक कप काढा शिल्लक ठेवून तो गाळून त्यात चवीपुरती खडीसाखर घालून गरमागरम प्यावे. या उपायानेही कफ चटकन सुटतो. आळशी पुरचुंडीत बांधून तव्यावर गरम करून कोमट करून आळशीच्या पुरचुंडय़ा ठेवून वाफेने गरम होणाऱ्या पुरचुंडय़ांनी छाती शेकवावी.

५. लहान बाळांच्या छातीत कफ साठून त्रास होत असेल तर २ कप पाण्यात १ चमचा जवस कुटून घालावा. या काढ्यात खडीसाखर घालून उकळून हा काढा कोमट करून२,३ वेळा डॉक्ट्रांच्या सल्ल्याने बाळाला दयावा. याने कफ बाहेर पडतो.

६. ३ वर्षवरील मुलाला कफ झाल्यास खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला दयावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ( ३ वर्षा पेक्षा लहान मुलांना देऊ नये)

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon