Link copied!
Sign in / Sign up
48
Shares

अशी करा कढीपत्त्याची चटणी . .

          कढीपत्ता हा पदार्थाला चव आणणार घटक आहे पण आपण बऱ्याच वेळा पदार्थ्यात घातला की  काढून टाकतो. या कढीपत्त्याच्या सेवनाने आरोग्यविषक अनेक फायदे होतात. अश्या या कढीपत्याची तोंडी लावायला म्हणून चपटपटीत चटणी कशी करतात हे आपण पाहणारा आहोत. 

साहित्य

१. १ माध्यम चमचा तेल 

२. दीड कप कढीपत्ता 

३. १/४ कप सुकं खोबरं (किसलेले आणि भाजलेले)

४. आवश्यकतेनुसार लाल तिखट (दीड चमचा)

५. एक गूळचा खडा किंवा एक चमचा साखर

६. चवीपुरते मीठ

कृती

१. तेल गरम करून घ्यावे  त्यात मंद आचेवर कढीपत्ता कुरकुरीत होई पर्यंत परतावा. 

२. त्यानंतर त्यात भाजलेले खोबरे घालून अगदी थोडावेळ मंद आचेवर परतावे. नंतर गॅस बंद करावा. आणि मिश्रण थंड होऊ द्यावे. 

३. त्यानंतर  त्यात लाल तिखट, गूळ/ साखर आणि थोडे मीठ घालून मिक्सरमधून जाडसर काढून घ्यावे. 

काही जण ही चटणी दह्यात घालून खातात, तर काही जण आमचूर पावडर, लिंबू पावडर किंवा आंबट चवीसाठी घालतात. 

फोटो स्त्रोत-केरला रेसिपी कॉर्नर डॉट इन 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon