Link copied!
Sign in / Sign up
30
Shares

कढीपत्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हांला माहिती आहेत का ?

आपल्याकडे कढीपत्त्याचा वापर हा फोडणी मध्ये करण्यात येतो.फोडणीमध्ये आणि पदार्थात कढीपत्त्याचा वापर केल्यामुळे पदार्थंची चव वाढतेच परंतु त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. हा बाजूला काढण्यात येणाऱ्या कढीपत्त्याचे उपयोग तुम्हांला समजल्यावर तुम्ही यापुढे कढीपत्ता कधीच बाजूला काढून ठेवणार नाही

१. केसांचे आरोग्य

केसांच्या आरोग्यासाठी आहारात कढीपत्याचा समावेश हा अत्यंत उपयुक्त ठरतो. कढीपत्याच्या सेवनामुळे केसाचे आरोग्य सुधारते. केसांचा पोत सुधारतो तसेच केस काळे राहण्यास मदत होते.

२. ऍनिमियची समस्या

कढीपत्ता आयरन आणि फॉलिक अॅसिडचा स्रोत असते. त्यामुळे याचे सेवन ऍनिमियाची समस्या दूर होते. याव्यतिरीक्त याचे सेवन फोलिक अॅसिड आयरन शोषुन घेण्यास मदत करते.

३.यकृतासाठी फायदेशीर

 

 

अति मद्यपान व इतर कारणांमुळे मुनिर्माण झालेल्या यकृतविषयक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. 

४. संक्रमणापासून(इन्फेक्शन) वाचवते. 

कढीपत्त्याचे अँटी-ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, व अँटी-फंगल गुण फंगल इन्फेक्शन, मुरमे यापासून बचाव करतात

५. वजन कमी करण्यास उपयुक्त

कढीपत्त्याच्या सेवनाने पचनव्यवस्था सुधारून वजन कमी होण्यास मदत होते.

६. सर्दी-कफ

जर तुम्हांला साइनस किंवा कफाचा त्रास असेल तर कढीपत्याचा वापर पदार्थामध्ये वाढवणे गरजेचे आहे तर कढीपत्त्यामधील व्हिटॅमिन सी, अँटी-इन्फ्लैमटोरी आणि अँटी-ऑक्सिडेंट हे गुण कफला साचु देत नाही.

७. चांगले कोलेस्ट्रॉलला वाढवते.

रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलला कमी करुनल गुड कोलेस्ट्रॉलाच्या प्रमाण वाढयामुळे हृदयरोग आणि त्यासंबंधीच्या तक्रारी दूर करते.

८. केमोथेरीपीच्या साइड इफेक्टला कमी करते. 

काही संशोधनानुसार असे पुढे आले आहे की कढीपत्त्यामध्ये एवढी क्षमता असते की ते केमोथेरेपी आणि रेडियोथेरेपीमुळे शरीराला होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon