Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

कधी-कधी थोडासा ताप येणे चांगलं का असतं ?


बऱ्याच वेळा ताप आला की आपण घाबरून जातो. ताप म्हणजे खूप मोठा आजार आहे असं आपल्याला वाटतं. पण बऱ्याच वेळा शरीराला येणारा ताप हा उपयुक्त असतो. मात्र हे तापमान आणखी वाढू नाये याची काळजी घ्यावी. शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनशी लढण्यासाठी ताप ही एक रिअॅक्शन असते. सहा महिन्याच्या वरील बाळाला आलेला थोडा ताप म्हणजेही एक चांगली गोष्ट आहे.

ताप आला म्हणजे मुलाला इन्फेक्शन झाले समजावे. अशावेळी विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी ताप हा महत्त्वाचा भाग असतो. ताप आल्यामुळे बाळाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी, अॅण्डिबॉडीज आणि इंटरफेरॉन प्रोटीन्स वाढतात. जे बाहेरील जीवणूंचा प्रतिकार करण्यास आवश्यक असतात. हे जीवाणू वाढू नयेत, पसरू नयेत म्हणून शरीराचे तापमान नैसर्गिकरित्याही वाढत असते.

प्राणीही त्यांच्या शरीरातील तापमान वाढण्यासाठी उष्ण प्रदेशात जात असतात. त्यामुळे त्यांच्यातील अॅण्टीबॉडीज आणि पांढऱ्या पेशी वाढतात. त्यामुळे त्यांच्यातील प्रतिकार शक्ती वाढती. तसेच ताप आल्यामुळे लिव्हरमधील लोहाचे प्रमाणही वाढते. त्यामुळे बाहेरील जीवाणूंपासून रक्षण होते. त्यामुळे लहान मुलांना आलेला थोडा ताप म्हणजे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट असते.

पण या परिस्थितीत तुम्ही काळजी घ्या !

१. जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान 106 डिग्रीपेक्षाही जास्त होते त्यावेळी काळजी घ्यावी. असावेळी तुमच्या र्हद्य आणि मेंदूलाही धोका पोहोचू शकतो.

२. जर बाळ तीन महिन्यांपेक्षा लहान असेल, तर थोडा ताप आला तरीही लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.

३. जर बाळ सहा आठवड्यापेक्षा लहान असेल आणि त्याचा ताप 100 डिग्रीपेक्षा जास्त असेल, तर बाळाला लगेच रुग्णालात दाखल करा.

४. जर तापात बाळाची शुदध् हरपली, तर त्याचा अर्थ बाळाला जास्त इन्फेक्शनचा जास्त त्रास होतोय. त्यामुले लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा.

५. तसेच जास्त तापामुले बाळ रडायला लागल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.

६. जर ताप सलग पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिला. तर धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशावेळी अधिक काळजी घ्या.

त्यामुळे थोडासा ताप आल्यावर घाबरून जाण्याची गरज नाही पण दुर्लक्ष देखील करू नका. तापावर लक्ष ठेवा. आणि वरील लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क करण्यास विसरू नका.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon