Link copied!
Sign in / Sign up
32
Shares

ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेल्या पदार्थामुळे हे फायदे होतात.

हल्ली ज्वारीची आहारातील फारच कमी झाला आहे. त्यातल्या-त्यात पण ग्रामीण भागात त्यामानाने जास्त प्रमाण ज्वारीचा आहारात बऱ्याच प्रमाण वापर केला जातो. त्यामुळे कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागतील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात. या बहुगणी ज्वारीच्या सेवनानं आरोग्यविषयक होणाऱ्या फायद्याविषयी आपण जाणून घेऊ या.

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. 

ज्वारीच्या सेवनानं होणारे फायदे.

१. ज्वारीत मुबलक प्रमाण तंतुमय पदार्था असतात त्यामुळे  त्याने पोट साफ होण्यास मदत होते.त्यामुळे ज्या व्यक्तींना  बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी पोळीच्या ऐवजी आहार ज्वारीची भाकरी समावेश करावा. ज्वारीच्या सेवनाने मूळव्याधीचा शौच्यास साफ झाल्याने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. 

२. महिलांच्या मासिकपाळी संदर्भातील आणि गर्भाशया संदर्भातील समस्याबाबत ज्वारीचे सेवन हे उपयुक्त ठरते. 

 ३. ज्वारीत असणारी आरोग्यदायी तत्व किडनीस्टोनला आळा घालत त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.

४. ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असल्यास आहारात ज्वारीचा समावेश जरूर करा.

५. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयासंबंधित आजारात ज्वारी उपयुक्त ठरते. 

६. ज्वारीचे सेवन शरीरातील इन्शुलिनची पातळी योग्य प्रमाणात ठेवते त्यामुळे मधुमेहा असणाऱ्या व्यक्तीने पोळीच्या ऐवजी ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास नक्कीच फायदा होईल. 

७.  शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास तसेच वजन कमी करण्यासाठी आहार ज्वारीच्या पदार्थांचं समावेश करा. 

८. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. 

ज्वारीचे सेवन कश्या स्वरूपात करता येईल. 

१. ज्वारीच्या पिठाची भाकर

२. थालीपीठ किंवा धपाटे

३. मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) 

४.  ज्वारीचा रवा, शेवया

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon