Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

जुळे किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणार असाल तर हे जाणून घ्या

प्रत्येक प्रेग्नन्सी हा एक वेगळा अनुभव असतो. वेगवेगळ्या मातांचा वेगळा अनुभव असतो. काही मातांना अनेक बाळे होतात. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळे जरूर असते. यातही जर तुमच्या पोटात जुळे किंवा तिळे गोंडस पाहुणे असतील किंवा त्यापेक्षाही जास्त (अरे बापरे!) तर तुमचा अनुभव हा १००% वेगळा असणार. हा अनुभव केवळ मानसिकदृष्ट्या वेगळं नसतो तर शारीरिक दृष्टीने देखील तुम्हाला फरक जाणवेल. इथे ‘अनेक’ या अर्थाने तुम्ही एकाच वेळी गर्भाशयात एकापेक्षा जास्त गर्भ धारण केलेले असतात. यात एकसारखे जुळे (एकाच अंड्यातून निर्माण झालेले) किंवा बंधुवत जुळे (वेगवेगळ्या अंड्यातून निर्माण झालेले) असू शकतात. तीळे म्हणजे ३ गर्भ किंवा त्यापेक्षाही जास्त गर्भ एकाच गर्भाशयात एका वेळी वाढू शकतात.

तुम्हाला जुळे किंवा अनेक अपत्ये होणार आहेत याची लक्षणे

* पहिल्या त्रेमासिकातील अल्ट्रासाऊंड’.

* डाॅपलर हार्टबीट इफेक्ट- एकाचवेळी एका पेक्षा अनेक हृदयाचे ठोके ऐकू येणे.

* गरोदरपणाच्या सुरवातीला खूप जास्त थकवा जाणवणे. ही सामान्य तक्रार आहे.

* पहिल्या त्रैमासिकात हालचाल जाणवणे.

 * एकाच वेळी गर्भाशयाच्या वेगवेगळ्या भागांत हालचाल जाणवणे.

 * तीव्र मळमळ होणे.

*   पोटाचा घेर सामन्यापेक्षा जास्त असणे.

*  जास्त प्रमाणात वजन वाढणे आणि सतत भूक लागणे.

*   थोडासा रक्तस्त्राव सतत होणे.

तुमच्या गर्भाशयात एक पेक्षा जास्त गर्भ असतील तर याचा संबंध बाळाच्या आणि तुमच्या आरोग्याशी असतो. सगळ्यात जास्त वेळा घडणारा प्रकार म्हणजे सगळ्या किंवा एका बाळाचा मुदतपूर्व जन्म होणे. म्हणून अशा स्त्रियांना जास्तीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

आरोग्याशी संबंधित उदभवू शकणाऱ्या समस्या

* अनेमिया , म्हणजेच अशक्तपणा.

* गर्भारपणातील मधुमेह.

*  गर्भारपणातील उच्च रक्तदाब.

* गर्भपात/ स्टीलबर्थ.

* गर्भाशयात पाणी जास्त असणे

* प्रसूती नंतर रक्तस्त्राव.

* प्रसूती नंतर नैराश्य.

 

बाळाच्या बाबतीत आढळणाऱ्या आरोग्यविषयक समस्या

* जन्मावेळी कमी वजन भरणे.- सगळ्या किंवा काही गर्भांना असमान रक्त पुरवठा होणे.

* बालमृत्यू – जन्माच्या १ महिन्यात बाळाचा मृत्यू होणे.

* जन्मतः शारीरिक व्यंगता.

 बाळाच्या वाढीसंबंधी समस्या.

काही असे देखील घटक आहेत जे एकपेक्षा जास्त बाळांना जन्म देण्याविषयी सकारात्मक चिन्हे देतात.

-  मातेचे वय ३० पेक्षा जास्त असणे.

- कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्य जन्माचा इतिहास असणे.

- लठठपणा.

- बाळ होण्यासाठी घेतलेले काही उपचार.

तुम्हाला एकपेक्षा जास्त अपत्ये होणार असतील तर तुमच्यासाठी काही टिप्स-

 

 

१. तुमच्यासाठी नैसर्गिक प्रसूती सुरक्षित ठरेल. परंतु जर बाळाच्या गर्भाशयातील जागेच्या संबंधी काही समस्या असतील तर सी-सेक्शन करण्याचा सल्ला योग्य आहे.

२. तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात फॉलिक अॅसिड कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्वे यांचे प्रमाण भरपूर असायला हवे. निरोगी गरोदरपणा आणि सुलभ वाढीसाठी गरजेचे असलेले सर्व अन्न-पदार्थ खा.

३. तुम्ही एकाच गर्भ वाढवत असाल तरी तुम्हाला शारीरिक हालचाल कमी करण्याचा सल्ला दिला जातो. आता या बाबतीत अनेक अपत्ये असतांना तुम्ही हालचाल किती करायची याविषयी तुमच्या डॉक्टरांना ठरवू दया. तुमच्या शारीरिक रचनेनुसार आणि गर्भधारणेच्या पूर्वी आणि नंतरच्या आरोग्याकडे बघून तुमच्या हालचाली किती असाव्यात हे ठरवता येईल.

४. वजन वाढणे हे गर्भधारणेच्या काळात आरोग्यदायीच असते. तथापि, अनेक अपत्ये असतील तर जास्तीचे वजन वाढवणे योग्य ठरेल.

कोणत्याही प्रकारच्या गरोदरपणामध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन नियमित चेक-अप करायला हवे. डॉक्टर तुम्हाला बाळाच्या वाढीसंबंधी योग्य माहिती देतील आणि त्यात काही गुंतागुंतीच्या स्थिती किंवा समस्या उद्भवल्या असतील तर तुम्हाला योग्य वेळी काय पाउले उचलावीत याची माहिती देखील डॉक्टरांकडून मिळेल.

स्वतः ची आणि त्यायोगे बाळाची काळजी घ्या. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत !!

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon