Link copied!
Sign in / Sign up
78
Shares

रोमान्स असा करायचा असतो.....

लग्न झाल्यावर, रोमँटिक जीवनाला सुरुवात होते. पण काही वर्षांनी रोमान्स एकदम कमी होऊन जाते. तेव्हा ह्या लेखात लग्न झाल्यावर काही वर्ष कशी जातात आणि मग त्यांनतर तुम्हाला सुरुवातीचे छान दिवस आठवतात. आणि मनाला हुरहूर लागते की, आपण त्यावेळी खूप काही मजा, वेळ, समजून घेणे करायला पाहिजे होते. खूप वेळ एकमेकांत व्यतीत करायला हवा होतो. अशी हुरहूर का वाटते त्याविषयी हा ब्लॉग

भारतात २००० जोडीदारांचा अभ्यास केला गेला. त्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी आढळून आल्या त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१) लग्न झाल्यावर पहिले वर्ष हे लग्नाच्या आनंदातच निघुन जाते. बऱ्याच जोडीदारांनी सांगितले की, वर्ष कुठे निघाले कळलेच नाही. कारण पहिल्या वर्षात फिरणे, नातेवाईकांना वेळ देणे, आणि एकेमकांना समजून घेणे ह्यातच पहिले वर्ष निघते.

२) लग्नाच्या एका वर्षानंतर नवरा-बायको एकमेकांना समजायला लागतात. उमजून घेतात. एकमेकांचे इमोशन्स, सुख-दुःख, आवड-नावड ह्याबाबत चर्चा करतात. आणि हे वर्ष संपता- संपता त्यांना कळून येते की, माझा नवरा असा आहे. व नवराही समजतो की, माझी बायको अशी आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षात ती दोघे खूप जवळ येतात.

३) हे वर्ष खूप महत्वाचे असते कारण दोघांना कळून येते की, पुढचे भविष्य, पोरांची भविष्ये ह्याबाबत दोघांना खूप जबाबदारी पार पाडावी लागणार ह्याची जाणीव होते. आणि ते दोघे आता एकमेकांची मजाही घ्यायला लागतात. दोघे एकच होतात.

४) ह्या वर्षात ती भांडणेही करायला लागतात. आता ती सोशल म्हणजे नातेवाईक, किंवा इतर ह्यात भाग घ्यायला लागून समाजाचा भाग होऊन जातात. आणि यात ती जोडीदार रोमँटिक गोष्टी विसरत जाऊन खूप वास्तविक व्हायला लागतात.

५) आता हळूहळू असे वाटायला लागते की, आपल्या नात्याला खूप वर्ष झाली आहेत. कारण तुम्ही आता पहिल्यासारखे रोमँटिक राहत नाही. असे खूप जबाबदारी अंगावर आल्याने होत असते. आणि त्यांची इच्छा असूनही एकमेकांना वेळ देता येत नाही. असे आता व्हायला लागते.

६) ६ ते ७ वर्षानंतर तुम्हाला वाटते की, पहिल्या वर्षात आपण खूप धमाल करायला हवी होती. कुठे दूर जाऊन एकेमकांच्या सहवासात राहायला पाहिजे होते. ज्या ठिकाणी तू आणि मी. असे बऱ्याच जोडीदारांना वाटते. कारण त्यांनी पहिल्या वर्षात असे काहीच केले नसते.

म्हणून तुम्ही तुमच्या पहिल्या वर्षातच एकमेकांना खूप वेळ द्या, जे ३ वर्षात एकेमकांना ओळखणे होते ते पहिल्या वर्षातच करून घ्या. म्हणजे पुढचे जीवन तुम्हाला कसे व्यतीत करायचे आहे त्याचा अंदाज घेता येतो. आणि त्यामुळे तुमच्यावर खूप जबाबदारीचा ताण येऊन आयुष्यातले रोमंटिझिम कमी होणार नाही. कारण त्या सर्व जोडप्याना वाटते की, लग्न झाल्यावरचे दिवस आजही विसरता येत नाही. म्हणून तुम्हीही आजच रोमँटिक आणि रोमान्स तुमच्या दोघांत सुरु करा. म्हणून आपण म्हणतो," गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी" ह्याबाबत आम्हाला नक्कीच कमेंट करा. 

मग असे बसून मागचे दिवस आठवतात दोघेजण ! खरंय ना ! 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon