Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

विविध प्रकारची प्राथमिक जीवनसत्वांची आरोग्यविषयक उपयुक्तता

आपल्या शरिराला तंदुरुस्त आणि कार्यक्षम राहण्यासाठी विविध प्रकारच्या जीवनसत्वाची आवश्यकता असते ही जीवनसत्वे आहारातील विविध घटकांमधून मिळतात. अश्या या विविध प्रकारच्या जीवनसत्वाची उपयुक्तता आणि आणि ती कशातून मिळतात हे आपण पाहणार आहोत. मुख्यतः शरिराला अ,ब,क,ड या जीवनसत्त्वांची आवश्यकता असते.

“अ” जीवनसत्त्व .

अ जीवनसत्वाचे मुख्य कार्य हे व्यक्तीमध्ये डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. ज्या व्यक्तीमध्ये किंवा लहानमुलांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ ची कमतरता असते त्यांना ,वेजीवनसत्त्व अ ची कमतरतरतेमुळे डोळयांचे विकार रातआंधळेपणा असे आजार होण्याची शक्यता असते

या जीवनसत्वाच्या शरीरातील योग्य प्रमाणसाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करा.

भोपळा, गाजर, पिकलेला आंबा, हिरव्या भाज्या उदा -पालक, मेथी, हरबरा, दुध, मका, मोड आलेले कडधान्य इ. गोष्टींचे सेवन

 

“ब” जीवनसत्त्व

ब जीवनसत्वाचे मुख्य कार्य हे जीभ व तोंडाच्या आतील त्वचा ओली व नरम ठेवणे. रक्तातील आवश्यक घटक निर्माण करणे.

बेराबेरी हा आजार जीवनसत्त्व ब च्या कमतरतेमुळे होतो. यामध्ये तोंडात फोड येणे. रक्त फिके पडणे.पाय दुखणे व पायाची आग होणे

ज्या भागावर सुर्यप्रकाश पडेल तो कोरडा पडणे फाटणे

या जीवनसत्वाच्या शरीरातील योग्य प्रमाणसाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करा.

हिरव्या भाज्यात जीवनसत्त्व ‘ब’ खुप प्रमाणात असते. म्हणून दररोजच्या जेवणात यांचा समावेश असावा.

हिरव्या भाज्याबटाटा, सफरचंद, चिकू इ. फळांच्या साली तसेच डाळींचे टरफल, हातसडीच्या तांदूळाच्या वरील भागावर जीवनसत्त्व ब जास्त असते. पॉलीश तांदुळ, डाळ वापरू नये.

"क" जीवनसत्त्व

 

क जीवनसत्व हे जेवणातील जास्तीत जास्त लोह शोषून घेते. तसेच रक्तातील केश वाहिन्यांची कार्यक्षमता वाढवितो. या जीवनसत्वाच्या शरीरातील योग्य प्रमाणामुळे कुठलीही जखम लवकरात लवकर भरण्यास मदत होते. का जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हिरड्या सुजणे, हिरड्यांतून रक्त येणे, संधिवाताचा त्रास होणे, अवेळी दात पडणे, केस पांढरे होणे,केस गळणे आदी समस्या निर्माण होतात.

या जीवनसत्वाच्या शरीरातील योग्य प्रमाणसाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करा.

आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच, मोड आलेल्या धान्यात विटामिन सी जास्त प्रमाणत असते.

"ड"जीवनसत्त्व

 

 

ड जीवनसत्वचे मुख्य कार्य हे हाडे मजबूत करणे,हाडे व दाताचा विकास करून मजबूत करणे, जखम झाल्यानंतर रक्त लवकर थांबवणे. या जीवनसत्वाच्या शरीरातील कमतरतेमुळे मुख्यत्वे लहान मुले आणि गरोदर मातांना जास्त प्रमाणात समस्या निर्माण होतात.

छोटया मुलांचे हात पाय ढिले पडणे किंवा वाकणे, ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे लहान मुलांना मुडदूस होतो. गरोदर मातेला प्रसूती मध्ये समस्या निर्माण होणे, इतरांना आणि गरोदर मातेला ,हात पायाच्या सांध्यामध्ये सुज होणे. बालकाच्या छातीचीहाडे दिसणे, मुलांच्या हाडात गाठी होणे. आदी समस्या निर्माण होतात

या जीवनसत्वाच्या शरीरातील योग्य प्रमाणसाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करा.

शेंगदाणा तेल, जवस तेल, सरकी तेल इ. केळ, दुध, ताक, दही ,तेलयुक्त ,स्निग्धता आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारा आहार

तसेच कोवळ्या उन्हातून देखील मोठ्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. छोटया बालकांना सकाळच्या कोवळ्या उन्हात घेऊन बसावे, तसेच गरोदर महिलांनी देखी इतर काही त्रास नसेल तर सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.

प्रत्येक जीवनसत्वाचे योग्य प्रमाण आपले आरोग्य आणि शरीर तंदुरुस्त राखण्यास मदत करते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon