Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

जीभेवरून तुमची पर्सनॅलिटी ओळखा …

           तुम्हाला माहितीये का ? की, जिभेच्या आकारावरून तुमचे व्यक्तिमत्व सांगता येईल. काही संशोधनानुसार, बऱ्याच व्यक्तींची पर्सनॅलिटी ही जिभेच्या आकारावरून सांगता येते. जिभेचे अनेक प्रकार असतात. खूप जाड, आखूड, बारीक, निमुळती अनेक प्रकारच्या जीभ असतात. तेव्हा ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ की, नेमक्या जिभेच्या आकारावरून कसे व्यक्तिमत्व ओळखता येईल.

१) आखूड जीभ

ज्यांची आखूड जीभ असते ते खूप स्वच्छ हृदयाचे असतात पण ते खूप बोलणारे असतात, तासन तास ही त्यांना बोलायला लावले तरी ते थकत नाहीत. बोलताना ही खूप रोमांचक पद्धतीने बोलत असतात. आणि ह्यांच्या बोलण्यातून बऱ्याच व्यक्ती दुखावले जातात पण त्यांचा उद्देश कुणाला दुखावण्याचा नसतो. बोलण्याचा ओघात ती काहीही बोलून टाकतात.

२) लहान व निमुळती जीभ

ज्यांची लहान व निमुळती जीभ असते ते खूप कमी बोलतात. आणि त्यांना शांत राहायला आवडते. त्यांचा स्वभाव हा आत्मकेंद्री असतो. पण ही लोक खूप शांतपणे आपले कामे करून व करवून घेतात म्हणून ती प्रगती पथावर असतात. पण ह्यांना खूप कमी मित्र असतात. आणि ही लोक सहजासहजी कुणातही मिसळत नाहीत.

3) लांब जीभ

लांब जीभ असणारे व्यक्ती कुणावरही चटकन विश्वास ठेवतात. खूप उत्साही आणि लगेच गोंधळून जाणारे असतात. पण यांच्यात एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे निष्ठा. निष्ठा असल्यामुळे ही नोकरीमध्ये खूप मोठी होतात. ह्यांना खूप मित्र मिळतात कारण तेवढे मनमिळाऊ स्वभावाचे हे असतात.

४) वळणदार जीभ

ज्यांची वळणदार जीभ असते, ती कोमल हृदयाचे असतात. ती कुणी ओरडले तरी रडायला लागतात. म्हणून ह्यांच्यात आई-वडिलांचा व नवऱ्याचा व बायकोचा जीव खूप असतो. ह्यांची काळजी घेणारी खूप व्यक्ती असतात. ह्या प्रकारच्या व्यक्ती कला, साहित्य, पाककला, मीडिया ह्या क्षेत्रात जास्त दिसून येतात.

५) जाड जीभ

जाड जीभ असणाऱ्या व्यक्तींना खूप राग येतो. खूप कडक आणि शिस्तशीर असतात. खूप छोट्या गोष्टींसाठी सुद्धा भांडायला तयार असतात. ह्यांना नवरा, बायको, मुलगा सर्वच जण घाबरतात. धाकात ठेवत असले तरी ह्यांच्यातला प्रेमाचा झरा खूप मोठा आहे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon