Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

जेव्हा तुमचे बाळ कोसळते/पडते तेव्हा ही सहा धोक्याची चिन्हे ओळखा:

जेव्हा बाळ समोरच कोसळते; तेव्हा एक पालक केवळ पाहण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही. हो, तुम्ही याबाबत नेहमीच विचार न केलेला बरा! कारण जे बाळ चालायला आणि खेळायला शिकते; ते कधी ना कधी धाडकन आपटतेच. त्यावेळी तुम्हाला काही धोके ओळखता आले पाहिजेत; जे आपल्या कल्पनाशक्तीच्याही बाहेर असू शकतात. जेव्हा तुमचे बाळ कोसळते; तेव्हा दहापैकी नऊ वेळा ती एक सामान्‍यच बाब असते. पण तुम्ही तुमच्या बाळाच्या आरोग्याची तडजोड करता कामा नये आणि तुम्ही काही धोक्याची चिन्हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. येथे आम्ही अशी कोणती चिन्हे आहेत; ते तुम्हाला सांगणार आहोत:

१. डोळ्यांच्या विलक्षण हालचाली

मुले एकाच जागी कधी बसून राहत नाहीत, पण तुम्हाला ती विचलित झालेली आढळली; तर सावधानी बाळगा. काही लक्षणे म्हणजे अतोनात रडणे आणि डोळ्यांच्या हालचाली! म्हणून जर तुमच्या बाळाचे डोळे एका टोकाकडून दुसरीकडे भिरभिरत असतील वा ते खूपच रडत असेल; तर तुमच्या बाळाच्या मज्जासंस्थेला हानी पोहोचलेली असू शकते.

२. हातपाय हलवण्यास अडचण येणे

अंतर्गत फ्रॅक्चर असण्याचे प्रमुख चिन्ह म्हणजे तुमच्या बाळाला वाटणे की, त्याला हात वा पाय हलवणे शक्य नाही. जर ते हे अवयव जास्तच हलवायचा प्रयत्न करत असेल; तर तिथे हाड मोडले असण्याची शक्यता असू शकते. जर तुमचे बाळ तुम्हाला एखादा खेळ खेळण्यास विनवत असेल, पण त्याला तो खेळताना अडचण येत असेल; तर ते पाहून तुम्ही शांत बसून राहू नका.

३. डोळ्यांमध्ये बदलाव होणे

जेव्हा तुम्ही एका डॉक्टरकडे जाता, तेव्हा तो नेहमीच टॉर्चच्या मदतीने तुमच्या डोळ्यांची का पाहणी करतो; हे माहिती आहे का? कारण डोळ्यांवरून खूप काही गोष्टींचा अंदाज बांधता येतो. जर तुमच्या बाळाचा एक डोळा दुसऱ्यापेक्षा मोठा वाटत असेल; तर त्याला डॉक्टरांकडे त्वरित घेऊन जा. कारण हे लक्षण त्याच्या मेंदूला दुखापत झाल्याचे असू शकते. म्हणून जर डोळे आकारांमध्ये वेगवेगळे वाटत असतील; तर सावधान राहा.

४. निष्क्रियता

जर तुमचे बाळ कोणत्यातरी गोष्टीत हरवलेले वाटत असेल वा कोणतीही प्रतिक्रिया देत नसेल; तर कोसळल्यानंतरची ही तुम्ही सर्वांत गंभीर गोष्ट मानली पाहिजे. जर तुमचे बाळ डोक्यावर आपटले असेल आणि त्याच्या मानेला वा पाठीला दुखापत झाली असेल; तर वैद्यकीय उपचार घेणेच शहाणपणाचे ठरते. त्याचवेळी बाळाची बाकी माहितीही डॉक्टरांना देण्यास विसरू नका.

५.  उलटी होणे

कंकश्शन (मेंदूची दुखापत) चे प्रमुख लक्षण म्हणजे उलटी होणे. तज्ज्ञ सांगतात की, कंकश्शनचे बाकीही परिणाम होऊ शकतात. म्हणून जर तुमचे बाळ सातत्याने उलटी करत असेल आणि बाकी कोणतीही लक्षणे दाखवत नसेल; तर त्वरित त्याला मुलांच्या इस्पितळात घेऊन जा.

६. कोणत्याही प्रकारचा द्रव बाहेर पडणे:

हे तुम्हाला थोडे घृणास्पद वाटू शकते, पण जर तुमच्या बाळाच्या शरीरातून कोणताही द्रवपदार्थ बाहेर निघत असेल; तर तीही एक धोक्याची घंटा आहे. जर तुमच्या बाळाला रक्तस्राव होत असेल वा बाकी कोणताही द्रवपदार्थ बाहेर निघत असेल; तर त्याला अंतर्गत संसर्ग झाल्याचे हे लक्षण आहे. म्हणून जर नाक वा कानातून रक्त किंवा बाकी कोणताही द्रवपदार्थ उत्सर्जित होत असेल; तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे पोहोचणे गरजेचे आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon