Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपताय का ? हो ! तर झोपू नका !

खूप स्त्रियांना जेवल्यानंतर झोपण्याची सवय असते. आणि त्यामुळे किती समस्या होत असतात. आणि शहरात राहत असल्याने किंवा कोण जाईल आता चालायला ह्याबाबत सुद्धा खूप कंटाळा व आळस करत असतात. पण ही गोष्ट खूप धोकादायक होत असते. कारण अगोदरच आपल्या जीवनशैली मुळे खूपच कमी शरीराची हालचाल होत असते. आणि शरीराची हालचाल कमी आणि खाणे लगेच अंगाला लागणे ह्यातून शरीर स्थूल बनून मग तुम्हाला ठाऊक आहेच काय समस्या येत असतात.

      १) तेव्हा जेवल्यानंतर लगेच कुशी पकडली तर ते खाणे पोटात जसे च्या तसेच साठून राहून पचन व्यवस्थित होत नाही. आणि शरीर खूप वेगाने स्थूल बनत असते. जेवल्यावर तातडीने झोपल्यास पोटात गेलेल्या अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नाही. यामुळे शरीरात एक विशिष्ठ प्रकारचं आम्ल तयार होतं आणि ते छातीत जातं. यामुळे अनेक वेळा आंबट ढेकरही येतात. शिवाय अन्नाचं योग्य पद्धतीने पचन न झाल्यास अनेक आजार जडू शकतात.

२) जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपलात तर, कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. आपणं जेवढं खातो त्यापेक्षा जास्त शरीरातील कॅलरीज बर्न करणं गरजेचं असतं. यामुळे शरीराचं कार्य उत्तम राहण्यास मदत होतं.

३) जेवल्यावर लगेच झोपल्याने पोटात आम्ल तयार होतं. आणि खाल्लेलं पोटात असल्यामुळे त्याची क्रिया - प्रतिक्रिया सुरु होते.  यामुळे अॅसिडीटी होण्याची दाट शक्यता असते. आणि ऍसिडिटी चा त्रास खूपच त्रासदायक ठरतो. 

४) रात्री जेवण झाल्यावर झोपल्याने पचनक्रिया बिघडते. ह्या गोष्टीचा परिणाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे हृदयावर परिणाम होऊन त्यासंबंधीचे आजार होत असतात. आणि जर तुम्हाला हे आजार हवे असतील तर जेवण झाल्यावर थोडी शतपावली करा. घरातच फिरून घ्या. किंवा काहीतरी वाचत बसा. वाचन करण्याने कॅलरी घटत असतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon