Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

जास्त मीठ खाताय ? हे वाचा


आपल्या एकूणच अन्नातून खारट पदार्थ काढून टाकले तर अन्न बेचव होते.खारट चवीचे पदार्थ प्रामुख्याने उष्ण गुणाचे असतात. त्याचप्रमाणे ते आपली पचन शक्तीही वाढवतात. या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे अन्नाला आणि तोंडालाही चव आणणे. खारट चवीचे पदार्थ पचनशक्ती वाढवणारे आणि रूची वाढवणारे असले तरी त्याचे आहारातले प्रमाण मर्यादित असणे गरजेचे असते. ठेवावे लागते. अन्यथा त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात.रक्त आणि पित्त यासाठी खारट पदार्थ फारसे हिताचे नसतात. खारट पदार्थ शरीरात घाम निर्माण करणारे असतात. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती तसेच घाम येणाऱ्यांनी खारट पदार्थ जपूनच खायाला हवे.

उच्च रक्त दाबाच्या

रुग्णांमध्ये अपथ्य म्हणून मिठाचा संदर्भ दिला जातो. त्याचबरोबर मूत्रपिंडाच्या विकारातही मीठ कमी खाण्याचा किंवा अजिबात न खाण्याचा सल्ला दिला जातो. तो मिठामध्ये असलेल्या काही दुगरुणांमुळेच अशाप्रकारे शरीरावर दुष्परिणाम करतो.

सांध्यांचे विकार

सांध्याचे विकार तसेच युरिक अँसिडचे प्रमाण वाढते . युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने यामध्ये पायाची बोटे तसेच पायाचा घोटा सुजतो. अनेकदा त्यामध्ये आग होते आणि त्या ठिकाणी खूप वेदनाही होतात. याला याला वातरक्त दोष किंवा इंग्लिश मध्ये गाऊट्स असे म्हणतात हे प्रमाण खारट पदार्थ जास्त खाल्याने हे वाढते.

केसांचे आरोग्य
 

केसांवरही होतो. केस लवकर पांढरे होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे खारट पदार्थांचे अतिसेवन होय. डोक्यावरचे केस अकाली गळणे, लवकर टक्कल पडणे, केसांची मुळे सैल होणेया तक्रारीही खारट पदार्थांच्या अतिखाण्यामुळे घडतात.

पर्याय

आधी म्हणाल्या प्रमाणे जसं खारट चव जर आहारातून काढून घेतली तर जेवणाला काही चव उरत नाही अन्न बेचव होते. मग यासाठी पर्याय अनेक जाणकार मिठाला पर्याय म्हणून आहारात सैंधव मिठाचा वापर करण्याचा सल्ला देतात. हे औषधी मीठ मानण्यात येते.

याला बोली भाषेत सैंधेलोण असे म्हणतात. हिंगावाष्टक चूर्ण या पाचक औषधामध्ये सैंधवाचा उपयोग केला जातो. सैंधव योग्य प्रमाणात खाल्ल्यास ते केसांना आणि डोळ्यांनाही हिताचे ठरते. काळे मीठ चवीला खारट असल्यामुळे दैनंदिन आहारात सध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर वाढवावा. याचे दुष्परिणाम नसले तरी तुमच्या प्रकृतीनुसार कसा वापर करावा जाणून घ्यावा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon