Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

जाणून घ्या वयानुसार तुमचा रक्तदाब किती असावा ?

आजच्या काळात आरोग्याचे प्रश्न किंवा रोग हे जीवनशैलीचाच एक भाग बनले आहेत. त्यामुळे चांगलं आरोग्य हवं असेल, तर शरीरात जाणवणाऱ्या बदलांकडे तसेच काही लक्षणांकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. येथे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवून आपण कशाप्रकारे स्वत:ची काळजी घेऊ शकतो ? हे पाहणार आहोत.

रक्तदाब काय आहे ?

रक्तदाब हा आपल्या शरीराचा सामान्य भाग आहे. आपल्या शरीरातील रक्त वाहत असताना काही शक्ती लावावी लागते. ही शक्ती तुमच्या हृदयात आणि धमन्यांत तयार होते. त्या शक्तीमुळे तुमच्या धमन्या फुगतात. त्यालाच सिस्टॉलिक प्रेशर म्हणतात. रक्त बॉडीतून जेव्हा हृदयात परत येते, तेव्हा जो दाब तयार होतो, त्याला डायस्टोलिक प्रेशर म्हणतात.

तुमचा रक्तदाब हा नेहमी हळुहळू बदलत असतो आणि वाढतो. रक्तदाब हा साधारणपणे 120/80 mm Hg असतो. रक्तदाबातील हा फरक नॉर्मल समजला जातो.

रक्तदाबाची समस्या

 रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना दोन प्रकारच्या समस्या असतात. एक उच्च रक्तदाब आणि दुसरी समस्या ही कमी रक्तदाबाची असते. जर तुमचा रक्तदाब हा 90/60 mm Hg किंवा त्यापेक्षा कमी असतो. हे कमी रक्तदाबाचे लक्षण आहे. त्याला वैद्यकीय भाषेत 'हायपोटेन्शन' म्हणतात. जर रक्तदाब हा 140/90 mm Hg असेल, तर हे उच्च रक्तदाबाचे धोकादायक लक्षण आहे. त्याला वैद्यकीय भाषेत ‘हायपरटेन्शन’ म्हणतात. उच्च रक्तदाबातही त्याच्या तीव्रतेवर त्याची लक्षणे अवलंबून असतात. खालील चार्टमध्ये ते स्पष्टपणे दिसून येते.

पुरूषांशी तुलना करता महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल, तर दैनंदिन जीवनक्रमावर आणि आहारावर लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे.

त्यासाठी खालील चार्ट लक्षपूर्वक वाचणे खूप आवश्यक आहे. कारण त्यात रक्तदाबाची त्यांच्या विविध टप्प्यांनुसार विशिष्ट लक्षणे सांगितली आहेत. तसेच त्यामुळे तुम्हाला कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हेही समजेल. तसेच तुमचं आरोग्य कसं चांगलं ठेवावं याचीही माहिती मिळेल.

रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची कारणे

 धुम्रपान

लठ्ठपणा किंवा जास्त वजन वाढणे

 धोकादायक आहार - तेलकट आणि मीठाच प्रमाण जास्त असलेला आहार

 आनुवंशिकता किंवा कौटुंबिक इतिहास

-निष्क्रियता किंवा अस्वस्थ जीवनशैली

-व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियमची कमतरता

 मद्यपान

ताण

 तुमच्या मूत्रपिंडाची समस्या

 वय

* वयानुसार रक्तदाब बदलत जातो

वयानुसार आपल्या शरीरात काही बदल होत असतात. त्याबरोबरच काही बाहेरच्या बाबींमुळेही बदल होत असतात. त्यात रक्तदाबासारख्या बाबींचा समावेश होतो. खालील तक्त्यात वयानुसार रक्तदाबात कसा बदल होतो हे दाखवलं आहे.

तुमचं आरोग्य हे कसं नियंत्रणात ठेवायचं हे पूर्णपमे हातात असतं. त्यासाठी तुम्हाला आरोग्याकडे थोड लक्ष देणं आणि काळजी घेणं आवश्यक असतं. योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेची उपचार घेतले तर रक्तदाबासारख्या समस्येवर उपाय करता येतो हे सिद्ध झाले आहे.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon