Link copied!
Sign in / Sign up
91
Shares

जाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते?

 


मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते

मुलांचे लहानपण आणि निरागस बाललीला मूल मोठे झाल्या नंतर परत कधीच अनुभवायला मिळत नाहीत. यामुळेच कि काय अगदी सर्वच आई-बाबांना आपले बाळ असेच लहानगे राहावे असे वाटते. पण या सोबतच त्याने सभोवतालच्या जगाशी जुळवून घ्यावे आणि यासाठीच्या त्याच्यातील अंगभूत क्षमता विकसित व्हाव्यात असे ही पालकांना वाटत असते.यामुळेच बाळ त्याच्या वाढीचे टप्पे जसे कि बसणे,रांगणे ,चालणे आणि बोलणे कधी गाठतो याची आपण आतुरतेने वाट बघत असतो . बाळाला स्वतःहून उठून बसता यावे यासाठी त्याला स्वतःच्या शरीराचे वजन पेलता यायला हवे.नवजात शिशूंचे स्नायू अगदीच नाजूक असतात आणि त्यांना विकसित व्हायला वेळ लागतो यामुळे मान आणि डोके स्वतः पेलणे तसेच कुशीवर वळणे त्यांना शक्य नसते. चला तर मग जाणून घेउया,तुमचे बाळ कुशीवर वळणे केव्हा आणि कसे सुरु करते..

१ . बिछान्यावर पहुडलेले असतांना बाळ स्वतःचे डोके उचलण्याचा प्रयत्न करते.सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात डोके उचलण्याचा बाळाचा प्रयत्न,अगदी काही क्षणांसाठी का असेना सुरु होतो.पाठीवर झोपलेली असतांना एका बाजूने डोके वळवणे त्यांना जमायला लागते.

२. साधारण दुसऱ्या महिन्यात पोटावर पालथे झोपलेले असतांना बाळाला स्वतःच्या डोक्याचे ओझे वरच्या दिशेने पेलायला जमू लागते.ज्या बाळांची शारीरिक क्षमता जास्त असते त्यांना काही प्रमाणात एका कुशीवर वळणे शक्य असते पण बसलेले असतांना डोके हेलकावे खायला लागते!!

३.  तीन महिन्याचे होता होता हातांच्या आधाराने डोके आणि खांद्याचा समतोल ४५ अंशांच्या कोनात सांभाळायला तुमचे छोटुकले शिकून घेते.

४.  चौथ्या महिन्यात एका कुशीवर वळणे बाळाला सहज जमते तर पाचव्या महिन्यापासून पोटावरून पाठीवर पूर्णपणे वळणे तसेच सहाव्या महिन्यात पाठीकडून पोटावर कूस बदलणे त्यांना जमायला लागते.

तुमचे बाळ स्वतःहून जेव्हा कूस बदलण्याचा किंवा वळण्याचा प्रयत्न करायला लागते तेव्हा काय काळजी घ्याल 

तुमचे बाळ स्वतःहून जेव्हा कूस बदलण्याचा किंवा वळण्याचा प्रयत्न करायला लागते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.जसे कि बाळाचे हे प्रयत्न सुरु असतांना त्याला जमिनीवर,एखाद्या मऊ बिछान्यावर किंवा गालिच्यावर झोपवावे. बाळ उंच पलंगावर असेल आणि एका क्षणासाठीही तुमचे त्याच्या वरील लक्ष हटले तर मोठी खाली पडून मोठी दुर्घटना होऊ शकते.यासाठी तुम्ही काही काम करत असाल तेव्हा तुमच्या बाळाला जमिनीवर किंवा सुरक्षित असणाऱ्या बाबागाडीत ठेवा.

तुमच्या बाळाने अद्याप कुशीवर वळणे सुरु केलेले नसले तर काळजी करू नका कारण अश्या वेळी मुलांना हालचाल कशी करावी हे समजण्यासाठी तुमची मदत आणि प्रोत्साहनाची गरज असते.बाळाला तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यापासून जमिनीवर पालथे झोपवायला सुरु करा जेणेकरून बाळ मान उंचावून तुमच्या कडे बघेल आणि स्वतःहून हालचाल करण्याचा प्रयत्न करेल. स्वतःहून मान पेलण्याचा प्रयत्न करण्याने आणि उंचावून बघण्याने बाळाच्या मानेचे स्नायू बळकट होतात.

यासाठी आणखी एक युक्ती म्हणजे जमिनीवर बाळापासून दूर एखादी खेळणी ठेवा खेळणी घेण्यासाठी बाळ हात आणि मानेच्या हालचाली करेल. यासोबतच तुम्ही हाताने बाळाला हलकेपणे कुशीवर वळवा.तुमच्या एका हाताने बाळाला व्यवस्थित पकडा आणि हळूच दुपटे ओढून तुम्ही सहजपणे बाळाला कुशीवर वळवू शकता. मऊ बिछान्यावर किंवा पांघरुणावर बाळाला ठेवून हळुवार पणे असे प्रयत्न अधून मधून करत रहा.

बाळाला एका अंगावर झोपवून तुम्ही स्वतःही त्याला कुशीवर वळण्यासाठी मदत करू शकता. या सर्व प्रयत्नांसाठी थोडा वेळ द्या आणि संयम ठेवा कारण बाळाच्या हात आणि पायाचे स्नायू पुरेसे विकसित आणि बळकट झाल्यानंतर बाळ आपोआप कूस बदलायला शिकते.हे स्नायू विकसित होण्यासाठी आधार देऊन बसवणे आणि मान उंचावून बघणे यासाठी तुमच्या सततच्या प्रोत्साहनाची गरज तुमच्या लाड्क्याला नेहमी भासत असते हे लक्षात घ्या..!!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon