Link copied!
Sign in / Sign up
1023
Shares

तुमच्या बाळाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला ? त्यावरून जाणून घ्या बाळाचे व्यक्तिमत्व


आपल्याकडे बाळाचा जन्म कोणत्या दिवशी झाला त्याला खूप महत्व असते. पण काही आईंचे असेही म्हणणे असते की, माझ्या बाळाचा जन्म सुखरूप झाला हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे. आणि तेही खरंच आहे की, बाळाच्या जन्मावेळेस आई व बाळही सुखरूप असणे महत्वाचे. बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी बाळाचा वाढदिवस आपल्याला महत्वाचा वाटतो म्हणून आपण ह्या ब्लॉगमधून बघणार आहोत. कोणत्या महिन्याचा जन्म बाळाला कसा फायदेशीर ठरतो. आणि लक्षात घ्या प्रत्येक बाळ स्पेशल असते. 

१) जानेवारी

ह्या महिन्यात जन्म घेतलेली मुले ही काही प्रमाणात आजोबांवर जातात म्हणून मॅच्युयर असतात. ते आपोआप खेळायला जातील, आणि खेळणार नसतील तर आपला होमवर्क करतील. ही मुले आपली इमोशन्स उघडपणे दाखवत नाहीत. ते जबाबदारी घेतील घेण्यात पुढे असतात. ही मुले महत्वाकांक्षी, दयाळू असतात.

२) फेब्रुवारी

ह्या महिन्यात जन्म घेणारी मुले क्रिएटिव्ह ( संकल्पनात्मक) असतात. ते जसे असतात तसेच स्वतःला दाखवतात. त्यांना लोकांमध्ये जायला आवडते, त्यांना रुटीन आवडत नाही. ह्या मुले स्वतःचा मार्ग तयार करतात घरच्यांचे म्हणणे ऐकत नाहीत. ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करतात. त्यांना आवडले नाहीत तर तोंडावर बोलतात. पण यांच्यात खूप ठामपणा असतो.

३) मार्च

मार्चमध्ये जन्म घेणारे मुले ही थोडी आत्मकेंद्री असतात, त्यांना इतरांच्या जीवनात दखल देण्यापेक्षा स्वतःचे जीवन यशस्वी करण्याची इच्छा असते. आणि ही मुले लाजरेही असतात. खूप संवेदनशील आणि खूप लवकर घाबरून जातात. पण ही खूप प्रामाणिक आणि विश्वासू असतात. मेहनत घ्यायला कधी ते मागे हटत नाही. आणि आई-वडिलांची खूप काळजी घेतात.

४) एप्रिल

ह्या महिन्यात जन्म घेणारी मुले रिस्क घेणारी असतात. धाडशी असतात लहानपणीच ही भिंतीवर चढतील, झाडावर चढतील, आणि एकदम खूप शांतही होऊन जातात. हे खूप प्रेमळ असतात पण त्यांचा स्वभाव थोडा शिग्रकोपी असल्याने त्यांचे प्रेम कोणी जाणत नाही. ह्या बाळांमध्ये आशावाद खूप भरलेला असतो. दुःख सहन करतील पण कुणाला सांगत नाही.

५) मे

ह्या महिन्यात जन्म घेणारी बाळ ही खूप प्रॅक्टिकल असतात आणि स्वतःची खूप काळजी घेतात. यांच्या ही बाळही आत्मकेंद्री असतात अगोदर करून दाखवतात आणि नंतर सांगतात अशी ही मुले असतात. ही नाते चांगल्या प्रकारे निभावतात. यांना राग येत नाही पण त्या गोष्टी मनात ठेवतात. खूप हुशार आणि व्यवहारी असतात. कारण ह्यांना कधीच पैशाची अडचण येत नाही.

६) जून

ह्या बाळांमध्ये खूप हजरजबाबीपणा भरलेला असतो. लोंकाचे खूप मनोरंजन करतात आणि ह्यांना स्टॅन्ड अप कॉमेडी खूप जमते. ह्यांना उपजत बोलण्याचे कौशल्य मिळालेले असते. खरे बोलतात, ह्यांच्यात नेता बनण्याचे सुद्धा कौशल्य असते. ही सोशल प्रकारची असतात.

७) जुलै

ह्या मुलांमध्ये एक प्रकारचे इतरांपेक्षा वेगळेपण भरलेले असते, म्हणजे ही मानलेल्या गोष्टींना प्रश्न विचारण्याचे धाडस करतात. इतरांबाबत खूप संवेदनशील असतात कुटुंबापेक्षा इतरांना जास्त महत्व देतात. इतरांना मदत करण्याबाबत स्वतःलाच भिकारी करतात. खूप दयाळू असतात. यांच्यासाठी पूर्ण जगच कुटुंब असते.

८) ऑगस्ट

ह्या प्रकारची मुले खूप रोमँटिक असतात. ह्यांना फिरायला खूप आवडते. खूप गोड बोलत असतात. आणि लोकांना कह्यात घेणे यांना खूप जमते. आई कितीही रागात असली तरी तिला मस्का लावून शांत करतात. खूप स्वप्नाळू असतात ह्यांचे लकही खूप चालते. देवावर खूप विश्वास ठेवतात ही मुले. अभ्यास करणार नाही पण उपजत हुशारीने यशस्वी होतात.

९) सप्टेंबर

ह्या महिन्यात जन्म झालेली बाळ स्वतःला खूप परफेक्ट बनवतात आणि ही अत्यंत जहाल असतात. कोणतीही गोष्ट ही मुले जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे सोडत नाहीत. खूप विश्लेषण करणे त्यांना आवडते. आईवर खूप प्रेम असते. पत्नीची बाजू घेण्यापेक्षा आईचीच बाजू घेत असतो. पण सर्व कुटुंबाला सुखी ठेवतो.

१०) ऑक्टोबर

ह्या महिन्यात जन्म घेणारी बाळ ही, सहसा लवकर कुणावर विश्वास ठेवत नाही. निर्णय घ्यायला वेळ लावता कारण ते दोन्ही बाजू बघत असतात. खूप शांत आणि मनमिळावू असतात. ह्यांच्यात दूरदृष्टी आणि त्यासाठी काम करण्याची धमक असते. हे काहीतरी नवीन निर्माण करण्यावर भर देतात. ह्यांच्यात कला असते. कुणाला दुखावत नाही. यशस्वी होतात पण त्याचे श्रेय इतरांना देतात इतका त्यांचा स्वभाव नम्र असतो.

११) नोव्हेंबर

ह्या महिन्यात जन्म घेणारी बाळ ही खेळाडू स्पिरिट असलेली असतात. त्यांच्यात उत्साह पाण्यासारखा धावत असतो. खूप जिद्दी आणि आत्मविश्वास असतो. यांना कुणी आव्हान दिले तर त्याला करून दाखवतील. कुटुंबाकडे विशेष लक्ष देत नाहीत. सदैव बाहेर लक्ष असते. पण तितकीच समजूतदार आणि प्रेमळ असतात.

१२) डिसेंबर

खूप उत्साह ठासून भरलेली आणि आशावादी असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याचे खूप आवडते. खूप ऐतिहासिक असे व्यक्तिमत्व असते. ह्यांचे खूप मित्र वेगेवेगळ्या भागाचे असतात. बायकोला खूप खुश ठेवतात. जीवनात खूप पैसे कमावतात. ह्यांचा जीव कुटुंबात रमत असतो. ह्यांनाही खूप फिरण्याची आवड असते पण कुटुंबाला घेऊन.

ह्यावर तुमच्या काही कमेंट असतील तर त्या नक्की करा. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
50%
Wow!
50%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon