बाळाच्या जन्मानंतर बऱ्याच स्त्रिया आपल्या आत एक जीव वाढतोय या सुंदर भावनाची त्यांना आठवण यायला लागते पण तुम्हांला माहिती आहे का? बाळाच्या जन्मानंतर बाळ तुमच्या शरीरात काही आश्चर्यकारक अविश्वसनीय गोष्टी सोडून जाते आणि त्याचा तुमच्या शरीरला खूप फायदा होतो
काही शोधाअंती असे आढळून आले आहे की बाळाच्या जन्मांनंतर काही भ्रूणपेशी या गर्भाशयात तश्याच राहतात आणि त्या अनेक वर्ष तश्याच राहतात.
काही जाणकारांचं असं म्हणणं आहे की या पेशी मेंदूपर्यंत जातात आणि स्वतःला न्यूरॉन्समध्ये रूपांतरित करतात. किती छान ना? सुरुवातीस, ही प्रक्रिया काही विशिष्ट आजारांसारखी असते जसे प्रीक्लॅम्पसिया शरीराची प्रतिकारशक्ती विषाणूं समजून त्या पेशींशी लढा देण्याचा प्रयत्न करत असते.परंतु याला पुरेसा पुरावे उपलब्ध नाही.

पण असे काही पुरावे उपलब्ध आहेत की या भ्रूणपेशी आईला कर्करोगासारख्या आजारात मदतगार ठरू शकतात .तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की बाळाच्या पेशी आणि त्याचे डी एन ए हे आईला कर्करोग झालेल्या भागात कर्करोग विरोधात लढा देण्यास मदत करतात
नुकत्याच झालेल्य शोध अभ्यासात असे आढळून आले आहे २७२ प्रौढ स्त्रियांपैकी ७० टक्के स्त्रियांच्या रक्तात वाय क्रोमोझोम आढळून आले. जे पुरुषपेशींचे चिन्ह आहे. प्रसूतीनंतर या पुरुषपेशी आईच्या शरीरात मागे राहू शकतात आणि त्यामुले कर्करोगाची शक्यता कमी होत असल्याने त्या व्यक्तीच एकूण मृत्यूदर 60% पर्यंत कमी होतो.
आपण नेहमी ऐकत आलो आहोत की स्त्रियांचे आयुर्मान हे पुरुषांपेक्षा जास्त असते. कदाचित हे देखील त्याचे कारण असू शकेल. स्त्रियांचे आयुर्मान जास्त असण्याचे हे एकाच कारण नसेल तरी हा अभ्यास हा पुरावा आहे की आपल्या बाळाच्या पेशी त्याचा जन्माच्या काही वर्षानंतरही तुमची संरक्षण करतात.
