Link copied!
Sign in / Sign up
238
Shares

जन्ममहिना बाळाच्या व्यक्तिमत्वाविषयी सांगेल : भाग २


आपले व्यक्तिमत्व आणि जन्माचा महिना यांच्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा असतो. नवजात बाळ हे जगात येताना अगदी नव्या कोऱ्या ताज्या पुस्तकासारखेच असते. पण सत्य हेच आहे की त्यांच्या आयुष्याची कथा लिहिण्यात ते मग्न असतात. ह्याविषयी पहिल्या लेखावर/ब्लॉगवर खूप छान व आवडला अशा प्रतिक्रिया आल्या होत्या. आणि खूप आईणी आणखी ह्यावर लिहायला सांगितले तेव्हा हा दुसरा भाग. आपल्या बाळाचे व्यक्तिमत्व पाहूया.

१) जानेवारी

जानेवारी महिन्यात जन्माला आलेली बाळे अगदी प्रौढांप्रमाणेच आनंदी असतात. ही मुले लवकर परिपक्व होतात पण ते मोठे झाले तरीही त्यांच्या हृदयात एक मूल दडलेले असतेच. आयुष्याच्या बाबतीत ते गंभीर असतात आणि ते खेळण्यापेक्षा थोडा अभ्यास करण्याला प्राधान्य देतात. जानेवारीतील मुले विश्वासार्ह आणि कोणत्याही कामासाठी अगदी स्वयंपाक करणे, बाळाला सांभाळणे किंवा टेबल लावणे. ते जादू करु शकतात फक्त त्यांना थोडा पाठिंबा मिळाला पाहिजे. कष्टाळू, समर्पित वृत्तीचे आणि महत्त्वकांक्षी असतात. जी महत्त्वाकांक्षा आहे तसेच ते होतात. ते अत्यंत संवेदनशील, दुराग्रही आणि व्यवहारी असतात.

२) फेब्रुवारी

ही मुले नवीन शोध लावणारी आणि संशोधक वृत्तीचे असतात. त्यांनी काय करावे ते सांगितलेले आवडत नाही. ते अत्यंत हुशार आणि गुगल सारखेच असतात. आणि ते स्वतःच्या विचारांनुसारच वागतात. ते खूप पटकन गोष्टी शिकतात, आत्मसात करतात आणि सवंगड्यांपेक्षा ते दोन पावले पुढेच असतात. त्यांना स्वतंत्र राहायला आवडते आणि त्यांना बंधनात जखडून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ते बंडखोरी करतात. माणसांइतकेच प्राणीप्रेमही जबरदस्त असते. त्यांना अति लक्ष दिलेले किंवा अतिकाळजी केलेली आवडत नाही. त्यांना समाजात मिसळायला आवडते आणि त्यांच्या मनात काही विचित्र विचारही येतात पण ते क्वचितच बोलून दाखवतात. मोठे झाल्यावर त्यांना मनोरंजन, करमणूक आवडू लागते आणि त्यांना खरेदीची आवड असते.

३) मार्च

ही बाळे मनमोकळी नसतात, थोडी लाजाळू आणि आत्ममग्न असतात. ही अत्यंत भावनाप्रधान असतात आणि लवकर घाबरतातही. त्यांना निर्धोक आणि सुरक्षा वाटेल असे स्वतःचे जग ते तयार करतात. ही मुले स्वभावतःच उदार, प्रामाणिक आणि सहानुभुती देणारी असतात. ते शांतताप्रिय असतात आणि ते जे काम करायचे आहे ते शांतपणे करून मोकळी होतात. भावनिकदृष्ट्या ही मुले अत्यंत संवदेनशील असतात त्यामुळे सहसा ते आपल्या भावना व्यक्त करीत नाहीत. ते अत्यंत सहनशील असतात आणि कोणी मर्यादा ओलांडली की तर त्यांच्या रागाला बळी पडावे लागते. ही मुले खूप शांतपणे इतरांपेक्षा पुढे जातात.

४) एप्रिल

ही मुले आपल्या आयुष्यावर भरभरून प्रेम करतात. ही अतिक्रियाशील असतात आणि साहसांवर प्रेम असते. ते नेहमीच काही तरी रोमहर्षक, मजेशीर गोष्टी करतात मात्र दुःखाची गोष्ट म्हणजे ती गोष्ट थोडा वेळ केल्यानंतर त्यांना त्यात रस वाटत नाही. ते कंटाळण्याचा प्रश्नच येत नाही आणि टोकाच्या रागापासून ते उत्तेजित होण्यापर्यंत, आनंद होण्यापर्यंतच्या अनेक भावनांचा कल्लोळ दर्शवतात आणि ह्या व्यक्ती सर्वसाधारणपणे बोलक्या असतात. ही मुले म्हणजे आत्मविश्वास आणि स्वप्रेरणेने भरलेले सकारात्मक बुडबडेच जणू. ते हुशार असतात, दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतात त्यांना हसवतात आणि त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते.

५) मे

हे लोक व्यवहारी असतात आणि जीवनाकडे पाहण्याचा एक सातत्यपूर्ण दृष्टीकोन असतो. ते संग्राहक असतात जणू मग ते काहीही असतो आठवणी, तिकीटे किंवा नाणी आणि शंखशिंपले. आठवणी गोळा करतात आणि त्याविषयी आनंदून जातात. त्यांना कपडे आणि खाणे हे इतर कशाही पेक्षा प्रिय असते. ते खूप तरुण वयातच पैसा कमवू लागतात कारण जन्मजात व्यावसायिक वृत्तीचे असतात. पण हट्टी किंवा दुराग्रही म्हणून ते माहित असतात आणि त्यांच्या शब्दाला ते पक्के असतात. नात्यांची ते किंमत ओळखतात त्याविषयी ते प्रामाणिक असतात आणि खुल्या विचारांचे असतात. त्यांना खूप पटकन राग येतो मात्र सुदैवाने त्यांचा राग लवकर निवळतोही. त्यांचा आत्मविश्वास खूप अधिक असतो आणि त्यांच्या वेळेला आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या गोष्टींचे कौतुक करण्यासही त्यांना आवडते.

६) जून

ही मुले जन्मजात मजेशीर आणि थट्टेखोर असतात. ते लोकांचे मनोरंजन करू शकतात. संवाद साधण्यात त्यांना फार कष्ट करावे लागत नाही तोंडी किंवा लेखी कोणताही संवाद ते फार प्रयत्नांविना साधतात. त्यांना उदासवाणेपणा झेपत नसल्याने त्यांची पुस्तके आणि गॅजेटस यांच्याशी घनिष्ट संबंध असतात. जसे यांचे मन एका जागी स्थिर नसते तसेच शारिरीकदृष्ट्याही ते स्थिर नसतात. या लोकांवर जास्त भार टाकण्यात काहीच अर्थ नाही कारण त्यांची स्थिती एक ना धड भाराभर चिंध्या अशी असते. त्यांचे व्यक्तीमत्व मोहक असते आणि स्वभावतःच प्रेमालाप करणारे असतात. व्यावसायिकदृष्ट्या ते महान कलाकार किंवा विनोदवीर होऊ शकतात.

७) जुलै

मोठी स्वप्ने आणि सुस्पष्ट कल्पनाशक्ती यांचा उत्तम संगम या मुलांमध्ये असतो. त्यांना आत्मज्ञान असते आणि इतरांच्या भावना आणि संवेदना याबाबत ते खूप संवेदनशील असतात. संरक्षक म्हणूनच हे जन्माला येता पण मनाने लहानच राहिलेले असतात. त्यांच्या सहृदयतेमुळे आणि परोपकारी भावनांमुळे भटक्या कुत्र्यांनीही घरात आणून ठेवल्यास फारसे आश्चर्य वाटायला नको. भावनिक हिंदोळ्यामुळे त्यांच्या मनोवस्था बदलत राहातात आणि नैराश्य त्यांना निर्दयीही बनवते. त्यांना भूतकाळातल्या वाईट गोष्टींना उजाळा देण्याची सवय असल्याने मोठेपणी ही मुलं थोडे खुनशी किंवा मनात आकस ठेवणारे होऊ शकतात.

८) ऑगस्ट

ऑगस्टमध्ये ज्यांचा जन्म होतो ते अत्यंत गर्विष्ठ आणि लक्ष वेधून घेणारे असतात. रात्रीची चांदणी आणि दिवसाचा सूर्यप्रकाश होणे प्रिय असते. प्रत्येकाने त्यांना आंजारावे, गोंजारावे आणि त्यांच्यावर प्रेम करावे असे वाटते. बदल स्वीकारण्यास त्यांची तयारी नसते आणि टीका केल्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर होतो. ते स्वतंत्र वृत्तीने मोठे होतात आणि त्यांच्यावर निर्बंध घातले तर त्याविरोधात लढण्याची क्षमता ते विकसित करतात. या व्यक्ती उर्मट, नको तितके सभ्य आणि उच्छृखल असतात. त्यांना अभ्यास करायला अजिबात आवडत नाही आणि सातत्याने प्रकाशझोतात रहायला आवडते.

९) सप्टेंबर

ही मुले परिपूर्ण असतात आणि गोष्टींचे संयोजन करण्यात अदभूत काम करतात. जरी वर्तणुकीचा विचार करता ते कुठल्याही टोकाला जाऊ शकत असले तरीही ते लोकांची चांगली काळजी घेतात आणि गरज असलेल्या प्राण्यांचीही काळजी घेतात. त्यांचे लिखाण चांगले असते आणि त्यात ते चांगली कारकीर्द घडवू शकतात. ते उग्र असतात आणि इतरावर टीकाही करतात. सतत स्वतःची समीक्षा करूनही कधी कधी स्वतःचा घात करतात किंवा नुकसान करून घेतात. त्यांना प्रवासाची आवड असते आणि नव्या नव्या ठिकाणी जायला आवडते. ते हट्टी किंवा दुराग्रही असतात आणि प्रेरणादायी व्यक्ती असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गरजेची असलेली प्रेरणादायी व्यक्तींसारख्या या व्यक्ती असतात.

१०) ऑक्टोबर

ह्या व्यक्ती कायम गोंधळलेल्या असतात कारण त्यांना प्रत्येक समस्येच्या दोन्ही बाजू दिसतात त्यामुळे स्वतःच्या मनाची समजूत घालणे हे त्यांच्यासाठी एक कठीण काम असते. त्यांचे व्यक्तिमत्व मोहक असते आणि स्वभावाने ते आदबशीर असतात. सर्वांना ते आवडतात आणि ते बऱ्यापैकी लोकप्रियही असतात. कोणत्याही प्रकारातील कला आणि सौदर्य यांचे त्यांना कौतुक असते. स्वभावतःच ते आळशी असतात आणि शांतचित्त असतात. ते अत्यंत धोरणी, हुशार आणि निर्भय असतात. हे लोक भावनिक असतात तसेच मत प्रदर्शित करणारेही असतात. ह्या व्यक्ती मनमौजी असतात आणि दुखावल्यास सहजपणे दुखावल्या जातात. त्यांना आवडत नसले तरीही ते खोटे बोलू शकतात. त्यांच्याकडे सुंदर अंतरात्मा असतो आणि आंतरिक सौदर्यही असते.

११) नोव्हेंबर

स्वभावाने तीव्र असतात आणि त्यांना शब्दशः नाही पण वाईट गोष्टी, घाण काढून टाकायला आवडते पण त्यासाठी प्रकरणाची सर्व पाळेमुळे त्यांना माहित असणे त्यांना आवडते. त्यांना गुंतागुत सोडवायला आवडते त्यामुळे ते चांगले गुप्तहेर असतात आणि ते गूढरम्य पुस्तके वाचतात. राग किंवा प्रेम दोन्हीमध्ये ते अत्यंत भावनाप्रधान होतात. त्याहीपेक्षा ते अत्यंत शक्तिशाली आणि करारी असलेले अत्यंत टोकाचे उग्रवादी असतात. त्यांना जे हवे आहे ते कोणत्याही पद्धतीने मिळवतात. ते वेदनांचे व्यवस्थापन किंवा वेदना सहजपणे सहन करू शकतात आणि लहान मुलं म्हणूनही ते खूप क्वचित आजारी पडतात आणि आजारी पडले तरीही ते पटकन बरेही होतात.

त्यांना खूप राग आल्यास ते सूडही उगवतील पण गुपित राखण्यात विश्वासू असतात. ते थोडे जंगली आणि गूढ असतात पण कोणत्याही पार्टीचे ते जान असतात. ते प्रामाणिक, विश्वासू आणि आंतरिक सौदर्यासह असणाऱ्या स्वतंत्र व्यक्तीमत्वांकडे ते सहजपणे खेचले जातात.

१२) डिसेंबर

ह्या व्यक्ती उत्साहासाठी आणि आशावादासाठी प्रसिद्ध असतात. ही मुले उत्साहाने सळसळणारी आणि आनंदी असतात. त्यांना अभ्यासातील नव्यानव्या गोष्टी शिकणे खूप आवडते. खूप लहान वयातच त्यांना धार्मिक श्रद्धा आणि तत्वज्ञान यांचा ओढा असतो. ते प्रामाणिक असतात आणि सत्य आणि त्याचे इतर दृष्टीकोन यांच्याविषयी इतरांना सांगतात. त्यांना फिरायला आणि नव्या संस्कृती, लोक यांच्याविषयी जाणून घ्यायला, शिकायला आवडते. ते अतिशय देशभक्त असतात आणि अत्यंत प्रामाणिक, निस्वार्थी असतात. ते स्पर्धक, महत्त्वाकांक्षी, अधीर, संवेदनशील आणि स्वभावतःच सौम्य होऊ शकतात. ते मनमिळाऊ असतात आणि न लाजता गोष्टी करू शकतात. ते खूप चिकित्सक असतात आणि वादविवाद निपुण असतात. त्यांची एक भावनाप्रधान बाजू असते मात्र आपल्या भावनांचे प्रदर्शन क़रण्याबाबतील मात्र नक्कीच निवडक किंवा चिकित्सक असतात.

ब्लॉग/लेख कसा वाटला त्याविषयी नक्कीच सांगा. असेच tinystep मराठीवर तुमचे प्रेम राहू द्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon