Link copied!
Sign in / Sign up
59
Shares

जन्माला आल्यानंतर बाळाची घ्यायची काळजी(आईंनी वाचायलाच हवे)

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गरम कपडे घालावेत. तसंच झोपताना त्याला डायपर घालून झोपवावं. त्याच्या त्वचेला ओलावा येणार नाही याची काळजी घ्यावी. रात्री झोपेतही डायपर खराब झालं नाही ना याची खात्री करून घ्यावी. बाळ झोपण्याचं ठिकाण खिडकीच्या किंवा दरवाजाच्या बाजूला नाही याची काळजी घ्यावी.

१) बाळाला झोपवताना गादीवर किंवा उशीच्या जवळ झोपवावं. थंडीत बाळाला अंघोळ घालताना त्याला थंडी लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. अंघोळ घालण्यापूर्वी सूर्यफूल आणि एरंडेल यांचं मिश्रण असलेल्या तेलाने बाळाचं मालिश करावं. त्यामुळे त्वचा मुलायम होते. दाह किंवा खाज येत नाही.

२) ज्या ठिकाणी बाळाला अंघोळ घालणार असाल ती जागा थंड तर नाही ना किंवा तिथली खिडकी उघडी नाही याची प्रथम चाचपणी करून घ्यावी. तिथली जागा उबदार आहे याची खात्री करून घ्या. तसंच अंघोळ घालण्यापूर्वी पाणीदेखील गरम आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.

३) हिवाळ्यात बाळाच्या टाळूची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे बाळाच्या टाळूवर खपल्या दिसतात. त्या हाताने किंवा ब्रशने एकदम काढायला जाऊ नका. आंघोळीच्या वेळी एक मुलामय पंचा पाण्यात प्रथम बुडवून, पिळून घ्यावा. गरम पंचाने बाळाची टाळू थोडावेळ झाकून ठेवावी. असं दररोज केल्याने त्या खपल्या आपोआप पडायला सुरुवात होईल.

४) थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बाळाला स्पंज बाथ घालणंही केव्हाही उत्तम ठरतं. त्याच्या अंगावर पाणी घालण्याऐवजी त्यांला स्पंजने पुसून घ्यावं. म्हणजे बाळाला थंडी लागत नाही.

५) बाळाला पाण्याच्या टबात अंघोळीसाठी बसवण्यापूर्वी त्याचे डोळे, कान आणि नाक कापसाने स्वच्छ करून घ्यावेत. मग पाठ, पोट आणि छातीला साबण लावावा. सगळ्यात शेवटी हाताची बोटं, नखं स्वच्छ करावीत. अंघोळ घालून झाल्यावर बाळाचं शरीर पंचा किंवा सुती फडक्याने व्यवस्थित कोरडे करावेत.

६) अंग कोरडं झालं की त्यावर सर्दीचं औषध लावावं. त्यावर त्याला गरम कपडे घालावेत. हात, पाय आणि डोकं कायम झाकून ठेवावं. घरात सावली असल्याने घरातही खूप थंडी लागते. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात लहान बाळांना बसवावं किंवा फिरायला घेऊन जावं.

७) नवजात शिशूला आईचं दूध पाजावं त्यामुळे शिशूच्या शरीराला ऊब मिळते. बाळाच्या ओठाची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे तिची काळजी घेणं गरजेचं आहे. तिला पेट्रोलियम जेली किंवा बेबी लोशन लावावं. म्हणजे त्यांचे ओठ कोरडे पडणार नाहीत. ते मुलायम राहतील.

८) बाळाला ताप येत असेल तर लहान बाळ लघवीवाटे शरीरातील पाणी सतत बाहेर टाकतात. तेव्हा त्यांची त्वचा कोरडी कशी राहील याकडे लक्ष द्या. मधून मधून त्यांना पाणी किंवा इलेक्ट्रोलिक पावडरीचं पाणी पाजावं. बाळ जेवत असेल तर त्याला फळांचा ज्युस पाजावा. थंडीत सतत गरम कपडय़ामुळेही त्वचा लालसर होते. अशा वेळी त्याच्या अंगावरील उबदार कपडे थोडे कमी करावेत. आणि त्याला मोकळ्या हवेत थोडा वेळ बसवावं.

९) बाळाच्या मालीशसाठी कोणतं तेल वापरावं यासाठी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही ठरावीक उत्पादनं अ‍ॅलेर्जिक किंवा रिअ‍ॅक्शन आणणारी असू शकतात. तुमच्या बाळाच्या शरीराला तेल लावण्यापूर्वी थोडं तेल त्याच्या हाताला लावून पाहा. जेणेकरून तेल अनुरूप आहे की नाही ते पाहता येईल. तेल लावलेल्या जागी बाळाला पुरळ आलं तर दुसरं पर्यायी उत्पादन लावून पाहा.

१०) लेबलवरील घटक काळजीपूर्वक वाचा. नैसर्गिक घटक उदा. ऑलिव्ह आणि विंटर चेरी बाळाच्या त्वचेसाठी चांगले असतात. ऑलिव्ह तेल जीवनसत्त्व ‘इ’ने परिपूर्ण असतं. ते त्वचेला मऊ करतं, त्याचबरोबर संरक्षण आणि पोषण देतं. तसंच यात सूक्ष्मजीव निवारक गुणही आहेत जे त्वचेची काळजी घेतात.

बाळाच्या पोटाला हळुवारपणे तेल लावा आणि हळुवार व सौम्यपणे स्ट्रोक द्या. मालीश करताना गरजेपेक्षा जास्त जोर लावू नका. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. बाळाची सोय लक्षात घ्या. मालीश तेव्हाच करावं जेव्हा बाळ ते करून देईल. बाळाला मालीशचा मजेशीर अनुभव मिळू शकेल. चांगलं मालीश केलं की बाळाला चांगली झोप येईल. म्हणूनच आईने बाळाच्या झोपेच्या तासांची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याची झोप पूर्ण झाल्यानंतरच मालीश करावं आणि नंतर गरम पाण्याने त्याला आंघोळ घालावी. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon