Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

या आहेत जगातील काही प्रेरणादायी माता

एक आई आपल्या मुलांसाठी जे कष्ट आणि त्याग करते त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. तरीही, आईच्या  मेहनतीचे मोल कुणाच्याही सहजासहजी लक्षात येत नाही.आपल्या पिल्लासाठी साठी शक्य ते सर्व करण्यासाठी एक साधारण स्त्री सहजतेने सुपर मॉम बनते. या लेखातून तुम्हाला अशा काही मातांच्या अत्यंत  स्फूर्तिदायक कथा घेऊन आलो आहोत ज्या वाचून तुमचे हृद्य उचंबळून येईल.

१ ]एक अदभूत आई आणि तिचे अनोखे बाळ

 

केट ऑग ची गर्भावस्था सुरुवातीच्या दिवसांपासूनच खूप कठीण होती.गर्भावस्थेच्या केवळ २७ आठवड्यात तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे,या जुळ्यांपैकी एक जिमि प्रसूतीदरम्यान वाचू शकला नाही.डॉक्टरांच्या पूर्ण प्रयत्नांचाही काहीच उपयोग झाला नाही आणि जिमीला डॉक्टरांनी मृत घोषित  केल्यानंतर त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कुटुंबियांकडे सोपविण्यात आले. केटने तिच्या बाळाला घट्ट मिठी मारून ठेवली आणि दोन तासानंतर बाळ श्वास घेण्याची धडपड करत असल्याचे तिच्या लक्षात आले. डॉक्टरांनी हि फक्त प्रतिक्षिप्त क्रिया असल्याचे सांगत तिचे म्हणणे उडवून लावले. तरीही,केट हे स्वीकारायला तयार नव्हती.तिने बाळाला बोटाने दूध पाजायचे ठरवले आणि त्याचवेळेला इवल्याशा जिमीने डोळे उघडून त्याच्या  आईचे बोट घट्ट पकडले. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत केटने सांगितले कि डॉक्टरांना आज हि या घटनेवर विश्वास बसत नाही. पण एक आईच हे सर्व समजू शकते . जर केटला अंतःप्रेरणा मिळालीच नसती तर आज जिमी हे जग  पाहू शकला नसता.    

२]बार्बरा ग्युएरा :हातांशिवाय परिपूर्ण आई

 वर्षांची असतांना वीजेचा जोरदार धक्का बसल्याने बार्बराचे दोन्ही हात कापावे लागले. डिस्कव्हरी हेल्थ वाहिनीवर काही वर्षांपूर्वी तिच्यावर आधारित माहितीपटही दाखवण्यात आला. तिला एक अतिशय गोड मुलगाही आहे आणि एक सामान्य आई आपल्या मुलांसाठी जे काही करते ते सारे बार्बरा दोन्ही हात नसतांना करते आणि हीच गोष्ट तिच्या कहाणीला विलक्षण बनवते. ती तिच्या बाळाला तयार करते,त्याचे कपडे बदलते,त्याला भरवते आणि इतकेच नव्हे तर गाडी हि चालवते.तिच्या पायांमध्ये तिने अशी क्षमता विकसित केली आहे ज्यामुळे ती सगळी कामे पायाने करू शकते.बार्बरा घरून काम करते ज्यात टायपिंगचे काम ती चक्क पायाने करते. अशी आई नक्कीच सर्वांच्या प्रशंसेस पात्र आहे आणि आपल्या सर्वांसाठी खूप मोठी प्रेरणाही !!

३]ली शियोइंग

८८ वर्षांच्या ली शियोइंग ने कचऱ्यात फेकून दिलेल्या ३० मुलांचे प्राण वाचवले आहेत.चीनच्या एका अत्यंत दारिद्र्यग्रस्त भागात ली कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचे काम करते. स्वतः हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असतांना या मुलांचा सांभाळ करणे सोपे नव्हते. पण तिचे म्हणणे आहे कि जर कचऱ्याची हि पुनर्प्रक्रिया करण्याची क्षमता आणि ईच्छा आपल्यात आहे तर मग मानवी आयुष्याचे मोल यापेक्षा नक्कीच जास्त आहे. टाकून दिलेल्या या मुलांपैकी जणांचा सांभाळ तिने स्वतः केला आणि इतर मुलांना सांभाळण्यासाठी तिच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना दिले. ली ने ८२ वर्षांची असतांना  तिच्या सर्वांत छोट्या मुलाला झान्ग क्विलन ला कचरापेटीमधून बाहेर काढले होते.ली ने त्या बाळाची शुश्रूषा केली . ते बाळ आज खूप आनंदी आहे आणि महत्वाचे म्हणजे अगदी निरोगी आहे.  

४]ली -ऍन ऐलिसन

ली -ऐन ऐलिसन लॉस एंजेलिस मध्ये राहणारी हौशी फिटनेस तज्ञ आहे. महिन्यांची गर्भवती असतांना व्यायामाचे जड वजन उचलताना तिचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि यामुळे बरेच वादळ उठले. यावर तिने सांगितले कि या अवस्थेत व्यायाम करण्यासाठी डॉक्टरांनी  तिला हिरवा कंदील दाखवला होता. ज्या स्त्रिया गर्भावस्थेत आणि प्रसूतीनंतर ही निरोगी राहू इच्छितात त्यांना तिच्याकडून  प्रेरणा मिळावी असे ऐलिसन ला  वाटते. ती आता एका छोट्याशा मुलाची आई आहे.स्त्रियांच्या क्षमतांबद्दल नकारात्मक विचारसरणी असणाऱ्यांना तिने उत्तर दिले आहे.  एक अतिशय शक्तिशाली आणि प्रेरणादायी आई !!

५]मोनिका झिमरमन -स्टैन

मोनिकाला जन्मापासूनच एक दुर्मिळ जनुकीय आजार होता ज्यात दृष्टीवर परिणाम होतो. दुर्दैवाने,हा आजार तिच्या मुलांनाही झाला. तिच्याकडे वैद्यकीय विमा होता परंतू उपचारांच्या खर्चामुळे तिच्या कुटुंबावर खूप मोठे कर्ज झाले होते. स्वतःच्या मुलीची दृष्टि वाचवण्यासाठी तिने स्वतःचे इंजेक्शन बंद करून टाकले कारण संपूर्ण कुटुंबाचा औषधांचा खर्च पेलणे शक्य नव्हते. तिने केलेल्या या त्यागामुळे मोनिकाने तिची दृष्टी पूर्ण गमावली.ही खरोखरच  हृद्य भरून आणणारी  कहाणी आहे.    

६]चेल्सी कॅम्प

चेल्सी एक अतिशय धाडसी महिला आहे जिला दुर्दैवाने एका भयंकर प्रसंगाचा सामना करावा लागला जेव्हा ती तिच्या मैत्रिणीच्या कुत्र्याला सांभाळत होती. हा कुत्रा शांत असेल असे तिला वाटले आणि कॅम्पने तिच्या वर्षांच्या मुलीलाही सोबत घेतले. पण अचानक तो कुत्रा हिंसक झाला आणि त्याने चेल्सी च्या मुलीवर जोराचा हल्ला केला. एका आईमध्ये जी अंतःप्रेरणा असते ती चेल्सीमध्ये जागृत झाली आणि तिने कुत्र्याच्या तोंडावर ठोसे मारायला सुरुवात केली आणि त्याच्या कानाचा चावा हि घेतला.मदतीसाठी तिने ९११ वरफोन केला आणि तिची मुलगी गुदमरू नये यासाठी तिला पालथे झोपवले. चेल्सी आणि तिची मुलगी जखमी झाल्या होत्या पण उपचारानंतर पूर्णपणे ठीक झाल्या आहेत.एका आईमध्ये  मुलासाठी असणारे वात्सल्य इतके दाट आणि अंतःप्रेरणा एवढी शक्तिशाली असते कि कुठल्या हि संकटापासून त्याला  वाचवण्यासाठी ती काहीही करू शकते. हा प्रसंग खरोखर खूप भयंकर तरीही खूप काही शिकण्यासारखा आणि प्रेरणा देणारा आहे.  

तुम्हाला या सर्व खऱ्या कहाण्यांतून स्फूर्ति नक्कीच मिळाली असेल तर मग तुमच्या सर्व मैत्रिणींना हि हा लेख वाचण्यास नक्की प्रेरित करा आणि शेयर करा.        




 

  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon