Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

आयव्हीएफ म्हणजे काय आणि या तंत्रज्ञांचे फायदे आणि दुष्परिणाम


नैसर्गिक गर्भधारणेमधून मातृत्व मिळण्याची आस संपते तेव्हा प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यातील महत्त्वाचे आणि यशस्वी तंत्रज्ञान म्हणून आपण आयव्हीएफ अर्थात टेस्ट ट्यूब बेबी कडे पाहू शकतो. ज्या महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात किंवा गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता नसल्यास या तंत्रज्ञानाचा फायदा करून घेता येतो. या तंत्राचा शोध लागून सुमारे ४० वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. जगभरात या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

अधुनिक काळात मुलामुलींच्या लग्नाची वये पुढे जात आहेत तशी पालक होण्याची वये देखील पुढे जात आहेत. अनेकदा लग्न झाल्यानंतर करिअर किंवा तत्सम काही कारणांनी पालकत्व पुढे ढकलले जाते मग बाळाचा विचार केल्यानंतर जर नैसर्गिकपणे गर्भधारणा होत नसेल तर आयव्हीएफ तंत्राचा विचार केला जातो.

टेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय -

स्त्रीच्या शरीरात तयार होणारी बीजांडे आणि पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्राणू यांचे मीलन स्त्री शरीराच्या आत न होता बाहेर प्रयोगशालेत केले जाते. यामध्ये स्त्रीच्या बीजांडनिर्मितीचा अभ्यास करुन जास्त बीजांडे तयार क़रण्याची औषधे इंजेक्शनच्या स्वरुपात दिली जातात. काही कालावधीनंतर ती स्त्री शरीरातून बाहेर काढून पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्रजंतु यांचे मील घडवून आणले जाते. त्यानंतर भ्रूण २ ते ५ दिवस प्रयोगशाळेत वाढवले जाते. त्यातील उत्तम गुणवत्तेचे भ्रूण स्त्री शरीरात सोडले जाते. त्यानंतर पुन्हा या तंत्राने गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासले जाते. याची यशस्विता अधिक आहे.

या अत्यंत यशस्वी तंत्रज्ञानाचे काही धोके आणि दुष्परिणाम देखील आहेत.

एकापेक्षा अधिक गर्भ-

टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानात एकापेक्षा जास्त भ्रूण गर्भाशयात सोडल्यास एका पेक्षा अधिक गर्भ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मुदतपूर्व प्रसुतीकळा, बाळांचे कमी वजन. त्यामुळेच या तंत्रज्ञानाचा वापर करताना एकावेळी तीन पेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात सोडले जात नाहीत.

ओव्हेरियन हायपरसिम्युलेशन सिंड्रोम-

१० टक्के महिलांना ही समस्या भेडसावते. जेव्हा अंडाशयात फर्टिलिटी उपचार दिले जातात तेव्हा काही महिलांना त्याचा त्रास होऊ शकतो. हॉट फ्लशेस, नॉशिआ, स्तनांचा कडकपणा, मनस्थितीत सातत्याने बदल, अनिद्रा आणि चीडचीड. काही वेळा पोट डब्ब होणे, उलट्या किंवा पोट अस्वस्थ होणे असेही त्रास या औषधांमुळे होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी पॅरासिटामोल घेता येते.

आखडणे आणि अस्वस्थता-

बीजांडाच्या पुनप्र्राप्तीच्या वेळी आणि नंतर महिलांमध्ये आखडणे आणि अस्वस्थता जाणवते. ही लक्षणे सर्वसाधारणपणे दोन दिवसांत कमी होतात. काही वेळा भ्रूण गर्भाशयात सोडल्यानंतर काही स्त्रियांमध्ये गर्भाशयातून खूप रक्तस्राव होताना पहायला मिळतो.

उच्च रक्तदाब -

अनेकदा गर्भावस्थेत उच्च रक्तदाबाची समस्या पहायला मिळते. तशीच आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भधारणा झालेल्या महिलेतही ही समस्या पहायला मिळते.

अशक्तपणा-

काही महिलांमध्ये भ्रूण गर्भाशयात सोडल्यानंतर अतिरक्तस्राव होत असल्याचे पहायला मिळते. रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. काही वेळा स्त्रीला रक्त चढवावे लागते.

सी सेक्शन प्रसुती-

नैसर्गिक प्रसुतीमधील धोका टाळण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानात सी सेक्शन प्रसुती करण्याचा निर्णयही घ्यावा लागतो. त्यामुळे अर्थातच नैसर्गिक प्रसुती न करता शस्त्रक्रिया करावी लागत.

कमी वजन आणि मुदतपूर्व प्रसुती-

काही अभ्यासानुसार टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने झालेल्या गर्भधारणेत जन्मतः बाळाचे वजन खूप कमी असते शिवाय मुदतपूर्व प्रसुती होण्याची शक्यता अधिक असते.

गर्भपात-

आयव्हीएफ तंत्रज्ञानात गर्भपात होण्याचे प्रमाण अधिक असते. गर्भधारणेच्या वेळी मातेचे अधिक वय आणि फ्रोजन भ्रूण वापरल्यास हा धोका अधिक असतो. मुळात भ्रूण हे मातेच्या शरीराबाहेर प्रयोगशाळेत मीलन होऊन तयार होते. त्यामुळे काही वेळा गर्भाशय हे भ्रूण स्वीकारण्यास तयार नसते किंवा गर्भाशयासाठी ती फॉरिन बॉडी असते. त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

बीजांडाच्या पुनप्र्राप्ती प्रक्रियेतील गुंतागुंत-

गर्भनलिकेतून अ‍ॅस्पिरेशन सुईच्या मदतीने बीजांड घेताना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तस्राव किंवा मूत्राशयाला, मोठ्या आतड्याला दुखापत होऊ शकते. काही वेळा रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि संसर्गही होऊ शकतो.

गर्भाशयाबाहेर गर्भधारणा-

आयव्हीएफ मध्येही हा धोका उद्भवू शकतो. काही वेळा बीजनलिकेतही गर्भधारणा होऊ शकते. आयव्हीएफ मध्ये त्याचे प्रमाण २ ते ५ टक्के आहे. अशा प्रकारची गर्भधारणा काळ पूर्ण करत नाही आणि गर्भपात होण्याच धोका अधिक असतो. वास्तविक अशा प्रकारची गर्भधारणा होणे ही वैद्यकीय दृष्ट्या आप्तकालीन परिस्थिती आहे.

जन्मदोष-

आयव्हीएफ तंत्रज्ञानाने जन्माला येणाèया बाळांमध्ये जन्मजात व्यंगदोष असण्याची शक्यता अधिक असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात याचे काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

गर्भाशयाचा कर्करोग-

आयव्हीएफ तंत्रज्ञानामध्ये बीजांड निर्मितीचा वेग वाढावा यासाठी जी औषधे दिली जातात त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो असा एक मतप्रवाह आहे. मात्र कोणत्याही अभ्यासातून असे ठोस निष्कर्ष समोर अद्याप आलेले नाहीत.

नॉशिआ आणि जुलाब-

आयव्हीएफ मध्ये संप्रेरकांच्या गोळ्या योनीमार्गात ठेवण्यास सांगितले जाते. त्यामुळे स्त्रीला नॉशिआ आणि जुलाब होऊ शकतात. हार्मोनल इंजेक्शने देखील वेदनादायी आणि थकवा आणतात.

तणाव-

आयव्हीएफ ही उपयुक्त प्रक्रिया असली तरीही ती अत्यंत गुंतागुंतीची आहे. ही वेळ खाऊ प्रक्रिया असल्याने मानसिक आणि शारिरीक दोन्ही प्रकारच्या तणावाला सामोरे जावे लागते. त्यासाठी या काळात घरच्यांचा पाqठबा, प्रोत्साहन अत्यंत गरजेचे असते.

हे सर्व धोके आणि दुष्परिणाम या प्रगत तंत्रज्ञानाचे आहेत. ते सर्व जाणून घेऊन या तंत्राचा वापर करावा की नाही याचा विचार जरुर करावा. आजही भारतात ह्या तंत्रज्ञानाची यशस्विता ४० ते ६० टक्के आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon