Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

आयव्हीएफ बद्दल महत्वाचे असे काही

मुल होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गर्भधारणेच्या आयव्हीएफ उपचार पद्धती बद्दल आपण थोडेफार ऐकले असेल.आईचे स्त्रीबीज आणि वडिलांचे शुक्राणू यांचे मिलन प्रयोगशाळेत प्रक्रिये द्वारे केले जाते आणि यास आयव्हीएफ म्हणजेच In Vitro Fertilization म्हटले जाते. या प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या भ्रुणाला गर्भाशयात सोडले जाते आणि यानंतर नैसर्गिक पद्धतीने भ्रुणाचे रोपण होते.

वंध्यत्व किंवा मूल न होणे हि सामान्य समस्या आहे आणि मोठ्या संख्येने अनेक जोडपी आईव्हीफ उपचार पध्दतीचा अवलंब करतांना दिसतात. मूvfल होण्याच्या नैसर्गिक क्षमतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये धूम्रपान किंवा मद्यपान ,जीवनमान आणि काही गुणसूत्रीय समस्यांचा समावेश असू शकतो. मूल होण्याची नैसर्गिक क्षमता असणारी जोडपीही काही कारणांमुळे या उपचार पद्धतीचा वापर करतात.

तर आज आपण आयव्हीएफ बद्दल अजून माहिती जाणून घेउया.

१. आयव्हीएफ च्या पारंपरिक पद्धती वेळखाऊ आहेत

पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार केल्या जाणाऱ्या आयव्हीएफ उपचारांमध्ये तुम्हाला खूपच संयम आणि चिकाटी लागते.हि संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४ ते ५ आठवड्यांचा कालावधी लागतो आणि याचा हे यशस्वी होईल कि नाही याची खात्री देता येत नाही.

२. आयव्हीएफ चे विविध प्रकार

आयव्हीएफ उपचारांचे अनेक प्रकार,तुम्ही कोणत्या देशात वास्तव्यास आहात आणि कोणत्या डॉक्टरांकडून उपचार करून घेत आहात यावर ठरतात. काही दिवस ते काही आठवडे चालणाऱ्या या उपचारांचे वेगवेगळे प्रकार, औषधांचे प्रमाण आणि गर्भधारणा होण्यासाठी लागणारा वेळ यांवर ठरते.

३. आयव्हीएफसाठी लागणारा खर्च

आयव्हीएफ साठी लागणारे पैसे खर्च करणे तुम्हाला सहज शक्य असेल तर काळजी करण्याची गरज नाही.तरीही,उपचारांसाठी वेळोवेळी किती पैसे द्यावे लागणार आहेत याचा तक्ता डॉक्टरांकडून नक्की मागवून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची स्पष्ट कल्पना येईल . प्रत्येक रुग्णांसाठी विशिष्ट उपचारांचा वापर केला जातो आणि काही खास उपचारांची गरज असेल तर त्यांचा वापर करावा लागतो. आर्थिकदृष्ट्या तुमची कितपत तयारी आहे हे अगोदर जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला चालू असलेले उपचार आर्थिक अडचणींमुळे थांबवावे लागणार नाहीत.

४. तुमचे वय

स्त्रियांमध्ये ,वयाच्या ३५ पासून ४५ पर्यंत प्रजननक्षमता कमी होत जाते आणि अशावेळी आयव्हीएफ तंत्र यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. पुरुषांच्या बाबतीतही,प्रजनन क्षमतेवर वयाचा परिणाम होताना दिसून येतो.म्हणजेच ,वाढत्या वयासोबत पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होण्याची क्षमता कमी होत जाते.

५. उपचारांचे एकापेक्षा जास्त चक्र

आधी सांगितल्या प्रमाणे,आयव्हीएफ ची एक उपचार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त ४ ते ५ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो आणि तरीही अगदी पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असे नाही.गर्भधारणा यशस्वीपणे घडून येण्यासाठी एका पेक्षा जास्त उपचारांच्या चक्राची आवश्यकता लागू शकते.

६. योग्य सल्ला आणि मार्गदर्शन

उपचार सुरु करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांना भेटून आयव्हीएफ तंत्र तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे का याचा सल्ला अवश्य घ्या. काही चाचण्या आणि त्यांचे परिणाम आल्यानंतरच तुमच्या आताच्या अवस्थेचे खरे चित्र आणि कोणत्या उपचारांनी तुम्हाला मूल होऊ शकेल हे डॉक्टर सांगू शकतात.

७. उपलब्ध असणारे अन्य मार्ग

संतती प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत जसे कि- मूल दत्तक घेणे,सरोगसी इ योग्य सल्ल्यासाठी फक्त डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon