असे बरेच व्यक्ती असतील की त्यांना इलायची प्रत्येक गोष्टीत लागते जसे की, चहा, स्वयंपाक, आणि काहींना गोड पदार्थात सुद्धा इलायची टाकायची सवय असते. तर बऱ्याच घरात तिला मोहरीसारखे महत्व आहे तर काही घरात इलायची बडिशोपची जागा घेऊन आहे. कारण त्यांच्याकडे सकाळी उठल्यावर इलायची खायची असते. तेव्हा ही आयुर्वेदिक इलायची आरोग्यासाठी किती महत्वाची आहे ते आपण बघणार आहोत.
१) इलायची मध्ये तेलाचे प्रमाण असते. त्यात असलेल्या इसेंशियल ऑईलमुळे पोटाच्या आतील लेयर्स मजबूत होतात. ऍसिडिटी मुळे पोटात होणाऱ्या ऍसिडला इलायची अटकाव घालत असते. आणि इलायची मुळे ऍसिडिटी कमी कमी होत जाते.

२) जुन्या काळात इलायची प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यावर खात असायचा. कारण ह्यामुळे तुमची प्रकृती ही खणखणीत होते. आणि मानसिक तणाव व काही गोष्टींचे टेन्शन असेल तर तुम्ही इलायची खा. हार्मोन्समध्ये पटकन बदल होऊन तणावमुक्त होण्यास मदत होते.
३) सध्याची जीवनशैली ही हृदयाच्या खूप समस्या तयार करत असते. त्यामुळे तुमच्या हृदयाची गती सुरळीत ठेवण्यासाठी इलायची खायलाच हवी. ह्यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला व मनाला पोषक घटक मिळून शरीर सदृढ राहते.
४) इलायची खाल्याने फुफ्फुसात रक्तसंचार जलद गतीने होऊ लागतो. त्याचबरोबर अस्थमा, खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
५) रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी इलायची फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाबामुळे इतर अन्य आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पण दररोज २ ते ३ इलायची खाल्यास ही समस्या उद्भवण्याला आळा बसेल.

६) तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तोंडात इलायची टाकून तिला चगळत राहा. हे एक उत्तम माऊथ फ्रेशनर आहे.
७) मलावरोधाची समस्या असेलच तर इलायची नक्कीच खा. त्यामुळे पचनक्रीया सुधारेल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
८) तुम्हाला जर गाडी लागत असेल तर इलायची जवळ बाळगा आणि प्रवासात खा. उलटी होण्याचा त्रास कमी होईल.
