Link copied!
Sign in / Sign up
28
Shares

बाळाकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

 

पालक म्हणून, तुम्ही तुमच्या मुलाला खूप गोष्टी शिकवायला पाहिजेत. आणि तुम्ही शिकवत पण असता. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का ? अप्रत्यक्षरीत्या तुमची मुलं तुम्हालाही शिकवत असतात त्याची तुम्हाला जाणीव नसते. ते तुम्ही विसरून गेलेल्या गोष्टी पुन्हा नवीन शिकवत असतात. जे तुम्ही व्यावहारिक जगात पूर्णपणे विसरलेले असतात. मुलं ही खूप आत्मविश्वासाने ओथंबणारी असतात. त्यांच्यात धैर्य ही जास्त असते. आणि ते आपल्यापेक्षा जीवन भरभरून जगतात.

१) प्रत्येक क्षण live जगयाचा

मुलं सांगतात की, नवीन दिवस नव्या डोळ्यांनी पहायचा. प्रत्येक दिवशी नवी क्लुप्ती काढून त्या दिवसाला ते तुम्हाला त्रास देतात. आणि तुम्ही त्या त्रासाने कंटाळतात. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही की, त्याने नवीन शोध घेतला असतो. म्हणजे बाळ दररोज नवीन शोध लावतो. आणि जे आपल्याला कधी जमत नाही. आणि ते त्या शोधलेल्या क्षणांना live जगतात. मग त्यामुळे कपडे मळले, अंगाला मार लागला असेना.  

२) लहान - लहान गोष्टीतून खूप आनंद मिळवायचा

लहान मुले छोट्या गोष्टींमधून खुश होतात. मग त्यांना छोटीशी चॉकलेट दिली तरी चालते. आपल्यासारखे ते कधीच खुश न होणारे नसतात. त्यांना खेळायला घराबाहेर पाठवले तरी ते खूप आनंदी होतात. त्यांना खुश करण्यासाठी अवाजवी गोष्टी कराव्या लागत नाही.

३) बिनशर्त प्रेम किंवा निर्व्याज प्रेम

मुलं कधीच विचार करत नाही की, आपल्याला हा ड्रेस चांगला दिसणार नाही. त्या कपड्यांमुळे ते मूर्ख दिसतील असे सांगितले तरी तो ड्रेस घालतील. कारण त्यांचे त्या ड्रेसबद्धल निर्व्याज प्रेम असते. ते कधीही कुणाच्याही कडेवर जातील. ह्ग करतील, गोड पापा घेतील, त्यांना कधीच त्याबद्धल विशेष किंवा लाज वाटत नाही. त्यांच्या लहानपणीच्या मित्रांना ते कधीच विसरत नाहीत. कारण निर्व्याज प्रेम.

४) चुका मान्य करतात  

लहान मुलांना प्रत्येक अनुभव नवीनच असतो. मग त्यात ते चुका करत असतात. त्यांना जर चुकी संगितली तर ते पुन्हा करत नाही. आणि करतील तर तुमची मजा घेतील. आणि ते स्वतःच्या चुका लगेच मान्य करतात त्यासाठी ते आपल्यासारखे वागत नाहीत.

५) खूप धैर्यशील असतात

लहान मुलांचे जीवन अमर्याद असते कारण त्यांना आपल्यासारखी अपयशाची भीती नसते. उलट आपण त्यांना अपयशाबद्धल भीती घालून देतो. त्यांच्याकडे आशा व ठामपणा असतो. वाटल्यास त्यांच्या दैनंदिन गोष्टी बघा.  

६) गर्व नसतो

आपल्याला आपल्या वस्तूंचा व गोष्टींचा, यशाचा गर्व असतो. पण मुले तशी नसतात त्यांनी शाळेत यश मिळवले आणि मित्राला यश मिळाले नाही तर त्याला ते सात्वनपूर्वक सांगतात. पण आपण अभिमानाने आपले यश मिरवून मित्रांना दुखवतो. नम्रपणा मुलांकडून शिका. त्यांचे यश विसरून लगेच दुसऱ्या कामाला लागतात. 

७) भरभरून जगणे

मुले ही पौढांपेक्षा आनंदी असतात. त्यांना अपेक्षा नसतात, स्वप्न  नसतात, आणि त्यांना जे वाटते ते करतात. कोण काय म्हणेल याचा विचार करत बसत नाही. ते पक्षीसारखे असतात कुणाकडेही जातील. मनाला वाटेल ते करतील. खरं म्हणजे लहानपण हे भरभरून जगण्यासाठीच असते. त्यांच्याकडून एकही गुण शिकलो तर आपण रुक्ष जीवनातून आनंदी होऊ. वाटल्यास करून बघा.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon