Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

ह्या पेयाचा आनंद ह्या उन्हात घ्या !


सरबताची आठवण सर्वानाच उन्हाळ्यात येते. आणि आजही आईस्क्रीम च्या जमान्यात लोकप्रिय आहे. आता सरबत नेमके किती आणि कोणत्या वेळी प्यावे. उन्हाळ्याच्या काळात आरोग्याला उपयुक्त असणारी सरबते कोणती, ते पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या.

१) ह्या वेळी सरबत ह्यामुळे घ्यायला हवे की, शरीराला थंडावा मिळतो तसेच शरीराची होणारी झीज भरुन काढण्यास मदत होऊन उन्हाचा त्रास होत नाही.

२) पाणी पिल्यावर तुम्हाला तात्पुरता आराम मिळेल. व पण सरबतामध्ये असलेल्या मीठ आणि साखरेमुळे उर्जा टिकून राहण्यास मदत होते.

३) उन्हामुळे वातावरणात कोरडेपणा येतो, त्याचप्रमाणे शरीरालाही कोरडेपणा येतो. त्यामुळे या काळात सरबत प्यायल्यामुळे टवटवीत वाटते आणि कामातील उत्साह वाढण्यास मदत होते.

४) उन्हाळ्यामुळे अंगाची काहीली तर होतेच पण डोळ्यांची आणि हातापायांचीही जळजळ होते. तेव्हा ह्यापासून आराम मिळवण्यासाठी सरबते उपयुक्त ठरतात. त्यात कोकम सरबत भाव खाऊन जाते.

५) उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील अनेक द्रव्ये बाहेर टाकली जातात. त्यामुळे शरीरातील ताकद कमी होते आणि थकल्यासारखे वाटते. तेव्हा त्याची भर सरबते काढत असतात.

६) लिंबू, वाळा, कोकम, आवळा ही सरबते उन्हाळ्यात उपयुक्त ठरतात. ही सरबते घरच्या घरी तयार करणेही शक्य असते.

७) आंबट, खारट, गोड हे तीनही रस शरीरासाठी आवश्यक असतात. सरबतांतून ते मिळाल्याने नकळत ताजेतवाने वाटते. सुगंधासाठी केशर आणि वेलदोडा घातल्यास आणखी फायदेशीर ठरते.

८) उन्हाळ्यात अनेकांना वाताचा त्रास होतो. ज्यांना वाताचा व पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे नैसर्गिक पेय खूप फायदेशीर असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon