Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

आता ह्या घटकाचाही मासिक पाळीवर परिणाम ?

मासिक पाळी वरती आता खूप साऱ्या घटकांचा परिणाम पडायला लागला आहे. जसा की तो मानसिक ताण - तणावाचा पडत असतो. पाळी ही महिलांमधील सामान्य गोष्ट आहे. पण यावेळी महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल घडत असतात. या बदलांमुळे स्त्रियांना अनेक त्रास सहन करावे लागतात. 

अनेक वेळा मासिक पाळी अनियमित असते, या अनियमिततेमागे अनेक कारणं असतात. पण आताच  एका संशोधनानुसार हवेतील वायू प्रदूषणाचा सुद्धा परिणाम हा मासिक पाळीवर  होत असतो. नुकतेच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका संशोधनात वायू प्रदूषण हे तरुणींमध्ये मासिक पाळी अनियमित असल्याचे कारण असल्याचे सांगितले आहे.

संशोधनानुसार, हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे तरुणींमध्ये अनियमित मासिक पाळीचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले आहे. अनियमित झालेली मासिक पाळी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागत असल्याचे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. वंध्यत्व, मेटाबोलिक सिंड्रोम आणि पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोमचाही धोका वाढतो. ह्या वायू प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्याने हृदय संबंधी, फुफ्फुसांचे रोग होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

मासिक पाळी हे हार्मोन्सशी संबंधित असणारे आहे. वायू प्रदूषणामुळे, हवेत असलेल्या धुळीच्या कणांमुळे हॉर्मोन्सचा बदलांवर वाईट परिणाम होतो. हार्मोन्सवर प्रदूषणाच्या होणाऱ्या प्रभावामुळे मासिकपाळी अनियमित होऊ शकते. अनियमित मासिक पाळी हे महिलांमधील एक सामान्य गोष्ट असली तरी यामुळे कोणत्याही गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.

सध्या खूप साऱ्या घटकांचा मासिक पाळीवर परिणाम होताना दिसून येत आहे. आणि ह्यासंबंधी संशोधन चालूच आहे. कारण मासिक पाळी ही गरोदरपणाशी संबंधित असल्याने तिचे महत्व एका स्त्रीसाठीच नाहीतर कुटुंबासाठी महत्वाचे आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon