Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

हुरडा म्हणजे काय? तो कसा बनवतात..(व्हिडीओ)

सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे.बऱ्याच ठिकाणी हुरडा पार्टीचे आयोजन होते. पण हा हुरडा कसा करतात आणि कश्याचा असतो हे बरेच जणांना माहिती नसते ते आपण जाणून घेणार आहोत.

थंडीच्या मोसमात म्हणजे साधारण डिसेंबर मध्ये ज्वारीचे दाणे हिरवट, कोवळे असतात, त्या वेळेला भाजलेले अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या, चुलीच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते. हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला याने हुरड्याची लज्जत अजून वाढते. ज्वारीचे दाणे पूर्ण जून झाल्यानंतर त्याला जोंधळा किंवा ज्वारी म्हणून म्हणतात. त्याच बरोबर या हुरड्याच्या अजून काही पाककृती सुद्धा आपण पाहणार आहोत. 

छायाचित्र स्रोत  -harshvardhanshahi.wordpress.com

व्हिडीओ स्रोत-myjhola

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon