Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

या प्रकारची जीवनशैली तुम्हांला हृदयरोगापासून वाचावण्यास मदत करेल

हल्ली अमुक-तमुक वयाच्या ४०व्या वर्षी हृदयरोगाच्या झटक्याने गेला, याला ३० व्या हृदयरोगाचा झटका आला अश्या बातम्या फार ऐकतो. बातम्या काय त्यातलं एखादा आपल्या रोजच्या उठण्या-बसण्यातला असतो. या अश्या घटनांना सध्याची जीवनशैली आहार आणि ताण-तणाव प्रामुख्याने कारणीभूत आहे. अश्या हृदयाबाबतच्या समस्या टाळण्यासाठी जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची गरज असते. आम्ही असेच काही जीवनशैली संदर्भात टिप्स देणार आहोत ज्या हृदयरोगापासून वाचवण्यास मदत करतील.

व्यायाम

निरोगी व्यक्तीने दररोज व्यायाम रोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम केल्याने हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.तसेच ही समस्या असणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. निरोगी व्यक्तीने सकाळी लवकर उठून चालायला किंवा पाळायला जाणे असा व्यायाम करावा. जर वजन जास्त असेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एरोबीक्स पोहणे हे प्रकार देखील या बाबतीत फायदेशीर ठरतील.

वजन कमी करावे

अतिरिक्त वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्याचा प्रयन्त करावा. यासाठी तज्ज्ञाचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फास्ट फूड टाळण्याचा प्रयत्न करावा. आहारामध्ये चरबी व मीठ कमी करावे. फायबर व कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात घ्यावेत. प्रकृतीला कोणत्या प्रकारचे डाएट योग्य आहे हे जाणून घेऊन त्याचा अवलंब करावा मनाने डाएट ठरवू नये.

आहार

आहारात पालेभाज्यांचा सूप, सॅलडचा जास्तीत जास्त समावेश करावा. मासे, टणक कवचाची फळे म्हणजे नटस, ऑलिव्ह ऑईल, ओमेगा असे तीन प्रकारचे फॅट असणारे पदार्थ खाणे सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या यांच्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

मानसिक ताण

हल्ली कामचा ताण, स्पर्धा अश्या अनेक कारणांमुळे मानसिक ताण येतो. याकरता कोणत्या गोष्टींचा जास्त विचार करू नये,हा काम व्यतिरिक्त लोक काय म्हणतील हा असच का म्हणाला ? अश्या गोष्टींचा देखील जास्त विचारा करू नये. कुटूंबाला देखील वेळ द्यावा. मानसिक ताण कमी होण्यासाठी घ्यान धारणेचा अभ्यास हा उत्तम उपाय आहे.

झोप

स्वस्थ व निरोगी हृदय ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्ण झोप घेतल्यास ताण कमी होतो. व उच्च रक्तदाबाचे प्रमाणही कमी होते.

व्यसने टाळा

धूम्रपान व मद्यपान हृदयाला हानीकारक असते. या तणावपूर्ण जीवनात धूम्रपान व मद्यपानाचे प्रमाण वाढत चालले आहे.

औषेधे वेळच्यावेळी घेणे

हृदयरोग असणाऱ्या आणि मधुमेह तसेच किडनीचा अश्या प्रकारचे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या-वेळी घ्यावी.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon