Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

तुमच्या मनात सुद्धा वडील होण्याआधीच्या या भीती आहेत ना ?

पालक होणे हे एक सुदैवच असते आणि सोबतच एक महत्वाची जबाबदारी देखील. मुले पालकांकडे बघून मोठी होतात, पालकांचेच अनुकरण करतात म्हणून पालकांनी त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवणे गरजेचे बनते. जसे आई होण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीच्या मनात असंख्य प्रकारच्या शंका आणि विचार धावत असतात तसेच वडील होण्यापूर्वी देखील पुरुषांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती आणि विचार डोकावत असतात.

आई जसा विचार करते तसा विचार बाबा कदाचित करत नाहीत. वडील होण्या आधी पुरुषांच्या मनात भीती तर असतेच सोबत त्यांना अनेक प्रकारच्या शंका देखील असतात. काय होईल आणि कसे होईल या विचारांनी त्यांचे मन भरलेले असते. या लेखात आम्ही तुम्हाला तुमच्या पतीच्या मनात वडील होण्या आधी कोणत्या प्रकारचे विचार येतात या विषयी सांगणार आहोत.

१. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत का ?

बाळ होण्याआधी त्याविषयी प्लॅनिंग करणे अतिशय गरजेचे असते कारण बाळासोबत अनेक जबाबदार्‍या देखील येतात. घरातला खर्च तुमच्या गरोदरपणापासूनच वाढलेला असतो आणि एकदा बाळ आले की तो खर्चाचा आकडा वाढतच जातो.

याशिवाय त्यांना अशी देखील भीती असते की उद्या जाऊन त्यांच्या पाल्याच्या गरजा ते पूर्ण करू शकतील की नाही.? एक चांगला बाबा होण्याची क्षमता त्यांच्यात आहे की नाही? तुमच्या पतीच्या मनात या प्रकारची शंका किंवा भिती असेल तर त्यांच्याशी जाऊन बोला, चर्चा करा.

२. माझ्या खासगी आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल कसा जमेल ?

गरोदर असताना स्त्री स्वतः सोबत घरातल्या इतर सदस्यांची देखील काळजी घेतच असते. नवऱ्याने देखील बायकोची काळजी घेतली पाहिजे. गर्भवती असतांना नवऱ्याचा आधारही तितकाच महत्वाचा असतो. प्रसुतीच्या वेळेला नवऱ्याने हजार असावे असे देखील प्रत्येक स्त्रीला वाटते. या सगळ्यामध्ये पुरुषांच्या मनात हे खाजगी आयुष्य आणि ऑफिसमधले काम कसे सांभाळायचे याचा ताण असतो.

ऑफिसमधून रजा मिळाली नाही तर ? याची चिंता देखील त्यांना असते. अशावेळी तुमच्या पतीशी शांतपणे बोला. त्याला धीर द्या आणि सगळे नीट होईल असा सकारात्मक विचार करायला सांगा. नवऱ्याने देखील वेळेची गरज समजून घेऊन ऑफिस मधील सगळे पेंडिंग काम आधीच पूर्ण करणे आणि सुट्ट्या प्रसुतीच्या दिवसासाठी राखून ठेवण्याची प्लानिंग करायला हवी.

३.बाळ म्हणजे पसारा आणि गोंधळ.

वडिलांना सुद्धा या गोष्टीची चिंता असते की बाळ आल्यावर घरात सगळीकडे त्याच्या नॅपी, दुधाच्या बाटल्या आणि खेळणी पडलेली असणार. बाल रडले की सगळ्या घरात आवाज करणार. घरात शांतता नसणार आहे याची पूर्वतयारी होणाऱ्या सगळ्याच बाबांना करावी लागते. ही सगळ्याच पुरुषांच्या मनातली भीती असते.

असे असले तरीही या सगळ्या गोष्टींचा बाबांना विसर पडतो जेंव्हा ह्यापेक्षा मोठे चित्र – एका सुखी कुटुंबाचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येते तेंव्हा !

सगळ्यांनीच लहानांनी असा गोंधळ घरात घातलेला असतो त्यामुळे ही गोष्ट समजून घेणे तितकेसे अवघड नाही. तुमच्या बाळासोबतच्या या क्षणांना आनंदाने सामोरे जा कारण भविष्यात तुम्ही या दिवसांना खूप मिस करणार आहात!

४. रात्रभर झोप येणार नाही?

झोपणे कोणाला आवडत नाही? पण घरात बाळ आल्यानंतर हे तितकेसे सोप्पे नसते. बाळ रात्री रडायला लागले की जवळपास सगळ्या घराला ते उठवते.

यात योग्य हेच ठरेल की तुम्ही बाळासोबतच उठा. सोबतच तुमच्या पतीला या गोष्टीची भीती असते की रडायला लागल्यावर बाळाला उचलतांना जर त्याला त्यांच्याकडून काही इजा झाली तर ? म्हणून तुम्ही तुमच्या पतीला बाळाला कसे उचलायचे, कसे कडेवर घ्यायचे याविषयी आधीच समजावून सांगा. मनात भीती नसेल तर ते देखील बाळाल उत्तम सांभाळू शकतात.

५. आयुष्य पूर्वीसारखे राहील का ?

पालक झाल्यावर आयुष्य नक्कीच बदलुन जाते. शनिवार आणि रविवार म्हणजे सुट्टीचा आनंद घेण्याऐवजी घरात बाळाशी बोलणे त्याला सांभाळणे आणि फार तर फार झोपण्यात जातो. अर्थातच पुरुषांना बाहेर फिरणे आवडते आणि बाळ आल्यामुळे कदाचित त्यांच्या तुमच्या सोबतच्या डिनर डेटस् आणि पार्टी करण्यावर बंधने येऊ लागतात. तुमच्या पतीला त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर अशा गोष्टींमुळे ताण येऊ शकतो.

या बदलांसोबत समरसून जाण्याचा त्यांचा प्रयत्न देखील चालू असतोच. ही नवीन जीवनशैली सांभाळण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्या. या गोष्टींवर चर्चा करून तुम्ही नक्कीच त्यांना ताणातून बाहेर काढू शकता.

६. वागण्यात बदल आणि कामजीवनातील चिंता.

आई झाल्यानंतर एका स्त्रीच्या स्वभावात अनेक बदल घडून येतात. मूड बदलणे तर नेहेमीचेच होऊन जाते. या बदलामुळे नवरा-बायकोच्या नात्यातही दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्यासोबत तुमच्या पतीला देखील या गोष्टीची चिंता असते.

नात्यातला दुरावा आणि त्यातही तुम्ही सतत बाळाच्या मागे त्याला सांभाळण्यात गुंतलेला असता त्यामुळे तुमच्या दोघांमधल्या कामजीवनासंबंधित चिंता देखील त्यांना असते कारण रात्री थकून तुम्ही झोपून जाता. तुमच्यातील या असमतोलामुळे पतीच्या मनात काळजी येणे साहजिक आहे, तुम्ही या विषयी सांगून त्यांची चिंता दूर करू शकता. 

स्त्रियांप्रमाणेच पुरुषांना देखील पालक होण्याची चिंता आणि भीती मनात असते. फक्त स्त्री प्रमाणे त्यांना हे बोलून दाखवता येत नाही. एक जोडीदार म्हणून तुम्हीच त्यांच्याशी बोलून समजूतदारपणा दाखवू शकता.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon