Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

हिवाळ्यात अशी घाला बाळाला अंघोळ

हिवाळ्यात जेव्हा सगळीकडे थंडगार हवा पडलेली असते तेव्हा तुमच्या बाळाला नेहमी उबदार ठेवण्यासाठी विविध सोपे उपाय करून पाहा. नव्याने पालक झालेल्यांना विशेषत: काळजी असते ती म्हणजे स्वच्छतेची. शाररिक स्वच्छतेतील सर्वांत मोठा महत्वाचा भाग म्हणजे अंघोळ असते. काही पालकांना असे वाटते की, बाळा दिवसातून दोनदा अंघोळ घातली म्हणजे चांगली स्वच्छता होते पण हा त्यांचा गैरसमज असतो.

तज्ज्ञांच्या मते, बाळाला आठवड्यातून तीनवेळा अंघोळ घालणे योग्य असते.खरंतर बाळाच्या शरीरासाठी दररोज अंघोळ घालणे अपेक्षित नाही. विशेषत: हिवाळ्यात जेव्हा त्यांची त्वचा जास्त संवेदनशील आणि कोरडी असते. याचा अर्थ तुम्ही त्यांची स्वच्छता करू नये असे नाही तर त्यांची त्वचा जास्त मऊ सौम्य ठेवणे आवश्यक असते. यासाठी खाली दिलेल्या टिप्स लक्षात ठेवल्यास हिवाळ्यातही बाळाची काळजी तुम्ही नीट घेऊ शकाल.

- कडक हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते त्यामुळे तुमच्या बाळाचे अंघोळीचे एक वेळापत्रक निश्चित करा. यामध्ये आठवड्यातून जास्तीत जास्त तीन वेळा त्याला अंघोळ घाला.

- अंघोळ घालण्यापूर्वी गरम पाण्यात तुमचे कोपर बुडवून पाहा. हे पाणी खूप कढत गरम असून चालत नाही तर ते कोमट असावे.

- बाळाला जर हिवाळा म्हणून कडक पाण्याने अंघोळ घातल्यास त्याच्या त्वचेतील नैसर्गिक तेलही तुम्ही कमी करता. बाळाच्या अंघोळीची वेळ फक्त दहा मिनिटे असावी.

- थंडीच्या दिवसात बाळाला थोडीे सुद्धा गार हवा लागून देऊ नका,यासाठी अंघोळ झाल्यानंतर लगेच टॉवेलमध्ये गुंडाळून खोलीत न्यावे.

*काय करू नये*

१) हल्ली बहुतेक माता बाळाची स्वच्छता करताना वाइप्सचा वापर करतात. या वाइप्सनी बाळाची टेरी,मांडी,पाय,डोके,मान,हात पुसले जातात. थंडीच्या दिवसात त्यांचे अंग पुसताना गरम पाण्याचा वापर करतात. या कृतीमुळे त्यांची त्वचा कोरडी पडू शकते आणि रॅशेस येऊ शकतात.

२) दररोज गरम पाण्याने अंघोळ घातल्यास त्वचा कोरडी पडण्याबरोबरच त्यातील नैसर्गिक ओलावादेखील कमी होतो. अशा प्रकारे बाळाच्या त्वचेत ओलावा राहण्यासाठी मॉईश्चराजरचा वापर करावा लागेल.

३) सातत्याने तुम्ही जर लहान मुलांच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला तर त्यांची त्वचेला धोका संभवतो. मुलांसाठी कधीही रसायनयुक्त साबण वापरू नये.

४) सतत कोरडेपणा राहिल्याने त्वचेवर रॅश उठणे, खाज,गजकर्ण, त्वक्षा रुक्ष बनते.

क्यूट मातांनो, सध्याच्या कडाकाच्या थंडीत आपल्या चिमुकल्याची काळजी घ्यायला  तयार राहा.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon