Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

ही कामे करा करा आणि वजन कमी करा

 एकतर घरातली आणि ऑफिसची कामं तरी होतात. पण घरातली काही रोजची कामं  करून देखील वजन कमी करू शकता आणि फिट राहू शकता. त्यासाठी जिमलाच जायला हवं असं नाही. आणि यामध्ये स्त्री-पुरुष असा काही फरक नाही ही कामे जो कोणी करेल त्याचे वजन नक्की कमी होण्यास मदत होईल. ही  कामे कोणती आणि ती किती कॅलरी बर्न करतात हे आपण पाहूया. 

१. लादी पुसणे. 

मॉपने किंवा खाली वाकून लादी पुसल्याने ४२ कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

२. स्वयंपाक करणे.

५ मिनिटे पोहोण्याने ३६ कॅलरी बर्न होतात, तितक्याच कॅलरी स्वयंपाक केल्याने बर्न होतात. याशिवाय स्वत: स्वयंपाक तयार केल्याने तो आरोग्यदायी बनेल.

३. बाथरूम स्वच्छ करणे.

 

या घरगुती गरजेच्या स्वच्छतेमुळे ४६ कॅलरी बर्न होऊ शकतात, साधरणतः १० जोर बैठका  काढल्याने इतक्या कॅलरी बर्न होतात. 

४. कपड्यांना इस्त्री करणे

या कामातही उभे राहून हातांची हालचाल होत असल्याने २८ कॅलरी बर्न होतात.

५.भांडी घासणे.

उभे राहून भांडी घासताना हातांची हालचाल होते. त्यामुळे २८ कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

टीप -प्रसूतीनंतर लगेच आणि गरोदरपणात ही कामे करू नका 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon