Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

आहार आणि हृदयविकार ह्याविषयी थोडेसे . . .

निकृष्ट आहार हेच व ह्यामुळेच आजारपण येते? असे नाही होत. आणि जीवनाची प्रत जर सुधारायची असेल तर खाण्याच्या सवयीत बदल करणे हा एक मार्ग आहे. तसेच योग्य आहाराने शरीराची रोग बरे करण्याची सर्व यंत्रणा कार्यान्वित होते. आता हृदयविकार आणि खाण्याचा खूप जवळचा संबंध आहे. तेव्हा ह्याविषयी tinystep मराठीकडून जाणून घेऊ.

१) निरोगी आणि कार्यक्षम राहण्यासाठी योग्य असा आहार घ्यायला पाहिजे. हे आता आपल्याला माहीत आहे. काही विशेष परिस्थितीमध्ये आहारात बदल करायला हवे, त्या त्या परिस्थतीनुसार आहार घ्यायला हवा, हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. उदा. कावीळमध्ये तेलाचे पदार्थ खाऊ नये. मधुमेहाच्या रुग्णाने साखर, गूळ, खाऊ नये. गर्भवती स्त्रियांनी भरपूर फळे, दूध आणि पौष्टिक आहार घ्यावा.

२) हृदयरोग असणाऱ्यांनी कोलेस्टेरॉल खाऊ नये, हे आता बहुतेक सर्वाना माहीत असते. पण कोलेस्टेरॉल जोडीलाच संपृक्त स्निग्धांश एवढंच नव्हे तर असंपृक्त स्निग्धांशही (वनस्पतीजन्य तेल) जास्त खाऊ नये हे मात्र अजूनही खूप लोकांना माहीत नाही.

३) आपल्या शरीरातच कोलेस्टेरॉल तयार केले जात असल्यामुळे आहारात कोलेस्टेरॉल खाऊन शरीरात तयार होणाऱ्या कोलेस्टेरॉलमध्ये भर घालू नये.

४) ज्या पदार्थामुळे कोलेस्टेरॉल निर्माण होईल असे पदार्थपण आहारातून वज्र्य करावेत. (काही पदार्थामध्ये कोलेस्टेरॉल निर्माण करणारा संपृक्त स्निग्धांश असतो. (saturated fat) बहुतेक सर्व प्राणिजन्य पदार्थामध्ये संपृक्त स्निग्धांश (saturated fat)असते तर वनस्पतीजन्य पदार्थामध्ये संपृक्त स्निग्धांश कमी असतात. दूध, मटण, चिकन, लोणी, अंडय़ातला बलक, (पिवळा भाग) यांसारख्या पदार्थामध्ये कोलेस्टेरॉल असते आणि संपृक्त स्निग्धांशही असतो. शेंगदाणा तेल, करडईचे तेल अशा प्रकारच्या तेलांमध्ये कोलेस्टेरॉल फार कमी असते किंवा नसते पण थोडय़ा प्रमाणांत संपृक्त स्निग्धांश असतो.

५) हृदयरोग्यांनी अशा तेलाचा वापर कमी करावा. आहारात कोलेस्टेरॉल वज्र्य करावे आणि चरबी किंवा स्निग्धांश अगदी थोडय़ा प्रमाणात घ्यावे. साय, तूप, लोणी, चीज यांसारखे पदार्थ वज्र्य करावेत.

साय काढलेले दूध आणि त्यापासून बनवलेले दही, ताक घेण्यास हरकत नाही.

ह्याने तुम्हाला हृदविकारापासून सुटका तर होईल पण आहारामुळे चांगले आरोग्य मिळेल. आणि ज्यांना ही माहिती हवी असेल त्यांना नक्कीच शेअर करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon