Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

तुम्हांला सतत चॉकलेट,चिप्स जंकफूड खावेसे वाटते का ? मग हे नक्की वाचा

तुम्ही असा कधी विचार केला आहे की कधी-कधी आपल्याला काही गोष्टी खाण्याची इतकी इच्छा होते कि गरोदर स्त्रीला देखील डोहाळे लागल्यावर होत नसेल. कधी-कधी या तीव्र इच्छेमुळे काही वेळापुरते अस्वस्थ व्हायला होते. जो पर्यंत पदार्थ तुमच्या हातात येत नाही तो पर्यंत तुम्हाला चैन पडत नाही, याचा अर्थ असा होतो की आपल्या आहारांतून काहीतरी कमी झाले आहे. कोणतीतरी पोषणमूल्ये कमी झाली आहेत. आणि सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे हे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा असेही सूचित करते की काही आपल्याला आरोग्यविषयक काही समस्या निर्माण झाली आहे किंवा होणार आहे.

या लेखात, आपण अश्या काही अन्नपदार्थाविषयी जाणून घेणार आहोत जे तुम्हांला तुमच्यामध्ये काय समस्या निर्माण झाली आहे किंवा होणार आहे किंवा आहारात कश्याची कमतरता आहे हे जाणून घेण्यास उपयुक्त ठरले

१.चॉकलेट खावेसे वाटणे

एखाद्या पदार्थां तीव्र खाण्याची इच्छा होणे हे मायग्रेन होण्याची पहिली पायरी मानण्यात येते. साधारणतः चॉकलेट खाण्याची चॉकेलट युक्त पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते. अशी इच्छा वारंवार होणे हे मायग्रेनचे लक्षण असाव शकते

२. गोड आणि साखर असलेले पेय

सतत गोड खाण्याची इच्छा होणे सतत बाथरूम ला जावे लागणे अश्यावेळी तुम्ही तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण जाणून घेणे आवश्यक असते. कदाचित ही लक्षणे डायबिटीस किंवा प्रि-डायबिटीसची लक्षणे असू शकतात.

३. बर्फ खाण्याची इच्छा होणे

कोणत्याही प्रकारचे पोषण मूल्य नसलेले पदार्थ खाण्याची इच्छा होणे. बर्फ खाण्याची इच्छा होणे,माती किंवा कागद खाणे अशी लक्षणे लोहाची कमतरता असताना दिसण्याची शक्यता असते.

४. तेलकट आणि खारट

तुम्हांला जरा तेलकट किंवा चिप्स खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर कदाचित तुमच्या शरिरातील पाण्याची पातळी कमी झाली असू शकते. कारण, ज्यावेळी शरीरातील द्रव्ये आणि इलेक्ट्रोलाइट्स यांचा समतोल राहत नाही त्यावेळी असे काहीतरी खाण्याची इच्छा होते. जसे चिप्स. कधीकधी ताण-तणावामुळे देखील तुम्हाला खारट पदार्थ खावेसे वाटू शकते.

५. जंक फूड

खूप कमी झोप तसेच तुम्ही ताण-तणाव अथवा मानसिक समस्या तुम्हाला जंक फूडच्या आहाराला उत्तेजन देऊ शकते. झोप पूर्ण होत नसल्यामुळे तुम्ही चांगला आहार निवडण्याच्या ऐवजी तुम्ही काहीतरी पटकन खाता येईल असे आणि आपण केवळ असे काहीतरी खातो.

६. माती-खडू, पाटीवरची पेन्सिल

माती-खडू, पाटीवरची पेन्सिल असे प्रकार खावेसे वाटले तर साधारण कॅल्शियमची आणि मिनरल्सची कमतरता असल्याचे मानण्यात येते

७. मसालेदार चटपटीत खावेसे वाटणे

मसालेदार चटपटीत खावेसे वाटणे याचा अर्थ तुमच्या थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला असण्याची शक्यता असते. तसेच जर तुमची मनस्थिती चांगली नसेल तर अशा वेळी तुम्हांला मसालेदार खाण्याची इच्छा होऊ शकते.

८. मांसाहार-मटण,मासे व अंडी

तुमच्या शरीराला प्रोटीन,कॅल्शियम व ओमेगा-३ फॅटी अॅसिड ची गरज असते.जर तुम्हाला रेडमीट खावेसे वाटत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात लोह व झिंकची कमतरता आहे

९. कडकडून भूक न लागणे / भूक न लागणे

कडकडून किंवा भूक न लागणे हे पोट साफ नसण्याचे प्राथमिक लक्षण असते.

महत्वाचे

वरील गोष्टी वाचून एकदम घाबरून जाण्याची गरज नाही. वरील गोष्टी तुम्हांला मार्गदर्शक म्हणून दिलेल्या आहेत.कधी-कधी काही पदार्थ खाण्याच्या इच्छे मागे काही कारण नसण्याची शक्यता देखी असू शकते. परंतु जर सतत असे होत असेल तर मात्र या गोष्टीवर लक्ष ठेवणे अवश्यक असते. तसेच गरोदरपणात काही असे काही पदार्थ खाण्याची इच्छा कदाचित डोहाळे  परंतु तुम्हांला  काही शंका वाटल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून शंकेचे निरसन करू शकता 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon