Link copied!
Sign in / Sign up
25
Shares

हे बाळ त्याच्या आईच्या गर्भाशयातून ही वस्तू पकडून बाहेर आले!

जेव्हा डेक्स्टर टायलरने त्याच्या लहान मुलाने, बंद मुठीमध्ये मिरेना कॉइल पकडून जन्म घेतला, तेव्हा त्याने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्काच दिला! आई लूसी हेलेनने तिच्या नवजात अर्भकाचा कॉपर टी पकडलेला हा फोटो शेअर केला आणि तो अल्पावधीतच प्रसिद्ध झाला; आतापर्यंत तो ७२,००० वेळा शेअर झालेला आहे. परंतु हे कसे काय झाले?

कॉपर टी किंवा मिरेना कॉइल हे एक इंट्रायुटेरिन डिव्हाईस (IUD) असून, हे महिलांसाठीचे गर्भनिरोधक आहे. हे (नावाप्रमाणेच) 'टी' आकाराची वस्तू आहे आणि ती तांब्याच्या तारेमध्ये गुंडाळलेली असते. ही वस्तू गर्भाशयामध्ये सरकवली जाते आणि कॉपर टीच्या टोकाला असलेली छोटी प्लॅस्टिकची दोरी गर्भाशय ग्रीवेपासून योनीपर्यंत अडकवली जाते. सामान्यतः ही वस्तू ५ वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक काळही सुरक्षा प्रदान करते.

यातील विरोधाभास असा की, ज्या बाळाचा गर्भनिरोधक वापरुनही जन्म झाला, ते त्याच्या हातात तीच वस्तू घेऊन बाहेर आले; जे त्याचा जन्म रोखायचे काम करणार होते!

आईने विनोदाने आपल्या बाळाच्या फोटोचे कॅप्शन 'मिरेना (कॉपर टी) फेल' असे ठेवले आणि नंतर बाळाचे वजन ४.११ किलोग्रॅम असल्याचे सांगितले. तसे पाहता, कॉपर टी नाळेच्या मागे सापडली होती आणि डॉक्टरांनी बाळ जन्मतानाच ती काढून टाकली होती.

बाळ डेक्स्टर हे त्यांचे तिसरे अपत्य आहे आणि तो C- सेक्शन/ सिझेरियन द्वारे जन्माला आला. सामान्यतः कॉपर टी या ९९% प्रभावी मानल्या जातात, पण डेक्स्टर हा नक्कीच त्या १% मध्ये असला पाहिजे! डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार- 'दैव याच्या पाठीशी होते.' खरेच, नाही का?

तुम्हाला अशाच काही विचित्र आणि आश्चर्यजनक गोष्टी माहिती आहेत का? असल्यास आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल!

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon