Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

कोणतीही लिपस्टिक लावताय ? लिपस्टिकचे हे दुष्परिणाम तुम्हांला माहिती आहेत का ?

https://www.tinystep.in/blog/he-ahet-lipstiche-dhushprinam-in-marathi

सुंदर दिसण्यासाठी काही सौदर्यप्रसाधनांचा वापर बहुतांश स्त्रिया करतात. ती सर्व उत्तम दर्जाची, गुणवत्तेची याकडे आपला कटाक्ष असतो. अत्यंत चिकित्सा करून नावाजलेल्या कंपन्यांची उत्पादने आपण खरेदी करतो, वापरतो. रोजच्या आयुष्यात अगदी संपूर्ण मेकअप नाही केला तरी किमान लिपस्टिक तर सहजच लावतो. त्यामुळे साधा चेहराही आकर्षक दिसू शकतो. त्यामुळे विविध रंग, छटांच्या लिपस्टिक आपण स्त्रिया वापरतो. आपल्या आवडत्या लिपस्टिकमुळे कधी तरी दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल असे सांगितले तर. पहिल्यांदा तर ही गोष्ट खरीच वाटणार नाही त्यातही उगाच काही वदंता असल्याचे मानू. पण अनेक संशोधनानुसार अगदी ब्रांडेड लिपस्टिक आणि लिपग्लॉस मध्येही घातक धातू असतात. लिपस्टिकमध्ये शिसे, कॅडियम, क्रोमियम, अ‍ॅल्युमिनिअम आणि लेड सारखे घातक धातू असतात. त्यामुळे काही जीवघेणे आजार जडू शकतात.

शिसे

एका अभ्यासानुसार बहुतेक सर्वच कंपन्यांच्या लिपस्टिकमध्ये शिश्याचे प्रमाण खूप जास्त होते. शिसे मानवी शरीरासाठी विघातक आहे. त्यामुळे व्यक्तीची प्रतिकार क्षमता घटते. मज्जासंस्थेवरही याचा परिणाम होता. परिस्थिती गंभीर होते जेव्हा व्यक्तीला कर्करोग होण्याचा संभव असतो. शिसे एकाग्रता, स्मरणशक्ती तसे बुद्ध्यांकही कमी करते. त्यामुळे व्यक्ती चिडचिडी होते. शिवाय प्रजनन क्षमतेवरही याचा प्रभाव पडू शकतो.

क्रोमियम

काही महिला लिपस्टिक लावतात आणि दिवसातून ती नीट रहावी म्हणून पुन्हा पुन्हा लावतात त्यांच्यासाठीही हे घातक आहे. कारण अशा प्रकारे पोटात लिपस्टिक जाण्याचे प्रमाण अधिक असते. लिपस्टिकमधील क्रोमियमच्या अति प्रमाणामुळे पोटात ट्यूमर होऊ शकतो. तसेच नुकत्याच काही चाचण्यांमधून कर्करोग होऊ शकतो असेही निदान करण्यात आले आहे.

अल्युमिनिअम

मानवी शरीरासाठी अल्युमिनिअम नुकसानकारक आहे. पोटाचा अल्सर, पक्षाघात वगैरे रोग तसेच अल्युमिनिअमचे प्रमाण वाढल्याने शरीरातील फॉस्फेट कमी होते.

कॅडमिअम

कार्सिनोजेन नावाने ते ओळखले जाते. त्यामुळे श्वसन संस्था आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. ज्या महिलांना मूत्रqपडांचे आजार किंवा मधुमेह आहे त्या महिलांनी यापासून बचाव केला पाहिजे कारण कॅडमिअम मूत्रqपडात जमा होते आणि त्यामुळे मूत्रqपड निकामी होऊ शकतात. तसेच गर्भारपणातही काही धोके संभवतात. जसे जन्मावेळी कमी वजन, विकास कमी होणे तसेच वर्तणूक विषयक समस्या मुलांना भेडसावू शकतात. तसेच महिलांमध्य स्तनाचा कर्करोगही होऊ शकतो.

मॅग्नेशिअम

लिपस्टिकमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाणही खूप अधिक असते. लिपस्टिकच्या माध्यमातून ते शरीरात जाते. दीर्घ काळ ते शरीरात जात राहिले तर त्यामुळे मज्जासंस्थेवरही परिणाम होऊ शकतो.

प्रिझरव्हेटिव्ह 

लिपस्टिक अधिक काळ टिकावी यासाठी त्यात प्रिझरव्हेटीव्ह वापरले जातात. त्यांचे प्रमाण जास्त असू शकते. काही प्रिझव्र्हेटीव्ह जसे पॅराबेन्स चा शारिरीक दुष्परिणाम होतो. पॅराबिन्स हे कर्करोगाला कारणीभूत ठरु शकतात. विशेषतः स्तनाचा कर्करोग. तसेच काही वेळा लिपस्टिक लावल्यानंतर काही दुष्परिणामही होतात जसे डोळ्याला कंड सुटणे, कफ, छातीत घरघरणे आणि त्वचेला खाज येणे.

मुलांसाठी घातक

लिपस्टिक मध्ये घातक धातू असल्याने मुलांवर त्याचा खोल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एखाद वेळी म्हणजे षठी सहामासी लिपस्टिक लावणे ठीक आहे पण मुलांसाठी नियमित वापर नकोच. काही वेळा ओठ चावल्याने किंवा लिपस्टिक खाल्ल्याने उलट्या होणे किंवा जुलाब होणे असा त्रास होऊ शकतो. काही वेळा लिपस्टिकमधील विषारी घटक त्यांच्या पोटात जाऊ शकतात. त्यामुळे ते टाळलेलेच बरे.

कमी दर्जाची लिपस्टिक टाळा-

लिपस्टिक वापरताना कमी गुणवत्तेची वापरूच नये. विशेषतः गर्भवती असताना कमी दर्जाची लिपस्टिक वापरू नये. कमी दर्जामुळे बाळाला त्रास होण्याची शक्यता असते.

मुदतीनंतर वापर नको

सौदर्यप्रसाधने किती काळ वापरली पाहिजेत याची काही मुदत असते. लिपस्टिकही किती काळ वापरावी त्याची मुदत असते. लिपस्टिक योग्य प्रकारे ठेवल्यास ती मुदतीनंतरही चांगली राहू शकते. लिपस्टिकचा पोत किंवा टेक्सर बदलू लागले तर मात्र ती टाकून द्यावी. कारण त्यातील प्रिझरव्हेटीव्ह खराब होऊ लागतात. तसेच लिपस्टिक लावल्यानंतर ओठाला खाज येणे किंवा संसर्ग होणे असा त्रास होत असेल तरीही ती लिपस्टिक फेकून द्यावी.

लिपस्टिक मधील घटकांचे होणारे दुष्परिणाम जाणून घेतल्यानंतर लिपस्टिकचा वापर कमी किंवा बंद केला पाहिजे. पण जर लिपस्टिक लावायची असेल तर ती उत्तम दर्जाची, गुणवत्तेची आणि घटक द्रव्यांची माहिती घ्यावी. तसेच दिवसभरात केवळ दोन वेळाच लिपस्टीक लावावी. त्यापेक्षा अधिक लावू नये. तसेच लिपस्टिक किंवा एकंदर मेकअप चेहऱ्यावरून काढणे आवश्यक आहे. तसेच ओठांना साजूक तूप किंवा नारळ तेल, व्हॅसलिन याने नियमित मसाजही करावा त्यामुळे ओठांचे आरोग्य चांगले राहते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon