Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

हळदीच्या दुधाचे फायदे

 

                      हळद ही जंतुनाशक असते. हळद आणि दुधाचा विविध प्रकारे विविध आजारांवर उपयोग होतो हळद आणि दूध हे काही आजारांमध्ये आणि समस्यांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते आणि काही समस्यांच्या बाबतीत हळदीचा गुण इअर औषधांपेक्षा लवकर येतो. हळदीचे दूध कोणत्या-कोणत्या समस्यांवर उपयुक्त ठरते ते आपण पाहणार आहोत

१. वेद्नाशामक

शरीराचा कोणताही प्रकारच्या वेदना होत असतील किंवा शरीरातील कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. अशा वेळेस रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध घ्यावे.

 
२. सुंदर त्वचा

अशी म्हण आहे पी हळद (हळद आणि दूध ) हो गोरी हळद घातलेले दुध प्यायल्याने त्वचेबाबत त्वचेच्या खाज, इंफेक्शन या सारख्या बऱ्याच समस्या दूर होतात. तसेच त्वचेत एक चमक निर्माण होते.

३ . सर्दी आणि कफ 

सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कफ निघून जातो. थंडीमध्ये हळदीचे दूध प्यायल्याने यापासून तुमचा बचाव होतो.

४. हाडांच्या मजबुतीसाठी 

दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.

५. शांत झोपेसाठी

शांत झोप न येणे ही सध्याची अनेकांची समस्या आहे . पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.(शक्यतो जेवणात दही किंवा आंबट पदार्थ खाल्लेला नसावा)

६. अतिरिक्त चरबी

हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.

ज्यांना दूध पचण्याबाबत काही समस्या आहेत त्यांनी शक्यतो हे उपाय टाळावे अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने दुधाऐवजी पाण्याचा वापर करावा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon