Link copied!
Sign in / Sign up
160
Shares

जाणून घ्या हेअर स्पा म्हणजे काय ? आणि तो घराच्या घरी कसा करावा.

ज्यावेळी तुम्ही पार्लर मध्ये किंवा स्पा मध्ये जाता त्यावेळी तुम्हांला तिथे विविध प्रकारचे स्पा करून देण्यात येता. यापैकी हेअर म्हणजेच केसांचा स्पा म्हणजे काय आणि हा घराच्या-घरी कश्याप्रकारे करतात हे आपण पाहणार आहोत.

हेअर स्पा म्हणजे काय ?
 

यामध्ये आपल्या डोक्याला छान मसाज करून देते. त्यानंतर गरम पाण्यानं हेअर वॉश दिला जातो. मसाजसाठी वापरण्यात येणारी सुगंधी द्रव्यं,तेल केसांचा पोत सुधारण्यासाठी, आवश्यक पोषकत्त्वयुक्त असतात. नंतरच्या हेअरवॉशमुळे आधी केलेली ट्रीटमेंट केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते. मसाजमुळे रिलॅक्स वाटतं आणि केसांचा पोतही सुधारतो. काही हेअर स्पा ट्रीटमेंटमध्ये केसांचं स्मूदनिंगही करून दिलं जातं.

अश्या प्रकारे करा घराच्या-घरी हेअर स्पा
१. हेअर मसाज (केसांना तेलाने मसाज)

        १. सर्वप्रथम ऑलिव्ह,बदाम,आवळा किंवा नारळाचे तेल गरम करा. आणि या या तेलाने हलक्या हाताने डोक्यांची मसाज करा. मुळापर्यंत तेल जाईल अशापद्धतीने केसाची मसाज करा.आणि तेल मुरावा. मसाज करतात मसाज करताना हाताच्या बोटाने हळुवार मसाज करावी.

२. तेल चांगल्या प्रकारे मुरल्यावर एक मोठा टॉवेल गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या. आणि नंतर तो केसांना बांधून घ्या. त्याला १० ते १५ मिनिटे ठेवा. असे केल्याने तुम्ही जे तेल लावले आहे ते केसांच्या मुळापर्यंत चांगल्याप्रकारे जाईल.यामुळे केस नरम होतात. किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर केसांना हलकेच स्टीम द्या अगदी ५ मिनिटे आणि केस फडक्याने किंवा टॉवेलने गुंडाळा.

२. हेअरवॉश (केस धुणे)

केसांना स्टीम देऊन झाल्यावर तुमच्या नेहमीच्या शाम्पूने कोमट पाण्याने केस धुवा तुम्ही जे वापरता तेच शेम्पू अति गरम आणि अति थंड पाण्याने केस कडक होतात.

३. कंडिशनिंग

शाम्पूने केस धुवून झाल्यावर थोडेसे कोरडे करा. (पाणी गळणार नाही इतके कोरडे पण ओलसर )अर्धवट ओलसर केसांना केसांना कंडिशनर लावा आणि काही वेळ तसेच ठेवा.

४. हेअरमास्क

कंडीशनींग नंतर केस स्वच्छ धुवा आणि त्यानंतर बाजारात विविध हेअर मास्क मिळतात ते लावा किंवा घरगुती हेअर मास्क लावा. जसे मोठे केस असतील तर ३ बटाटाच्या रस १ अंड ३चमचे मध एकत्र करून हेअर मास्क बनवा.आणि ८-१० मिनिटे हा मास्क असू द्य नंतर कोमट पाण्याने केस धुवा.

अश्या प्रकारचे हेअर स्पा महिन्यातून एकदा केल्याने केस मजबूत होतीलच आणि डोके देखील शांत होऊन प्रसन्न वाटेल. स्पा करताना घरगुती किंवा केमिकल फ्री प्रोडक्ट वापरल्यास उत्तम 

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon