Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

गुप्त रोग म्हणजे काय ? आणि त्याविषयी असणारे गैरसमज ......

       गुप्त रोग म्हणजे काय ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो पण त्याचे उत्तर कुणाकडेच नसते. आणि ह्याविषयी इतका गोंधळ प्रत्येकाच्या मनात आहे की, गुप्त रोग म्हणजे काहीतरी भयानक असेल अशीच भावना जनमानसात आहे. तेव्हा ह्याविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे. काही संसर्गजन्य रोगांच्या समूहाला गुप्तरोग म्हणतात. दूषित व्यक्तीशी संभोग केल्यामुळे होणाऱ्या या रोगांना रतिरोग असेही म्हणतात. कधीकधी हे रोग संभोगाशिवाय होऊ शकतात. तेव्हा ह्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

       १) सामान्य गैरसमज गुप्तरोगाबाबत
 

नपुंसकता, लैंगिक दुर्बलता, शिघ्रपतन अशा लैंगिक तक्रारींबाबतही बहुतांशी वेळा लोक गुप्तता पाळतात पण, यांना गुप्तरोग म्हटलं जात नाही. हस्तमैथुनालाही काहीजण गुप्तरोग मानतात. हस्तमैथुन हा गुप्तरोग तर नाहीच पण, साधा रोगही नाही. हस्तमैथुन हा एक सामान्य प्रकार आहे तो अपायकारकही नाही आणि त्यासाठी कुठल्या औषध उपचारांचीही गरज नाही.

२) नेमका कशाला गुप्त रोग म्हणता येईल

लैंगिक संबंधातून विशिष्ट जंतू किंवा विषाणू फंगसची लागण झालेल्या रोगांना गुप्तरोग म्हणतात. हर्पिस, सिफिलिस, गनोरोया, ह्या काही गुप्तरोगांची नावं आहेत. कंडोम वापरल्याने गुप्तरोग होत नाहीत ह्याविषयी खूप डॉक्टर सहमत नाही आहेत. कारण कंडोमचा वापर करूनही एड्स आणि इतर गुप्तरोग झालेले असंख्य उदाहरण बघायला मिळतात. गुप्तरोगांपासून दूर राहायचं असेल तर स्वत:च्या पत्नी व्यतिरिक्त इतर कुणाशीही लैंगिक संबंध न ठेवणं हाच उत्तम उपाय म्हणून स्वतःच्या पत्नीशिवाय कुणाशीच संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नका.

३) ह्याबाबत वेगळे मत (गुप्त रोग म्हणजे काय)

दूषित व्यक्तीच्या इतर संसर्गजडित भागांशी संबंध आल्यानेही हे रोग होतात. दूषित व्यक्तीचे चुंबन घेणे, दाईच्या अंगावर पिणाऱ्या दूषित अर्भकापासून तिच्या स्तनास संसर्ग होणे, दूषित व्यक्तीने वापरलेली कपबशी किंवा कपडे योग्य प्रकारे न धुता वापरणे इत्यादींमुळे हे रोग होण्याचा संभव असतो. डॉक्टर, परिचारिका वगैरेंनी योग्य काळजी न घेतल्यास रोग्याच्या दूषित रक्तस्त्रावापासून हातावर किंवा डोळ्यावर परिणामाने रोग जडू शकतो. गर्भात असलेल्या गर्भास, विशेषेकरून गर्भधारणेच्या उत्तरार्धात उपदंश (गरमी) होते. प्रसूतीच्या वेळी दूषित मातेच्या जननेंद्रियाचा स्त्राव लागून मुलास रोग होतो. उदा. नवजात नेत्रशोथ (डोळ्यांना पूयप्रमेहामुळे येणारी सूज).

४) मराठी विश्वकोशात ह्यांनाही गुप्त रोग म्हटले आहे

(१) उपदंश, (२) पूयप्रमेह (परमा), (३) मृदुरतिव्रण, (४) लसीका कणार्बुदी वंक्षण रोग, (५) यॉज (उपदंशासारखाच परंतु सौम्य रोग), (६) जघन कणार्बुद, (७) ट्रिकोमोनियासिस (ट्रिकोमोनास नावाच्या चाबकासारखे शेपूट असलेल्या सूक्ष्मजंतूमुळे होणारा योनिमार्ग आणि मूत्रमार्ग यांचा शोथ म्हणजे दाहयुक्त सूज). या सर्व रोगांवर स्वतंत्र नोंदी मराठी विश्वकोशात इतरत्र दिल्या आहेत

५) सोप्या रीतीने गुप्त रोग म्हणजे काय कसे समजून घेता येईल
 

लैंगिक संबंधातून ज्या रोगांचा संसर्ग होतो त्या रोगांना गुप्तरोग म्हणतात. ह्याबाबत असे आहे की, हे रोग ती व्यक्ती गुप्त ठेवते म्हणून त्याला गुप्त असे नाव पडले आणि लैंगिक संसर्ग झाल्यामुळे त्याला गुप्त रोग म्हणतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon