Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

गुळाचे आरोग्यविषयक हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का ?

        पूर्वी बाहेरून कुणी आले कि पाणी आणि गूळ दिला जात असतं यामुळे थकवा कमी होऊन,श्रमामुळे झालेली झीज भरून निघत असतं. गूळ-पाणी हे आपल्याकडचं एनर्जी ड्रिंक म्हणायला हरकत नाही. गूळ हा आरोग्यस इतका गुणकारी असतो.हल्ली स्वयंपाकात गुळाचा वापर कमी होऊन साखरेचा वापर वाढला आहे गूळ हा साखरेपेक्षा जास्त गुणकारी असतो. अश्या या गुणकारी गुळाचे आरोग्यविषयक फायदे कोणते ते आपण पाहणार आहोत.

      १.रक्तशुद्धी

नियमित आणि योग्य प्रमाणात गुळाच्या सेवनाने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते. रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. तसेच गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते

२.पाचनशक्ती आणि बद्धकोष्ठता

गुळ आपल्या पाचन शक्तीची ऊर्जा वाढवते आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होते. हिवाळ्यात गुळ जरूर खावा. कारण त्यावेळी शरीराची पचन क्रिया मंदावते आणि गुळामुळे ती पूर्ववत होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळ तर रामबाण उपाय आहे. या करता जेवणानंतर एक छोटासा गुळाचा खडा खावा.

३. लोहाच्या कमतरतेवर उपयुक्त

गुळात प्रचंड प्रमाणात लोह आहे. तो खाल्ल्याने शरीरातील लोह कमतरता भरून येते. त्याच्या सेवनाने लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते व अशक्तपणा जाणवत नाही. थकवा आणि ऊर्जेची कमी असे विकार गुळ खाल्ल्याने होत नाहीत.

४. अशक्तपणावर गुणकारी

शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो.तसेच शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो

५. मासिकपाळीविषयक समस्या

मासिक पाळीच्यावेळी तीळ-गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते.पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.

६. त्वचेविषयक समस्या

रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.परंतु हे सेवन प्रमाणात असावे अन्यथा गुळाच्या अति सेवनाने रक्त दूषित होऊन अंगावर फोड ,गळू येण्याचा धोका असतो. तसेच ज्यांना त्वचेचे रोग असतील त्यांनी गूळ खाऊ नये.

७. अर्धशिशी 

 

ज्या लोकांना अर्धशिशीचा त्रास आहे, त्यांनी गुळ आणि शुद्ध तूप एकत्रित रिकाम्या पोटी खाल्ल्याने आराम मिळतो. गुळ हा अशावेळी लाभदायक ठरतो.

 

 

८.खोकल्यावर गुणकारी

घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.तसेच खूप खोकला झाला असल्यास गूळ हळदीची गोळी करून रात्री झोपायच्या आधी घ्यावी व गरम पाणी प्यावे.

महत्वाचे- ज्यांना जुना त्वचेचा आजार आहे तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी प्रमाणातच गुळाचे सेवन करावे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon