Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

गुलाब पाण्याने त्वचा निखळ बनवा !!!


१) या निसर्गनिर्मित औषधाला कोणतेही ‘साईड इफेक्टस्’ नसतात. शरीराच्या दैनंदिन चयापचय क्रियेत निर्माण होणार्‍या दूषित रासायनिक पदार्थांना नाहीशी करणारी अँटिऑक्सिडंटस् यामध्ये मुबलक प्रमाणात असतात.

२) दिवसभराच्या कामाने येणारा मज्जासंस्थेचा थकवा आणि शीण नाहीसा करण्याचे विशेष गुणधर्म यात सापडले आहेत.

गुलाबपाणी दाहकविरोधी गुणधर्माने परिपूर्ण आहे. त्यामुळे खाज सुटल्यास आणि भाजलेले असल्यास गुलाबपाणी लावल्याने दाह कमी होतो.

३) सुंदर चेहर्‍याच्या निगेसाठी अतिशय चांगले ‘क्लीनझिंग एजंट’ म्हणून ते उपयुक्‍त ठरते. म्हणजे आपल्या त्वचेवरील घाण, मळ दूर करते.

४) दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहर्‍याला लावल्यास त्वचेवरील डाग मिटवण्यास ते अतिशय लाभदायक ठरते.

५) गुलाबपाणी शॅम्पूनंतर केसांना लावल्यास एक चांगल्या कंडिशनरचा फायदा मिळतो. घरगुती ब्यूटी पॅक्समध्ये वापरून त्वचा ताजीतवानी बनते.

६) आपल्या शरीरावरील त्वचा अनेक बाह्य गोष्टींपासून आपल्या शरीराचे रक्षण करते. यामध्ये जशी उन्हाची तीव्रता, सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायोलेट किरणोत्सर्ग येतात, तसेच हवेतून येणारी धूळ, असंख्य रोगजंतू आणि रासायनिक पदार्थ यांचाही समवेश होतो. गुलाबपाण्याचा अँटिऑक्सिडंटस्सारखा गुणधर्म या गोष्टींपासून आपले यथायोग्य संरक्षण करतो.

७) त्वचेची आग शमवते. उतारवयात त्वचेमध्ये इलास्टेज आणि कोलाजिनेज ही रसायने वाढतात आणि त्यामुळे त्वचा राठ बनते. गुलाबपाणी या रसायनांना प्रतिबंध करते आणि वाढत्या वयातदेखील चेहर्‍यावरील सूरकुत्या दूर करून चेहरा टवटवीत ठेवते.

८) लिंबामध्ये आम्लीय आणि गुलाबपाण्यात गारवा देण्याचे गुण असतात. जेव्हा हे दोन गुण सोबत येतात, तेव्हा त्यांची परिणामकारकता जास्त वाढते. चेहर्‍यावरील मुरमे कमी होण्यासाठी हे एक उत्तम मिश्रण आहे. लिंबाचा रस एक भाग आणि गुलाबपाणी दोन भाग घ्यावे. हे मिश्रण चेहर्‍याला लावून पंधरा मिनिटांनी पाण्याने धुवावे.

९) संत्र्याच्या छिलक्यांमध्ये गुलाबपाणी मिसळून लावावे. याची एक पेस्ट तयार होते. ती जिथे पिंपल्स आहेत त्या जागी लावावी आणि थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवावी. चंदन पावडर आणि गुलाबपाणी मिसळून घ्या. यामुळे चेहरा उजळतोही आणि पिंपल्सची समस्याही दूर होते. चंदन पावडरमध्ये अँटिबॅक्टेरियाचेही गुण असतात.

मुलतानी मातीचा वापर गुलाबपाण्यासोबत त्वचा उजळ करण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

१०) आल्यासोबत गुलाबपाणी लावणे उपयुक्‍त ठरते. आल्यामध्येसुद्धा अँटिबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्याचा उपयोग मुरुमे होऊ नयेत आणि ती रोखली जावीत यासाठी होतो.

ग्लिसरीनसोबत गुलाबपाणी एकत्र करून चेहर्‍याला लावल्यास, चेहर्‍याचा पोत सुधारण्यास उपयोगी ठरतात. यामुळे कोरडा झालेला चेहरा चमकदार तर दिसतोच; पण उजळण्यासही मदत होते. वय वाढले की, चेहर्‍यावर सूरकुत्या येण्यास सुरुवात होते. यामुळे आपले वय झाले हे सहज लक्षात येते. मात्र, वाढते वय समजू नये यासाठी चेहर्‍याला नियमित गुलाबपाणी आणि ग्लिसरीनचे मिश्रण लावावे. त्याचा चेहरा तरुण दिसण्यास फायदा होतो.

महत्वाची गोष्ट : 

गुलाबपाण्याचे हे फायदे नैसर्गिक स्वरूपात आढळून येतात. मात्र, आपण जे गुलाबपाणी वापरतो, ते शुद्ध स्वरूपात आहे ना? याची खात्री करून घेणे गरजेचे असते. त्वचेवर आणि बाह्य अंगावर वापरताना, आपल्याला गुलाबपाण्याची अ‍ॅलर्जी तर नाही ना? याची काळजी घ्यावी. अंतर्गत स्वरूपात घेताना, डोळ्यात वापरताना याबद्दल विशेष लक्ष देणे आवश्यक असते.

साभार - अविनाश भोंडवे 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon