Link copied!
Sign in / Sign up
45
Shares

ग्राइप वॉटरसंबधी या गोष्टी तुम्हांला माहिती आहेत का ?

            बाळाला काही झाले, बाळ रडत असले की त्याला ग्राइप वॉटर देण्याचा सल्ला बरेच जण देतात. तर जाणून घेऊया या ग्राइप वॉटरसंबधी काही माहिती 

ग्राइप वॉटर का देतात ?

पोटदुखी, दात येताना होणार त्रास, पोट बिघडणे, तसेच पचनसंस्थेच्या इतर तक्रारींसाठी लहान बालकांना ग्राइप वॉटर दिले जाते.बाळाच्या पोटात जमलेली हवा ढेकराच्या माग्रे वा गुदद्वारामाग्रे बाहेर काढण्याचे काम ग्राइप वॉटर पाजल्याने होऊ शकते.

ग्राइप वॉटरचा इतिहास

सर्वप्रथम एका इंग्रजी औषध निर्मात्याने इंग्लंडमध्ये १८५१ साली ग्राइप वॉटरचा शोध लावला. १८४० साली पूर्व इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये ‘फेन फिव्हर’ची लागण होत होती. त्याच वेळी तेथे हिवतापाचीही साथ होती. या दोन्ही रोगांवरील उपचारांतून प्रेरणा घेऊन वुडवर्डने ग्राइप वॉटरची निर्मिती केली. फेन फिव्हरसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाने बालकांमधील पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात असे त्याचे निरीक्षण होते.

मूळ ग्राइप वॉटरमधील घटक

वुडवर्डच्या मूळ ग्राइप वॉटरमध्ये ३.६ टक्के अल्कोहोल, बडीशेपचे तेल, सोडिअम बायकाबरेनेट, साखर तसेच पाणी हे घटक होते. १८७६ मध्ये वुडवर्डने ग्राइप वॉटर या ट्रेडमार्कची नोंदणी केली. या ग्राइप वॉटर मध्ये प्रत्येक देशानुसार यातील घटक बदलताना दिसले तरी त्यातील सोडिअम बायकाबरेनेट, बडीशेप/ बाळंतशेप यांचे तेल हे घटक मात्र सर्वत्र आढळून येतात

ग्राइप वॉटर संबधी इतर माहिती

मोठी माणसेही पोटाच्या तक्रारींसाठी ग्राइप वॉटर घेतात. परंतु विविध रोगांवर ‘ग्राइप वॉटर’ हा परिणामकारक उपचार आहे, असे संशोधनाद्वारे सिद्ध झालेले नाही. म्हणूनच अमेरिकेमध्ये १९९३ मध्ये ग्राइप वॉटरवर बंदी घालण्यात आली. आता अमेरिकेत ग्राइप वॉटर एक औषध म्हणून नव्हे तर पूरक आहार घटक या स्वरूपात विकले जाते.जर्नल ऑफ रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनमध्ये २००० साली प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार वुडवर्डच्या ग्राइप वॉटरमुळे लहान बाळांच्या पोटदुखीवर होणारे परिणाम हे बाळाला कोणताही द्रवपदार्थ दिला तरी तसेच आढळून येतात.

ग्राइप वॉटरची आवश्यकता

खरे तर बाळाला गॅस होऊ नये याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिकरित्या गॅस बाहेर पडल्यास योग्य ठरते. त्याकरता बाळाला पाजून झाल्यावर किंवा भरवून झाल्यावर थोड्यावेळ उभे धरवे किंवा कडेवर घेऊन ढेकर येत नाही तोपर्यत पाठीवरून सावकाश हात फिरवावा. तसेच इतर घरगुती उपाय जसे कोमट फडक्याने पोट शेकणे बेंबी जवळ थोडासा हिंगाचा लेप लावणे असे घरगुती उपाय जर लागू पडले नाही तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने ग्राइप वॉटर द्यावे.

ग्राइप वॉटर कसे दयावे.

१. ग्राइप वॉटरच्या बाटलीवरील प्रमाणानुसार आणि डॉक्टरांच्या सल्यानुसार ग्राइप वॉटर बाळाला द्यावे.

२. साधारणतः बाळाला खूप गॅस झाला असेल आणि काही केल्या गॅस बाहेर येत नसेल तर २४ तासांत ३ ते ४ वेळा बाळाला ग्राइप वॉटर पाजावे. परंतु याबाबत डॉक्टरांचा, बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

३. जर बाळाला ग्राइप वॉटरमधील कोणत्या घटकांची ऍलर्जी असेल किंवा किडनी संबधी काही समस्या असतील तर ग्राइप वॉटर देणे टाळावे अथवा बालरोगतज्ज्ञाच्या सल्ल्या शिवाय देऊ नये.

४. एक महिन्याच्या आतील बाळाला ग्राइप वॉटर देऊ नये. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon