Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

गरोदर असताना ग्रीन-टी पिणे किती योग्य आहे ?

ग्रीन टी प्यायल्याचे अनेक फायदे होतात. मात्र गर्भावस्थेत अधिक प्रमाणात प्यायल्यास ग्रीन टी मधील कॅफिन आणि कॅटेचिन हे घटक गुंतागुंत निर्माण करु शकतात.

गर्भावस्थेत किती प्रमाणात प्यावा ग्रीन टी

आरोग्य तज्ज्ञांच्या मते गर्भावस्थेत कॅफिनच्या सेवनाचे एकुण प्रमाणच कमी करायला हवे. ग्रीन टी मधून मिळणारे असो किंवा इतरही काही स्रोत आहेत जसे चॉकलेट, कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पेये या सर्वांमधून  मिळणारे प्रमाण हे दिवसागणिक २०० मिलिग्रॅमहून कमीच असावे. उदाहरणार्थ अन्न सुरक्षा जाणकारांनी  ४ कप इतकेच ग्रीन टी चे सेवन क़रण्याची विशेषत्वाचे शिफारस केली आहे.

अर्थात गर्भावस्थेत किती प्रमाणात कॅफेनचे सुरक्षितपणे सेवन करु शकता ते प्रमाणही सापेक्ष आहे.

एकावेळी किती प्रमाणात चहाचे सेवन करता आणि त्यासाठी किती चहापत्ती वापरता, बनवण्याचा कालावधी, आणि आपल्याकडील चहाचा प्रकार या सर्वांवर ग्रीन टी च्या एका कपातील कॅफेनची पातळी अवलंबून असते.

विविध ब्रँडस आणि विविध प्रकार यांच्यामध्ये कॅफिन ची पातळी वेगवेगळी असते. सर्वसाधारणपणे सरासरी ३०-५० मिलिग्र्रॅम प्रति एक कप ते जास्तीत जास्त ७० मिलिग्रॅम प्रति कप इतकी कॅफिनची पातळी असते. कॅफिनचे कमी प्रमाणात सेवन करणे सुरक्षित असते.

आपण वापरत असलेल्या ग्रीन टीमध्ये काही औषधी वनस्पती मिसळल्या असतील म्हणजे ग्रीन टी हर्बल प्रकारातील असेल तर आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. अशा प्रकारे दोन गोष्टी एकत्र असणारा चहा घेणे विशेषतः गर्भावस्थेच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये सुरक्षित आहे का याविषयी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अर्थात आपला वैद्यकीय इतिहास याच्याबरोबरच किती प्रमाणात ग्रीन टी चे सेवन करत आहात यावरूनच काही वनौषधी समस्या निर्माण करु शकतात का हे ठरवता येते.

गर्भावस्थेशी संबधित ग्रीन टीचे काही विशेष फायदे नाहीत 

गर्भावस्थेशी निगडीत ग्रीन टी तील पोषक घटक किंवा त्याचे फायदे मिळणार नाहीत याची चिंता करु नका. उदा. नॉशिया येत असेल तर आल्याचा चहा प्यावा किंवा तिसऱ्या त्रैमासिकात गर्भाशयाच्या आरोग्यासाठी आवश्यक रेड रासबेरीच्या पानांचा चहा उपयुक्त असतो असे आपल्याला पारंपरिक  उपचार पद्धतीत सांगितले जाते. या उपायांप्रमाणे ग्रीन टी मध्ये गर्भावती मातेसाठी किंवा तिच्या गर्भातील बाळासाठी काही विशेष फायदे किंवा घटक नाहीत.

एकुण शरीर आरोग्यासाठी त्याचे इतर फायदे मिळवू शकता. त्यामुळे गरोदारपणानंतर आपल्याला वाटत असेल तर ग्रीन टी पिऊ शकतो.

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदे

१. दिवसातून काही कप म्हणजे सर्वसाधारणपणे तीन कप ग्रीन टी प्यायल्यास शरीरातील ट्रायग्लिसराईडस् आणि कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी झाल्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

२. ग्रीन टी मधील पॉलीफिनॉल फ्री रॅडिकलमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करु शकते आणि वृद्धत्व रोखू शकते पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे कर्करोग टाळण्यासाठी ग्रीन टी चा फायदा होतो.

३. अल्सरेटीव्ह कोलायटिस आणि क्रोहन्स रोग यासारख्या इन्फ्लमेटरी बॉवेल सारख्या प्रदाहक आतड्याच्या रोगांमध्ये दाह कमी करण्यास मदत करतो.

४. मधुमेहातही रक्तातील शर्करा नियमित ठेवण्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

५. मद्यपानामुळे जे विषारी घटक जातात आणि नुकसान करतात त्यापासून ग्रीन टी यकृताचे संरक्षण करु शकतो.

६. शरीराची चयापचय शक्ती वाढण्यासाठी आणि त्यामुळे वजन कमी होण्यासाठी ग्रीन टीचा फायदा होऊ शकतो.

त्यामुळे ग्रीन टी घेणे फायदेशीर आणि सुरक्षित असले तरीही गर्भधारणा झाल्यानंतर ग्रीन टी किती प्रमाणात घ्यावा  हे डॉक्टरांकडून तुमच्या प्रकृतीनुसार जाणून घेणे गरजेचे असते.

 गरोदरपणात ग्रीन टी सेवन करण्याचे प्रमाण जाणून घेणे आवश्यक का आहे ?

१. ग्रीन टी मधील ईजीसीजी फॉलेटची पातळी बदलू शकतात

ग्रीन टी मधील अधिक प्रमाणातील कॅटेचिन एपिगालोकॅटेचिन (ईजीसीजी) कर्करोग विरोधी घटक आहे पण हाच घटक गर्भवतीसाठी समस्या निर्माण करु शकतो.

कॅटेचिन एपिगालोकॅटेचिन (ईजीसीजी) हा शरीरातील फॉलेटच्या पातळीवर विपरीत परिणाम करतो. ग्रीन टी अधिक प्रमाणात सेवन करणाèया स्त्रियांवर जपानमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार ग्रीन टी किंवा ओलॉग टी (कॅटेचिन एपिगालोकॅटेचिन (ईजीसीजी) चे जास्त प्रमाण असलेला दुसरा प्रकार) फॉलेटच्या पातळीवर परिणाम करत असल्याचे सिद्ध झाले. ज्या महिलांनी ग्रीन टी किंवा ओलॉँग टी चे अतिसेवन म्हणजे ५७.३ मिलीलीटर प्रति १००० किलोकॅलरी केले होते त्यांच्यातील फॉलेट ची पातळी ज्या स्त्रियांनी कमी प्रमाणात ग्रीन टी घेतला त्यांच्या तुलनेत कमी होती.

ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे कारण गर्भातील बाळाच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि एकूण आरोग्यदायी गर्भावस्थेसाठी फॉलेटची आवश्यकता असते. विशेषतः फॉलेटच्या अपुèया पुरवठ्याचा परिणाम म्हणजे स्पाईन बायफाईड सारख्या मज्जासंस्थेच्या दोष उत्पन्न होता किंवा गर्भाशयातील बाळाच्या वाढीवर निर्बंध आणू शकतात. यामुळे प्रीक्लॅम्पसियाचा (गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात उच्च रक्तदाबामुळे किंवा गर्भजल कमी होण्यामुळे होऊ शकणारी गुंतागुंतीची परिस्थिती)धोका वाढू शकतो तसेच ही परिस्थिती गर्भवतीसाठी जीवघेणीही ठरु शकते.

२. कॅफेनच्या अतिसेवनामुळे गर्भपाताचा धोका

ग्रीन टीमधून शरीरात जाणाऱ्या कॅफिनमुळे गर्भावर काही परिणाम होईल का असा विचार करत असाल तर त्याचे उत्तर होय असेच आहे. कॅफेनमुळे बाळाभोवती नाळ गुंडाळली जाऊ शकते. जास्त प्रमाणात कॅफेन चे सेवन केल्यास बाळाचे जन्मतःच वजन कमी असू शकते. त्यामुळे बाळाला काही आरोग्यविषयक समस्या भेडसावू शकतात जसे बाळाला श्वसन करण्यास त्रास होणे, मेंदूत अंतर्गत रक्तस्राव किंवा अचानक बाळाचा मृत्यु होण्याची शक्यता असते.

कॅफिनच्या अतिरिक्त सेवनामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. त्यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात ग्रीन टी चे सेवन करणे नियंत्रित ठेवावे. ग्रीन टी पिणे बंदच करुन टाकावे असे नाही तर तो मर्यादित प्रमाणात सेवन करावा.

३.पोट बिघडणे, मॉर्निंग सिकनेसचा त्रास वाढणे

अति ग्रीन टी सेवनाचे निश्चितच काही दुष्परिणाम होतातच आणि जेव्हा गर्भवती असाल तेव्हा तर ते परिणाम अधिक धोकादायक ठरू शकतात. अतिकॅफेनचे सेवन केल्यास चक्कर येऊ शकते. उलटी किंवा जुलाब होऊ शकतात आणि पोट बिघडू शकते. त्यामुळे मॉर्निंग सिकनेस ने वैतागलेल्या गर्भवतीला याचा निश्चितच त्रास होतो. काही जणींना डोकेदुखी, अनिद्रा आणि छातीत धडधडणे आदी त्रास होतात. अगदी काहीच नाही तर खूप चिडचिड होऊ लागते.

 जर पोटाला सूज येणे किंवा उलट्या होणे असा त्रास होते असेल आणि खूप प्रमाणात ग्रीन टी प्यायला आहे हे माहित असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे हे लक्षात ठेवा. ही लक्षणे कॅफेनच्या विषबाधेची असू शकतात. अगदी सौम्य लक्षणे दिसू लागताच ग्रीन टीच्या सेवनात कपात करा. अशा काळात सावधपणे गोष्टी हाताळा आणि ग्रीन टी पिणे पूर्णपणे बंदच करून टाका.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon