Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

तान्ह्या ते ६ वर्षाच्या बाळांना होणारा … गोवर


या महिन्यात (जानेवारी) ते एप्रिलच्या च्या दरम्यान काही भाग उन्हाळा तर काही भाग हिवाळा. गोवर हा नावाचा विष्णूजन्य आजार होतो. ६ महिन्याचा ते सहा वर्षाच्या बाळांना होत असतो. सुरुवातीचे ८ ते १० दिवस हा विषाणू बाळांच्या शरीरात वाढत असतो. आणि त्यानंतर त्या बाळांना ताप, खोकला सुरु होतो. तेव्हा ह्या गोवारीविषयी आपण ह्याब्लॉगमधून जाणून घेऊ.

१) सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा होणारा ह्या गोवर मध्ये. सुरुवातीला ताप व खोकला सुरु होतो. नाक - डोळ्यातून पाणी वाहू लागते. पाचव्या किंवा सहाव्या दिवशी ताप खूप वाढून जातो. आणि गोवरमध्ये सर्व शरीराला मुखत्व पाठीला व चेहऱ्याला लालसर पुरळ उठत जातात.

२) ह्या लालसर पुरळ उठल्यानंतर काही वेळा ५ ते ६ दिवसांनी हे पुरळ कमी होतात पण काहींचे कमी होत नाहीत. आणि ह्या पुरळ नाहीसे झाल्यावर शरीराची प्रतिकार शक्ती एकदम कमी होऊन जाते. आणि ह्याचमुळे गोवर होऊन गेल्यावर श्वास नलिकांना सूज येऊन जाते. कान फुटणे, जुलाब, हिवताप, मेंदूदाह, असे भयंकर आजार बाळांच्या मागे लागतात.

३) कारण मुळातच विकसित न झालेल्या प्रतिकार शक्तीत गोवर झाल्याने आणखी ती शक्ती क्षीण झाल्याने हे रोग होतात. त्यामुळे ह्या गोवरमध्ये व्यवस्थित लक्ष द्यावे. ह्यावर अजूनही औषध आले नाही.

४) म्हणून, गोवर हा लसीकरणाने प्रतिबंध करता येतो. त्यामुळे वयाच्या ६ व्या ते ९ व्या महिन्यात सरकारी हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटलमधून ही लस बाळाला द्यावी. (लस विषयी वेळापत्रक अगोदर दिलेच आहे ते तुम्ही बघू शकता.)

आणि १५ व्या महिने बाळाला झाल्यावर MMR या लसीतून गोवरचे बूस्टर दिले जाते. म्हणून ह्या विषयी खूप सावध आणि दक्ष असावे. पुढच्या भागात कांजिण्याविषयी . . . . . . . . . . . क्रमश

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon