Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

मग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल

Courtesy: www.google.com

अभिनंदन ! तुमचं आताच लग्न झाले असेल आणि नवीन आयुष्याला सुरवात केली असेल, आणि आत तुमच्या आयुष्यातील सुंदर दिवस सुरु झाले असतील आणि तुम्ही त्याचा आनंद घेत असाल तर आणि अजून लग्नला नुकतेच काही महिने झाली असले तरी लगेच नातेवाईक आणि मित्र-मैत्रीणचा गोड बातमी कधी देणार हा प्रश्न सुरु होतो..

अश्यावेळी या प्रश्नांना मजेशीर उत्तरे कशी द्याल याविषयी जाणून घेऊया…

१. जर तुम्हांला ज्यांची मुलांची लग्न झालेली आहेत आणि त्यांनी देखील गोड बातमीचा नंबर लावला नसेल किंवा गोड बातमी दिली नसेल तर मात्र तुमच्या हातात आयतं मिळतं, अश्यावेळी अगदी गमतीने तुमच्या मुलाने किंवा मुलीने नंबर लावला कि लगेच असे गमतीने बोलून मोकळे व्हावे.

२. ज्यावेळी तुमचे खूप उत्साही आणि खोचक मित्राने जर विचारलं मग काय प्लॅन आहे… म्हणजे खरा उद्देश मुलाचा प्लॅन काय असे म्हणायचे असते… अश्यावेळी त्याला तुमच्या करियरचे, उद्योग-धंद्याचे, ऑफिसचे बढती, या वर्षी फिरायला कुठे जाणार असे सगळे प्लॅन निरागसपणे सांगून मोकळे व्हावे यामुळे त्या व्यक्तीला आपण काय विचारलं काय आणि हा काय बोलतो याचा विचार करण्यात त्यांचा उत्साह कमी होऊन जातो…

३.ज्यावेळी काही अति उत्साही (खोचक ) लोकं मग गोड बातमी कधी असे विचारल्यावर त्यांना अक्षरशः सगळ्या गोड आणि आनंदाच्या बातम्या सांगायला सुरवात करा. यामध्ये त्यांना तुमची बढती, तुम्हांला मिळणार बोनस,राजकारणातल्या चांगल्या बातम्या आसपासच्या सगळ्या चांगल्या गोष्टी गोड गोष्टी त्यांना सांगून टाका.

४. काही लोकांना उगाच काहीतरी विचारायचे म्हणून जेव्हा मग गोड बातमी कधी असं विचारल्यावर त्यांना तुम्ही बातमी दिल्यावर किंवा तुझं लग्न झाल्यावर तुमच्या मुलाचे लग्न झाल्यावर किंवा एखादा नातेवाईक परदेशी जाण्याच्या प्रयत्नात असेल तर त्यांना तू परदेशी स्थयिक झाल्यावर असे बोलून त्या व्यक्तीची गंम्मत करावी

५. काही आगाऊ नातेवाईक काही प्रॉब्लेम आहे का हे जाणून घेण्यासाठी अगदी पिच्छा पुरवतात अश्यावेळी त्यांना तुम्ही एक छान गंमतीशीर उत्तर देऊ शकतात… त्यांना सांगायचे अहो अशी गोड बातमी लपून थोडी राहते… गोड बातमी असली कि दिसून येईलच तुम्हांला असे सांगून गप्प करा.

हि उत्तरे गंमतीशीर असली तरी घरातल्या काही जाणत्या लोकांच्या आणि तुमच्याविषयी आपुलकी असणाऱ्या व्यक्तींना दुखावू नका आणि त्यांचे अनुभवाच्या काही गोष्टी ऐकून घ्या. योग्य वयात मुलासाठी पर्यन्त केली कि मुल होण्यास समस्या निर्माण होत नाही अन्यथा नंतर त्रास होण्याची शक्यता असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon