Link copied!
Sign in / Sign up
23
Shares

घरगुती उपायांद्वारे गरोदर आहात का ते ओळखा

हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे. तुमची जर मासिकपाळी चुकली आहे आणि तुम्हांला खात्री करायची आहे कि खर्च आपण गरोदर आहोत की काही दुसरी समस्या आहे,आणि अश्या वेळी तुमच्याकडे प्रेग्नसी किट नाहीये किंवा त्याची तारीख उलटून गेली आहे (एक्सपायर) आणि तुम्हांला गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्हांला उपयुक्त ठरू शकतात. हे घरगुती उपाय पुढील प्रमाणे आहेत

१. साखरेद्वारे

  या टेस्टसाठी फार काही गोष्टीची गरज लागत नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या मूलभूत घटकांपैकी एक घटक म्हणजे साखर. या साखरेच्या आधारे आपण ही प्रेगन्सी टेस्ट करू शकतो. त्यासाठी तुम्हांला ३ चमचे (टीस्पून) साखरेची अवश्यकता आहे. आणि एक पांढरी वाटी, बाउलची आवश्यकता लागेल. ही तीन चमचे साखर पांढऱ्या बाउल मध्ये घ्या. आणि तुमच्या लघवीचा नमुना त्या साखरेत मिसळा . त्यानंतर पाच मिनिटे ते मिश्रण तसेच राहू द्या. जरसाखरेचे कण न विरघळता तशीच राहिली तर ते तुम्ही गरोदर असल्याचे दर्शवतात

२. ब्लिच टेस्ट

हा असा पदार्थ आहे हा बहुतेक घरात असतोच. परंतु या प्रकारची टेस्ट करताना तुम्हांला अत्यंत काळजीपूर्वक ही टेस्ट करणे गरजेचे असते.ब्लिच हाताळताना काळजी घेणे गरजेचे असते. एका स्वच्छ भांड्यामधे एक कप ब्लिचिंग पावडर घ्या. आणि त्यामध्ये तुमच्या लघवीचा नमुना मिसळा. आणि हे मिश्रण चांगल्या प्रकरे एकत्र करा. हे मिश्रण एकत्र करताना काळजी घ्या. जर या मिश्रणाद्वारे फेस तयार झाला तर तुमच्याकडे गोड बातमी असल्याचे समजावे.

३. टूथपेस्ट टेस्ट

हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. टूथपेस्ट फक्त दातच शुभ्र करत नाही तर तुम्हांला गोड बातमी देखील देते. टूथपेस्ट कश्याप्रकारे गोड बातमी देते हे आपण पाहूया. ही टेस्ट खूप सोप्पी आहे. तुमच्या लघवीचा नमुना एका स्वच्छ भांड्यात घ्या. नंतर त्यात दोन चमचे पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट मिक्स करा. १०-१२ मिनिटे ते मिश्रण तसेच राहू द्या. त्यानंतर किंवा त्यादरम्यान त्या मिश्रणाचा रंग जर निळसर व्हायला लागला तर तुम्ही आई बनणार आहात हे समजावे या टेस्टसाठी पूर्वी मिळायच्या तश्या पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट वापरावी.रंगीत टूथपेस्टच्या आधारे ही टेस्ट होणे मुश्किल आहे.या तीन प्रकारच्या टेस्टद्वारे तुम्ही घराच्या-घरी गरोदर आहात का नाही लक्षात येईल परंतु त्यानंतर तुम्हांला त्या गोष्टीची खात्री करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon