Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

अश्याप्रकारे बनवा घरगुती हेअर मास्क


केसांची वाढ नीट व्हावी त्यांना नीट पोषण मिळावा आणि त्यांचे आरोग्य राखले जावे यासाठी त्यांची स्वच्छता आणि निगा राखाण्याबरोबरच पोषण देणाऱ्या हेअर मास्कचा वापर करावा हे हेअर मास्क घराच्या घरी कसे बनवावे हे आपण पाहणार आहोत

१. खोबरेल तेल आणि मधाचा हेअर मास्क

साहित्य

१. अर्धा कप शुद्ध खोबरेल तेल

२. अर्धा कप मध

३. थोडेसे ऍपल सीडार व्हिनेगर

हे सर्व घटक एकत्र करा आणि हळुवारपाणे केसांना लावा. ८-१० मिनटे ठेवा आणि मग कोमट पाण्याने धुवा. या मास्कमुळे तुमच्या डोक्याच्या त्वचेला योग्य पोषण मिळते तसेच त्वचेतील स्निग्धता टिकून राहते. 

२. नारळाच्या दुधाचा हेअर मास्क

 

 

नारळाचे दूध घ्या आणि ते केसांच्या मुळांना हलक्या हाताने लावा. आणि हा मास्क असाच ३० मिनिटे ठेवा. आणि मृदु शाम्पूने धुवा. या मास्कने अत्यंत खराब केसांना पोषण मिळून केसांची वाढ उत्तम होतेच आणि कोंडा कमी होतो.

३. स्ट्रॉबेरी मास्क
 
साहित्य

१. स्ट्रॉबेरी ८

२. दोन चमचे मायोनीज

स्ट्रॉबेरी स्मॅश करून घ्या त्यात मायोनीज घालाल चमच्याने मिक्स करा आणि केसांना लावण्याआधी केस थोडेसे ओलसर करून घ्या आणि आणि हा मास्क केसांना लावा. हामी मास्क केसांना १५ मिनिटे तसाच ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवून घ्या.

४. अंड आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क

 

साहित्य

१ अंड

२ चमचे ऑलिव्ह ऑईल

१ चमचा व्हाईट व्हिनेगर (हवे असल्यास)

हे सगळे घटक एकत्र करा आणि २० मिनटे डोक्यावर लावून ठेवा. आणि नंतर धुवा . यामुळे केस चमकदार होतील.

५.केळं आणि मधाचा हेअर मास्क

 

साहित्य

१ केळं

२. १/४ पाव कप मध

३. अर्धा कप ताजे दही

केळ्याची पेस्ट करून त्यात दही आणि मध घाला चांगले मिक्स करा आणि केसांना लावा. यामुळे केसा घनदाट होतात. तसेच केस जर रुक्ष झाले असतील तर त्यातलं रुक्षपणा कमी होतो. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon