Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

या वर्षीच्या धुळवड-रंगपंचमीला अश्या प्रकारे घरच्या-घरी-नैसर्गिक रंग तयार करा घरच्या-घरी

होळी जवळ अली कि बाजारात पिचकाऱ्या रंग फुगे यायला लागतात पण  बाजारात मिळणारे रंग हे रसायन मिश्रित असतात असतात. आणि हे  रासायनिक रंग आपल्या शरीराच्या त्वचेला खूप घातक असतात. यामध्ये मर्क्युरी सल्फाइड,अ‍ॅल्युमिनियम ब्रोमाइड, सल्फेट असते. आणि ऑक्साइड असे आरोग्यास आरोग्यास घातक अशी रासायनिक द्रवे असतात.  अश्या रंगाच्या वापराने तुमच्या रंगाचा भंग होऊन बसेल आणि आणि शरीरावर काही घातक  परिणाम होतील म्हणून या वर्षी घरच्या-घरी नैसर्गिक घटकाच्या मदतीने रंग तयार करा. पण हे कसे करायचे हेच आम्ही सांगणार आहोत. 

१. लाल रंग 

हा जास्वंद, पळस किंवा गुलाबाच्या फुलांचा कुटून लगदा करून तयार करू लाल रंग करता येईल पण हे थोडे महाग पडेल त्यामुळे तसेच बीटाचा देखील वापर करता येईल

२. नारंगी रंग

बेलफळाची साल पाण्यात टाकून उकळविल्यास छान नारंगी रंग तयार करता येईल. 

३. हिरवा रंग 

हा हिरव्या पानांपासून तयार करता येतो. पालक भाजी तुम्ही पाहिली असेल. पालकाच्या पानांपासून हिरवा रंग तयार करू या. 

४. पिवळा रंग

पिवळ्या रंगासाठी हळद पावडर आणि दोन डाळीचे किंवा कुठलेही दुसरे पीठ वापरावे भाग पीठ यांचे मिश्रण पाण्यात ढवळले की झाला पिवळा रंग तयार

५. काळा रंग 

बुक्का पाण्यात मिसळला किंवा होळी तील विजलेली राख,आवळ्याचा कीस लोखंडी तव्यावर टाकून, पाण्यात उकळविल्यानंतर गडद काळा रंग तयार करता येईल. 

६. जांभळट रंग 

आपणास बिटापासून तयार करता येईल. किंवा जांभळाचा गर पाण्यात टाकून ढवळला तर मस्त लालसर जांभळा रंग तयार करता येतो 

कोरडे रंग वापरले तर उत्तमच. कोरड्या रंगासाठी वरील घटक वाळवून त्याची पावडर केल्यास कोरडा रंग वापरता येईल 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon