Link copied!
Sign in / Sign up
43
Shares

घामोळे का येते आणि त्यावरील घरगुती उपाय

 


उन्हाळा आला की घाम येण्याबरोबर सर्वांना एक त्रास होतो तो पुरळाचा. लहान असो किंवा मोठे अगदी लहान बाळालाही उष्णतेमुळे बहुतेकदा उन्हाळ्यात पुरळ येते. त्वचेशी निगडीत काही त्रासांना एकत्रितपणे घामामुळे येणाèया घामोळ्या असे म्हटले जाते. अति उष्ण आणि दमट वातावरणात राहाणाऱ्या लोकांना घामोळ्यांचा त्रास अधिक जाणवतो. अशा वातावरणात राहिल्याने खूप जास्त घाम येतो त्यामुळे घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि त्यामुळे घामोळ्या येतात.

घामोळ्या सर्वसाधारणपणे मानेवर तोंडावर, पाठीवर, छातीवर, खांद्यावर, कपाळावर आलेल्या दिसून येतात. घर्मग्रंथी फुटल्या की मग त्वचेवर लहान लहान छोटे लाल रंगाचे डाग दिसतात त्यामुळे त्वचेचा मुलायमपणा जाऊन ती खरबरीत लागते.

कारणे

घामोळ्या येण्याची काही महत्त्वाची कारणे आहेत जसे घाम येणे, घर्मग्रंथी बंद झाल्याने होणारा जीवाणूजन्य संसर्ग किंवा अविकसित घर्मग्रंथी त्याव्यतिरिक्त व्यक्तीशी निगडीतही काही कारणे आहे जसे अतिस्थूलपणा किंवा अतिवजन, अनारोग्यकारी जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी, मद्यपान, अतिधूम्रपान तसेच काही औषधांचे दुष्परिणाम त्याचबरोबर हल्लीच्या काळात तणावग्रस्त जीवनशैली, अति प्रमाणात तेलकट पदार्थ आणि जंक फूड चे सेवन करणे. तसेच अतिघट्ट कपड्यांमुळेही त्वचेला हवा न लागल्याने घामोळे येते.

लक्षणे-

सर्वसाधारणपणे घामोळ्यांची लक्षणे म्हणजे त्वचेवर लाल रंगाचे बारीक पुरळ येते, त्वचेला खाज येते, त्वचेचा दाह होतो. वातावरण बदलले किंवा उन्हाळा सुरु झाला की घामोळ्या येतात.

घामोळे न येण्यासाठी काय करावे

थंड वातावरणात राहाण्याचा प्रयत्न करावा किंवा वातानुकुलित वातावरणात रहावे. घामोळ्यांमुळे येणारी खाज कमी क़रण्यासाठी दिवसातून दोन तीन वेळा गार पाण्याने अंघोळ करावी.

उन्हाळ्यात सैलसर, सुती कपडे परिधान करावे आणि कृत्रिम धाग्याचे कपडे वापरु नयेत. जेणेकरुन हवा खेळती राहते

भरपूर पाणी प्यावे जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच रसदार फळे खावीत.

घामोळ्यांवर कोणतेही क्रीम किंवा तेल लावू नये त्यामुळे घर्मछिद्रे बंद होतील आणि समस्या आणखी वाढेल.

घामोळ्यांवर घरगुती उपाय कोणते-

घामोळे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यावर घरगुती उपाय निश्चितच उपयुक्त ठरतील.

१ घामोळ्या आलेली जागा सौम्य साबणाने धुवावी आणि ते हळुच टॉवेलने पुसावे. त्यामुळे त्वचा थंड होईल.

२. कोरफड- 

हे एक उत्तम औषध आहे. त्यामुळे घामोळे कमी होतात आणि खाज येणारी पुरळही कमी होते. कारण कोरफडीत दाह कमी करण्याचे आणि थंडावा देण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे कोरफडीचा गर घामोळ्यांवर लावल्यास त्वचेला गारवा मिळतो. अंघोळीनंतर लगेचच कोरफडीचा गर घामोळ्या आलेल्या जागी लावल्यास त्यामुळे लवकर आराम मिळतो. कोरफडीच्या पानांचा गर किंवा तयार जेल घामोळ्या आलेल्या त्वचेवर लावावे. दोन तास तसेच ठेवून नंतर गार पाण्याने धुवून टाकावे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी लावावे. याशिवाय कोरफडीच्या गरात किंवा जेलमध्ये एक चमचा हळद पावडर एकत्र करुन त्वचेवर लावा. एक तास तसेच ठेवून गार पाण्याने धुवावे. दिवसातून एक दोन वेळा हे मिश्रण लावावे. तसेच कोरफडीच्या गरात १ चमचा अॅूपल सायडर व्हिनेगर दोन तीन चमचे कोरफडीच्या गरात घालून ते मिश्रण घामोळे आलेल्या ठिकाणी लावावे. गार पाण्याने धुवावे.

३. बर्फाचे खडे-

 एखाद्या पातळ रुमालात बर्फाचे खडे बांधावेत. घामोळे आलेल्या जागी पाच दहा मिनिटे बर्फ लावावा. दिवसातून चार ते सहा वेळा बर्फाने शेकावे. जेणेकरून घामोळे वाढणार नाहीत.

४ ओटमील-

 एक कप ओटमीलची बारीक पावडर अंघोळीच्या टबातील गार पाण्यात टाका. चांगले हलवा जेणेकरून पाण्याचा रंग दुधी होईल. या पाण्यात ३० मिनिटे पडून रहावे. त्यानंतर मऊ टॉवेलने पुसुन घ्यावे. दिवसातून दोन वेळा अशा पद्धतीने अंघोळ केल्यास आराम पडेल.

५. कडुनिंब –

 कडुनिंबाच्या पाण्यात जीवाणुविरोधी गुण असतात त्यामुळे जंतु मारले जातात आणि इतर काही त्वचा रोगही बरे होतात. पुर्वी आपल्याकडे उन्हाळा सुरु झाल्यावर कडुनिंबाच्या पाण्याची झळवणी म्हणजे कडुनिंबाची पाने टाकून सूर्यतापी पाण्याने बाळांना अंघोळ घातली जात असे जेणेकरून त्यांना घामोळे निंकवा पुरळ येऊ नये. याचे कारण कडुनिंबाचे औषधी गुण. त्यातील दाह कमी करण्याच्या आणि घामोळे कमी होतातच शिवाय अँटीसेप्टिक गुणांमुळे खाज येणे, दाह होणे हे देखील कमी होते. तसाच वापर घामोळ्यांवरही केला जाऊ शकतो. त्याशिवाय मुठभर कडुनिंबाची पाने घेऊन त्यात ३ टेबलस्पून गुलाबपाणी टाकावे आणि बारीक पेस्ट करावी. जिथे घामोळे आले आहेत तिथे लावून एक तास तसेच ठेवा. त्यानंतर गार पाण्याने धुवून टाका. दिवसभरातून एकदा याचा वापर अवश्य करु शकतो.

बेकिंग सोडा

घामोळ्यांवर अत्यंत सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा. हा बहुतेकांच्या घरात सहज मिळतो. सोडा एक्स्फॉलिएqटग एजंट म्हणून काम करतो. बेकिंग सोडा मृत त्वचा पेशी काढून टाकतो तसेच त्वचेवरील धूळ इतर घाण काढून त्वचेची रंध्रे मोकळी करतो. जेणेकरून घामोळ्यांमुळे येणारी खाज आणि होणारा दाह थांबतो. 

त्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा एक कप थंड पाण्यात मिसळा. त्यानंतर एक स्वच्छ कपडा त्या पाण्यात बुडवा. पिळून घ्या. ते कापड घामोळे आलेल्या जागी पाच ते दहा मिनिटे तसेच ठेवा. दिवसातून चार पाच वेळा हा उपाय करावा.

चंदन पावडर-

चंदन हे थंड प्रकृतीचे असल्याने घामोळे येणाऱ्या ठिकाणी चंदनाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो.

त्यासाठी चंदन पावडर आणि गुलाब पाणी समप्रमाणात एकत्र करुन घामोळे आलेल्या ठिकाणी लावावे. सुकल्यानंतर गार पाण्याने धुवून टाकावे.

चंदन पावडर आणि कोथिंबीरीची पावडर प्रत्येकी दोन चमचे एकत्र करुन त्यात गुलाबपाणी मिसळावे. ही पेस्ट घामोळे आलेल्या जागी लावावी. वाळल्यावर त्वचा धुवून टाकावी आणि त्वचा पुसून घ्यावी. आठवडाभर दिवसातून दोन वेळा ही क्रिया करावी.

तसेच अंघोळीनंतर रोज चंदन पावडर अंगाला लावावी त्यानुळे घामोळ्यांमुळे होणारी खाज थांबेल.

मुलतानी माती

सौदर्योपचारातील ही माती पुरळ किंवा घामोळ्यांवर उपयुक्त ठरते. मुलतानी माती खाज आणि दाह कमी करण्यास मदत करते. त्यासाठी ५ टेबलस्पून मुलतानी माती घेऊन त्यात ५ चमचे गुलाबपाणी टाकून त्याचा लेप तयार करावा आणि घामोळे आलेल्या जागेवर लावावे. वाळल्यावर थंड पाण्याने धुवावे. दिवसातून एकदा हा लेप लावावा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon