Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

घडवून आणलेल्या प्रसववेदना : तुम्हाला माहित असायला हवे असे सर्व काही

        गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक स्त्री साठी वेगळा अनुभव असतो.त्याची एकमेकiशी तुलना करणे व्यवहार्य तर नाहीच पण चुकीचे हि आहे.गर्भावस्थेच्या काळ कसा असेल हे प्रत्येक स्त्रीचे मासिक चक्र कसे आहे यावर ठरते. म्हणजेच गर्भावस्था किती वेदनादायी,किचकट किंवा कालावधीची असेल हे तिच्या मासिक चक्रावर अवलंबून असते ,हे माहित असू द्या. गर्भावस्थे दरम्यान तुम्हाला काही गुंतागुंत जाणवत असेल तर अस्वस्थ होऊ नका. वैद्यक शास्त्रात दिवसेंदिवस होणाऱ्या प्रगतीमुळे जवळपास सर्वच समस्यांवर उपाय मिळू शकतात,यासाठी स्वतः माहिती मिळवा आणि जेव्हा तुम्हाला काहीही समस्या जाणवेल तुमच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांना जरूर भेटा.

या अवस्थेतील गुंतागुंत आणि क्लिष्टता याबद्दल बोलत असतांना सर्व मातांना जाणवणारी सामान्य समस्या म्हणजे कृत्रिम किंवा घडवून आणलेली प्रसूतिवेदना आणि नैसर्गिक प्रसूतिवेदना यापैकी एकाची निवड करताना होणारी द्विधावस्था आणि अशी परीस्ठीती निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात ज्यात वैद्यकीय आणि वैयक्तिक दोन्ही कारणांचा समावेश असू शकतो.

खाली दिलेली माहिती वाचून तुम्हाला लक्षात येईल की अनेक स्त्रिया नैसर्गिक प्रसूतिऐवजी कृत्रिम किंवा घडवून आणलेल्या प्रसूतीवेदनाचा अवलंब करण्याचा धोका का पत्करतात.

१]''या खास तारखेला माझ्या बाळाचा जन्मदिवस असावा.''

होय मैत्रिणींनो,आता विज्ञानातील प्रगतीमुळे सर्व शक्य आहे. तुमची नैसर्गिक प्रसूती होण्याची शक्यता अधिक असल्यास कृत्रिम प्रसूतिवेदनाचा अवलंब न करण्याचा सल्ला दिला जातो. तरीही तुम्हे बाळ कोणत्या दिवशी जगात येईल याची निवड तुम्ही करू शकता कारण,शेवटी हि फक्त तुमची पसंती महत्वाची आहे!

२] "डॉक्टर उपलब्ध नसणे.''

आता वेळेवर मदत उपलब्ध नसेल तरी काही अडचण नाही कारण,आप्तकालीन परिसस्थितीत तुमचे स्त्रीरोगतज्ञ स्वतःच्या वेळापत्रकानुसार प्रसूती केव्हा करायची हे ठरवू शकतात.

३] ''पुढच्या आठवड्यात माझ्या पतीची मिटींग आहे.''

होय,तुम्ही बरोबर वाचताय सध्याच्या युगात कामाला कौटूंबिक गोष्टींपेक्षा जास्त प्राथमिकता दिली जाते आहे आणि आपल्या बाळाचा जन्म कोणत्या दिवशी व्हावा हे ठरवण्यासाठी कृत्रिम प्रसूतिवेदना घडवून आणण्यात काहीही वावगे वाटत नाही. 

हे सर्व अगदी विलक्षण आहे ना,गर्भावस्थेवर आपण नियंत्रण मिळवू शकू अशी कल्पना कुणीही केली नसेल.पण हे सर्व वाटते तितके सोपे नाही कारण गर्भावस्थेत अगोदरच जाणवणाऱ्या गुंतागुंतीच्या परीस्ठीती मध्ये आणखी भर पडू शकते. यामुळे, या जगात येण्यासाठी तुमच्या बाळाने निवडलेल्या नैसर्गिक मार्गात ढवळाढवळ करू नये असे सुचवले जाते.

कृत्रिम प्रसववेदनांचा पर्याय सुज्ञपणे निवडण्यासाठी या विषयाशी संबंधित सर्व वैद्यकीय माहिती आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.

कृत्रिम प्रसूतिवेदनाचे कार्य कसे चालते हे पाहूया:

घडवून आणलेल्या प्रसूतिवेदना ह्या कृत्रिमपणे दिल्या जाणाऱ्या प्रसूतिवेदना असतात आणि जेव्हा तुमची गर्भावस्था ठरलेल्या मुदतीपेक्षा जास्त कालावधी घेते,म्हणजेच तुमची प्रसूतीची अंदाजे तारीख (EDD ) उलटून गेलेली आहे. गर्भधारणा झाल्यापासून सुमारे ४० आठवड्यावर तुमची प्रसूतीची अंदाजे तारीख (EDD ) ठरते.कृत्रिम प्रसूतीवेदनेच्या पर्यायाचा अवलंब करण्या आधी तुमच्या प्रसूतीच्या अंदाजे तारखे आधी किमान ५ आठवड्यापर्यंत वाट पाहण्याचा आणि त्या आधी प्रसूती करवून न घेण्याचा सल्ला दिला जातो कारण,तुमच्या बाळाची वाढ होत असते आणि शारीरिक दृष्ट्या त्याचा आकार जेवढा वाढायला हवा असतो तेवढा वाढलेला नसतो. बाळाची वाढ ३८-४० आठवड्याच्या कालावधीत पूर्ण होते आणि निसर्गाच्या या वेळेचा आदर राखणे केव्हाही चांगले!

तुम्हाला मधुमेह असल्यास बाळाचा आकार गरजेपेक्षा जास्त वाढू देण्याचा धोका टाळण्याचा सल्ला दिला जातो. इतर ही काही आजारांमध्ये कृत्रिम प्रसूतिवेदना चा पर्याय निवडण्याचा विचार केला जाऊ शकतो.

कृत्रिम पद्धतीने प्रसूती करवण्यासाठी ऑक्सिटोसिन संप्रेरक वापरले जाते ज्यामुळे गर्भाशयाचे मुख विस्तारित पावते आणि गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत होते.नैसर्गिक प्रसूती होत असतांना तुमच्या शरीराद्वारे सोडले गेलेले ऑक्सिटोसिन मुळे गर्भाशयाच्या दोन सलग आकुंचनामध्ये वेळेचे योग्य अंतर राखले जाते. याशिवाय तुमच्या मेंदूद्वारे शरीराला एंडोमॉर्फिन नावाचे नैसर्गिक वेदना शमवणारे संप्रेरक स्रवले जाते ज्याच्या मदतीने तुम्ही प्रसूतीवेदना सहन करू शकता.

याउलट,जेव्हा कृत्रिम पद्धतीने प्रसूतिवेदना घडवून आणल्या जातात तेव्हा एंडोमॉर्फीन संप्रेकाशिवाय फक्त ऑक्सिटोसिन शरीरात सोडले जाते आणि मेंदूला नैसर्गिक पद्धतीने वेदनाशामक एंडोमॉर्फीन स्रवण्याचा संदेश न पोहचल्या मुळे या प्रक्रियेत होणाऱ्या वेदनाही जास्त असतात.

कृत्रिम पद्धतीने घडवून आणलेल्या प्रसूतिवेदना मध्ये प्रसूतिकाळ वारंवार येतात आणि जास्त वेदनादायी असतात. या पद्धतीत असणारे काही धोके खालील प्रमाणे:

 १] सिझेरियन करण्याची गरज केव्हा असते:

-बाळाचा मुदतपूर्व जन्म

- हृदयाचे ठोके कमी असणे

-संक्रमण

- नाळेशी संबंधित समस्या

- मूत्रमार्ग फाटणे

- प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होणे

या वेगवेगळ्या पद्धतींनी तुम्ही कुत्रिम प्रसूतिवेदना पद्धतीचा अवलंब करू शकता :

१ ]मेमब्रान स्वीप  Membrane Sweep (ARM)/

या पद्धतीत गर्भाशयाच्या मुखापासून ऍम्नीऑटिक द्रव असणारी गर्भपिशवी अलग केली जाते ज्यामुळे प्रसूतीकळा सुरु होण्यास मदत मिळते.ऐकायला थोडी भीतीदायक आणि वेदनादायक असली तरी हि पद्धत परिणामकारक आहे.

२] प्रोस्टाग्लान्डिन संप्रेरकाचा वापर

या संप्रेरकांमुळे तुमचे पोट किंवा गर्भाशयाचे मुख या पूर्ण प्रक्रियेसाठी तयार केले जाते.प्रसूतिकळा सुरु करण्यासाठी हे संप्रेरक मातेच्या योनिमार्गाद्वारे एक गोळी किंवा जेलीच्या स्वरूपात सोडले जाते.याने तुम्हाला मळमळल्या वाटू शकते किंवा तुम्हाला काहीही वेगळे जाणवणार नाही!पण ही पद्धत परिणामकारक आहे.

३] घरगुती उपाय 

काहींच्या मते,संभोग केल्याने प्रसूतिकळा सुरु होतात पण जर आधीच द्रव बाहेर येण्यास सुरुवात झाली असेल तर संभोगामुळे तुम्हाला संक्रमण होऊ शकते. मसालेदार अन्न खाण्याने आणि एरंडेल तेल यांनीही फायदा होऊ शकतो पण यात ही धोक्याची शक्यता आहे,यामुळे तुम्ही या उपायांवर १००% अवलंबून राहू शकत नाही.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon