घरच्या घरीच सौन्दर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा वापर ह्या प्रकारे करा
१) चेह-यावरील तेज टिकवण्यासाठी बटाटा किसून चेह-यावर साधारण 30 मिनिटांसाठी ठेवावा. अशा प्रकारे चेह-यावर बटाट्याचा किस रोज लावल्याने चेह-याचा रंग उजळण्यास मदत होते. तुम्ही बटाट्यामध्ये लिंबूदेखील मिक्स करू शकता. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी उपलब्ध असते यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
२) चेहरा ओढल्यासारखा अथवा सुरकुत्या झाल्यासारखे वाटत असल्यास तुम्ही बटाट्याचा रस चेह-यावर लावू शकता. बटाट्यामध्ये एंटी-एजिंग आणि चेहर्यावर सुरकुत्या कमी करण्याचे गुण असतात. चेह-यावर बटाट्याचा तुकडा कापून लावल्याने चेह-यावर ग्लो येण्यास मदत होते तसेच चेहरा स्वच्छ आणि मऊ होतो.

३) चेह-यावर अथवा डोळ्यांच्या खाली डार्क स्पॉट झाल्यास बटाटा लावल्याने फायदा होतो. तसेच जर तुमच्या चेह-यावर ब्लॅक स्पॉट असतील तर, बटाट्याचे स्लाइस करून चेह-यावर 5 मिनिटांसाठी हळू-हळू मालिश करावी. यानंतर थंड पाण्याने चेहरा धूवून टाकावा.
४) अनेकांच्या चेह-यावर फेशिअल सुट होत नाही आणि मग चेह-यावर डाग पडण्यास सुरूवात होते. अशावेळी चेह-यावरील डाग काढण्यासाठी बटाटा रामबाण ठरू शकतो. बटाटा कापून चेह-यावर लावण्याने फेशिअलचे डाग कमी होण्यास मदत होते.

५) उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सन बर्न झाल्यास बटाटा लावणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बटाट्याचे स्लाइस करून फ्रिजमध्ये ठेवावे. ज्या ठिकाणी तुम्हाला सनबर्न झाले आहे त्या ठिकाणी फ्रिजमधील बटाटा लावल्यास आराम मिळेल.
६) ज्या व्यक्तींची स्किन ड्राय आहे अशा व्यक्तींसाठी बटाटा उत्तम आहे. चेह-याचा ड्रायनेस कमी करण्यासाठी दह्यामध्ये बटाटा टाकून मास्क बनवून घ्यावा. मास्क तयार झाल्यानंतर चेह-यावर साधारण 20 मिनिटे लावून ठेवावे.

७) बटाटे उकडल्यानंतर राहिलेल्या पाण्यात एक बटाटा मिसळून केस धुतल्यास केसांना चमक येते. केस मऊ होतात. केस गळती थांबते. डोक्यात खाजवणे, केस पांढरे होणे हे विकार थांबतात.
८) केस धुण्यासाठी तळाशी राहिलेल्या पाण्यात लिंबू पिळून त्याने केस धुतल्यास आणखी फायदा होतो. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांच्या मुळांशी लावल्यास केस पिकडे, गळणे या समस्या दूर होतात.
सौन्दर्य टिप्स मिळवण्यासाठी tinystep वर जाऊन मराठी पेज वर वाचा. आपल्या मराठीमधून.
