Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

कफ आल्यावर आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय करा


अचानकपणे तुम्हाला कफाचा त्रास व्हायला लागला आणि श्वास घ्यायलाही अडचण येत आहे. आणि खूप कफ झाल्यासारखे वाटतं आहे. आणि हे अचानक कसे होत असते तर ह्याची कारणे म्हणजे, ऍलर्जी, बॅक्टरीयाचे इन्फेक्शन आणि फंगी (बुरशीमुळे) ह्या गोष्टीमुळे असा त्रास होत असतो. ह्या सर्व त्रासामुळे तुम्हाला खूपच अस्वस्थ वाटत असते, काहीच काम न करता खूप थकल्यासारखे वाटते, कारण तुमच्या शरीराला ऑक्सिजन अपुरा पडत असतो. ह्यामुळे घशातही दुखायला लागते. खूप खोकला येतो. कधीतरी चक्करही येतात. तर अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्याअगोदर ह्यावर काही घरगुती उपाय करता येतील.

१) मिठाचे पाणी

नमक (सॉल्ट) हे घरात उपलब्ध असणारे आणि ह्याद्वारे तुम्ही ह्यावरती उपाय करू शकता. त्यासाठी काय कृती करावी :

सुरुवातीला, एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा नमक टाकावे. नमक पूर्णपणे पाण्यात विरघळू द्यावे. आणि ह्या पाण्याने दररोज २ ते ३ वेळा खळखळून गुळण्या करायच्या. ह्यामुळे तुम्हाला आराम मिळेल कारण मिठामुळे श्वसनविषयी समस्या दूर होते आणि गरम पाणी हे घशाला आराम देऊन त्याला बरे करते.

२) आले

आल्यामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी आणि इम्युनल बुस्टिंगचे गुण असतात. त्यास्तही काय कृती करावी : सुरुवातीला, एका कप गरम पाण्यात मॅश केलीले आले, टाकून द्यावे. आणि ते द्रावण ५ मिनिटपर्यँत सोडून द्यावे. त्यानंतर त्या द्रवात थोडेसे मध मिसळून द्या. आणि हे आल्याचे औषध दिवसातून २ ते ३ वेळा घ्या. आणि ह्यासोबत तुम्ही आले दिवसातून एकदा चघळू शकता. ह्यामुळे तुम्हाला आरामदायक आणि बरे वाटेल.

३) कांदा

कांद्यामध्ये Quercetin नावाचे द्रव असते. आणि हे स्नायू ला बळकट करत असते. आणि ह्यात अँटी - मायक्रोबियल घटक असल्याने कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शनपासून तुम्हाला दूर ठेवते. त्यासाठी घरगुती काय उपाय करता येईल :

एक ग्लास पाण्यात थोडे कांद्याचे ज्यूस, लेमन ज्यूस, आणि त्यात मध टाकून त्या मिश्रणाला उकळून पुन्हा त्या द्रावणाला कोमट करून तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा घेऊ शकता.

४) हळद

हळदीविषयी अगोदरच आम्ही ब्लॉग प्रकाशित केला आहे. त्यात तुम्ही काही फायदे व काही समस्यांवर उपाय सुचवला आहे तो तुम्ही बघू शकता. ह्या समस्येसाठी काय कृती कराल : अर्धा चम्म्मच हळद घ्यावी, ती एका ग्लास दुधात टाकून त्याला तापवावे. दोन चम्मच त्यात मध मिसळावे, चिमूटभर त्यात काळी मिरी टाकावी. आणि त्यानंतर त्या द्रावणाला २ ते ३ वेळा दिवसातून घेत जावे. लवकरच तुमची ही समस्या दूर होईल.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon